आरटीई प्रवेशाचा आज अंतिम दिवस!! – RTE Admission 2026 @ student.maharashtra.gov.in

RTE Admission 2026 @ student.maharashtra.gov.in

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रतीक्षा यादीतील पहिल्या टप्प्यातील पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आज, शुक्रवारी अंतिम दिवस आहे. यापूर्वी प्रतीक्षा यादीतील पहिल्या टप्प्यातील बालकांना प्रवेशासाठी १५ ते २३ मेपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, अनेक पालकांची गैरसोय टाळण्यासाठी २९ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार, पालकांनी आज, शुक्रवारी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाद्वारे करण्यात आले आहे.

प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएस पाठवले जात आहेत. परंतु, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली की नाही याची खात्री करावी. पालकांनी अॅडमिट कार्ड काढण्यासाठी स्वतः लॉगिन करू नये. पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा. पालकांनी अर्ज भरताना नोंदविलेल्या सर्व मूळ कागदपत्रांच्या प्रति आणि साक्षांकित प्रति सोबत ठेवाव्यात. तसेच आपल्या लॉगिनमधून किंवा पडताळणी समितीकडून अलॉटमेंट लेटर आणि पोर्टलवरील हमीपत्राची प्रिंट काढून घ्यावी.


RTE Admission 2026 @ student.maharashtra.gov.in

राज्यातील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता ८ मेपर्यंत पालकांना कागदपत्र पडताळणी करून प्रवेश घेता येणार आहे.

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या बालकांसाठी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. त्यामध्ये निवड झालेल्या बालकांची यादी १० एप्रिलरोजी जाहीर झाली. या बालकांच्या कागदपत्रांची छाननी प्रत्यक्ष शाळेत करण्यासाठी दि. ११ ते २० एप्रिलपर्यंत मुदत होती. मात्र या काळात सर्वच बालकांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे दि. ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा दि. ८ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार, पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित शाळेमध्ये प्रवेश प्रक्रिया कालावधीत पूर्ण करावी. मुदतवाढीनंतर कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही. त्यामुळे संबंधित पालकांनी दिलेल्या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी केले आहे.


RTE Admission 2026 @ student.maharashtra.gov.in

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मुदतवाढ देण्यात आल्याने अद्याप अर्ज न करू शकलेल्या पालकांना आणखी संधी मिळणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा ८ हजार ७०१ शाळांमध्ये १ लाख १४ हजार ८२६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी २ लाख ८९ हजार २८६ अर्ज दाखल झाले आहेत. प्रवेशासाठी देण्यात आलेली मुदत सोमवार, २० एप्रिल रोजी संपली. मात्र, ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिल्याने प्रवेशांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा प्रवेशाच्या जाचक अटी, तांत्रिक अडचणी, कागदपत्रे अपलोड करण्यातील समस्या अशा विविध कारणांमुळे पालकांना वेळेत प्रवेश घेता आला नाही. परिणामी, निवड झालेल्या १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांपैकी केवळ २८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. शाळांकडून प्रवेश नाकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. शाळांच्या मनमानी कारभारामुळे पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

RTE Admission 2026 @ student.maharashtra.gov.in

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी १ लाख ५ हजार २२९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पालकांनी २० एप्रिलपर्यंत मिळालेल्या शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. लॉटरी माध्यमातून निवडलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल. राज्यातील ८ हजार ७०१ शाळांमधील १ लाख १४ हजार ८२६ जागांसाठी २ लाख ८९ हजार ३८५ अर्ज प्राप्त झाले होते. आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी लॉटरी काढल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाकडून पालकांना एसएमएस पाठवून शाळा प्रवेशाची माहिती देण्यात आली. प्रवेशाची माहिती पालकांना आरटीई पोर्टलवर जाऊन तपासता येईल. लॉटरीच्या माध्यमातून ५५२ दिव्यांग विद्यार्थ्यांची, तर सर्वसाधारण संवर्गातील १ लाख ५ हजार २२९ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. ३० दिव्यांग विद्यार्थी व ८६ हजार सर्वसाधारण संवर्गातील विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. संबंधित समितीने कागदपत्रांची तपासणी करून प्रमाणित केल्यानंतर शाळेत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रत देण्यात यावी, असे आवाहन केले.


RTE Admission 2026 @ student.maharashtra.gov.in

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि आरक्षित प्रवर्गातील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता पालकांना ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

आरटीई’ २५ टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाने १ किलोमीटरच्या अंतरातील शाळा निवडण्याची घातलेली अट उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आधी अर्ज भरलेल्या पालकांना पुन्हा अर्ज भरण्यासाठी, तसेच अर्ज न भरलेल्या पालकांना अर्ज भरण्याची संधी दिली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी एक किलोमीटरची अट रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे एक किलोमीटरच्या आतील शाळांची निवड करून अर्ज भरलेल्या पालकांना प्रवेशासाठी किलोमीटर, एक ते तीन किलोमीटर, तसेच तीन किलोमीटरपेक्षा अधिक एक अंतरावरील झाल्या आहेत.


RTE Admission 2026 @ student.maharashtra.gov.in

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत लागू केलेली १ किलोमीटर अंतराची अट स्थगित करत जुना ३ किलोमीटरचा नियम पुन्हा लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शिक्षण विभागाने अर्ज भरण्याची मुदत २५ मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात मंगळवारपर्यंत ८ हजार ६९९ शाळांमध्ये १ लाख १४ हजार ७९२ जागा उपलब्ध असून आतापर्यंत २ लाख २७ हजार २८५ अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे, ठाणे, नागपूर आणि मुंबई या जिल्ह्यांत सर्वाधिक अर्जाची नोंद झाली आहे. यंदा शालेय शिक्षण विभागाने केवळ १ किमी परिसरातील शाळांपुरती मर्यादा असल्याने अनेक पालकांना इच्छित शाळांची निवड करता येत नव्हती. काही ठिकाणी परिसरात कमी शाळा असल्यामुळे प्रवेशासाठी मर्यादित पर्याय उपलब्ध होते. मात्र नव्या निर्णयामुळे आता ३ किमीपेक्षा अधिक अंतरावरील शाळांमध्येही अर्ज करता येणार आहे. यासंदर्भात आधी अर्ज सादर केलेल्या पालकांसाठी ‘अनकन्फर्म’ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी भरलेले अर्ज बदलून नव्याने शाळांची निवड करता येणार आहे.


RTE Admission 2026 @ student.maharashtra.gov.in

शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेश अर्ज नोंदणीसाठी राज्य सरकारने घातलेली अंतराची अट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बेकायदेशीर ठरवली आहे. यानंतर न्यायालयाने १० मार्च रोजीच्या दिलेल्या पुढील आदेशात राज्य शासनाला ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. यानंतर शालेय शिक्षण विभागाने अर्ज करण्याची मुदत १८ मार्चपर्यंत वाढवली आहे.

नागपूर येथील एका स्थानिक पालकाने दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारच्या १२ फेब्रुवारी २०२६ च्या शासननिर्णयातील अटी शिक्षण हक्क कायदा आणि संविधानातील कलम २१-अच्या विरोधात असल्याचे निरीक्षण नोंदवले. शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेश अर्ज नोंदणीसाठी राज्य सरकारने घातलेली शाळा घरापासून एक किलोमीटर अंतरात असण्याची अट तसेच पालकांना केवळ दहा शाळा निवडण्याचा नियम देखील मनमानी असल्याचे नमूद करत त्यालाही स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे आता मुदतवाढ दिली असली तरी पालकांना अर्ज करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


RTE Admission 2026 @ student.maharashtra.gov.in

शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल तसेच आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शाळांमधील २५ टक्के जागांवर देण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेतून पळवाट काढण्यासाठी काही शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवला होता. परंतु मप्राथमिकफचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील तब्बल २० शाळांचा अल्पसंख्याक दर्जा नाकारला असून, त्यांना आरटीई प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या जागा वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राज्यभर दुखवटा जाहीर असतानाच अवघ्या काही तासांत तब्बल ७३ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याची बाब उघड झाली. या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचे सांगितले गेले होते.

मात्र प्रत्यक्षात या शाळांची नोंदणी शालेय शिक्षण विभागाच्या आरटीई (RTE) पोर्टलवरील यादीतून कमी करण्यात आली होती. त्यामुळे उपलब्ध प्रवेशक्षम जागांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या संदर्भात आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी अल्पसंख्याक विभाग तसेच शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करून या प्रकरणाकडे लक्ष वेधले.

यानंतर शिक्षण विभागाने ४ मार्च रोजी आदेश काढत संबंधित सर्व शाळांचा पुन्हा आरटीई नोंदणीमध्ये समावेश करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पालक वाट पाहत असलेल्या राज्यभरातील पोतदार इंटरनॅशनल, सेंट झेवियर तसेच इतर संस्थांच्या शाळा आता प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध होणार आहेत.

यापूर्वी आरटीई अंतर्गत राज्यात ८,६५१ शाळांची नोंदणी झाली होती. आता ही संख्या वाढून ८,६८८ वर पोहोचली आहे. तसेच उपलब्ध प्रवेशसंख्या १,१२,७७२ वरून १,१४,०६३ पर्यंत वाढली आहे. सर्व शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या घडामोडींमुळे प्रवेश प्रक्रियेसमोर नवे प्रश्न आणि अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


RTE Admission 2026 @ student.maharashtra.gov.in

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने यंदा मोठा बदल केला आहे. पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करताना आता किमान १० शाळांची निवड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या निर्णयामुळे प्रवेशाची व्याप्ती वाढणार असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शाळा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेशप्रक्रिया आता गतीने सुरू झाली आहे.

यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत ‘शाळा निवडी’चा नियम अधिक कडक करण्यात आला आहे. पूर्वी पालक आपल्या पसंतीच्या मोजक्या शाळा निवडत असत; परंतु आता अर्जात किमान १० शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे. यामुळे जर पहिल्या पसंतीच्या शाळेत लॉटरी लागली नाही, तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या पर्यायाचा विचार करणे यंत्रणेला सोपे जाणार आहे.

लोकेशन बदलाची संधी किती?
पालकांना अर्ज भरताना निवासाचा पुरावा म्हणून जो पत्ता दिला आहे, त्याआधारे शाळांचे अंतर मोजले जाते. अर्ज एकदा ‘सबमिट’ केल्यानंतर लोकेशन बदलण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे गुगल मॅपवर आपल्या घराचे लोकेशन अचूक जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. चुकीच्या लोकेशनमुळे प्रवेश रद्द होऊ शकतो.

पात्रता निकष काय?
उत्पन्न गट : पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे. (एससी/एसटी प्रवर्गासाठी अट शिथिल).
निवासाचा पुरावा : रेशनकार्ड, आधार कार्ड किंवा भाडेकरार (रजिस्टर्ड).
वयोमर्यादा : प्रवेशाच्या वर्गासाठी शासनाने ठरवून दिलेली किमान वयोमर्यादा पूर्ण असावी.
कागदपत्रे : जन्माचा दाखला, जातप्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि उत्पन्नाचा दाखला.

पालकांना काय होणार फायदा?
1.दहा शाळांच्या पर्यायामुळे पाल्याला प्रवेश मिळण्याची खात्री वाढली आहे. एकाच शाळेवर अवलंबून राहण्याची गरज उरली नाही.

2.पसंतीक्रम जास्त असल्यामुळे घरापासून जवळच्या शाळेत संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

लॉटरी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन !
आरटीईची संपूर्ण प्रवेशप्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी ‘एनआयसी’मार्फत संगणकीय लॉटरी काढली जाते. यात मानवी हस्तक्षेप नसतो. लॉटरी लागल्यानंतर पालकांच्या नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएस (एसएमएस) प्राप्त होतो, त्यानंतरच कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू होते.


RTE Admission 2026 @ student.maharashtra.gov.in

सन २०२६-२०२७ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून, अर्ज भरण्याची मुदत १७ फेब्रुवारी ते १० मार्चदरम्यान राहणार आहे. आरटीई पोर्टलवर अर्ज भरताना पालकांना आपल्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या आत असलेल्या शाळाच निवडता येणार आहेत. आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना आता केवळ दहा शाळांचीच निवड करता येणार असून, शाळा व घरातील अंतर गुगल मॅपच्या आधारे निश्चित करूनच शाळा निवडावी लागणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात सुधारित सूचना जारी केल्या आहेत.

नव्या सूचनांनुसार, २५ टक्के प्रवेशासाठी पालकांनी विचारपूर्वक जास्तीत जास्त दहा शाळांचीच निवड करावी लागणार आहे. अनेक शाळांची निवड करता येत असल्याने काही पालक दूरच्या शाळाही पर्यायात ठेवत होते. मात्र आता गुगल मॅपच्या आधारे घर ते शाळेचे हवाई अंतर निश्चित करूनच शाळा निवडावी लागणार आहे.
दरम्यान, अर्ज प्रक्रियेनंतर ऑनलाईन सोडत काढून प्रवेश दिला जाणार असून, उपलब्ध जागांइतकी प्रतीक्षा यादीही तयार केली जाणार आहे. सोडतीत नाव लागल्यानंतर पालकांना कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश घ्यावा लागणार आहे.
प्रवेशासाठी जात, उत्पन्न, निवास, जन्मतारीख आदी कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असून, चुकीची माहिती दिल्यास प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचा इशाराही परिपत्रकात देण्यात आला आहे.
या नव्या नियमांमुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत घराजवळील शाळांना प्राधान्य मिळणार असून, द्रच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता कमी होणार आहे. पालकांनी वेळेत आणि अचूक माहिती देऊन अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.

पाच वेळा बदलता येणार लोकेशन
ऑनलाइन अर्ज भरताना पालकांना घराचे लोकेशन ‘बॅलून’च्या माध्यमातून अचूक दाखवावे लागणार आहे. हे लोकेशन बदलण्याची संधी जास्तीत जास्त पाच वेळाच मिळणार असल्याने पालकांनी काळजीपूर्वक अचूक पत्ता नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


RTE Admission 2026 @ student.maharashtra.gov.in

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये ९ ते १९ जानेवारीनंतर २० ते २७ जानेवारी दरम्यान शाळा नोंदणी तसेच व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, शाळा नोंदणी १०० टक्के न झाल्यामुळे आता २८ ते ३० जानेवारीदरम्यान अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्राथमिकचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर ऑनलाइन पद्धतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. त्यानुसार २०२६-२७या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने ९ जानेवारीपासून विनाअनुदानित स्वयंअर्थसाह्यय्यित शाळा नोंदणी आणि शाळा व्हेरिफिकेशनची लिंक सुरू करण्यात आली आहे. सध्या ७ हजार ७३९ शाळांची नोंदणी झालेली असून १ हजार ३ हजार ६५ जागा उपलब्ध झाल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शाळा नोंदणीनंतरचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा शाळा व्हेरिफिकेशनचा असतो. तरी या अनुषंगाने सर्व संबंधितांनी शाळा व्हेरिफिकेशन करताना, बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरीत झालेल्या शाळा आरटीई २५ टक्के प्रवेश सन २०२६-२७मध्ये प्रविष्ट होणार नाहीत याची खबरदारी घेण्यात यावी. याबाबत सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्यावर निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच शाळा मान्यता ज्या मंडळाची आहे तेच मंडळ शाळेने नोंदणी करताना निवडले आहे का याची खात्री करण्यात यावी. (उदा. शाळा मान्यता राज्य मंडळाची आहे व शाळेने नोंदणी करताना केंद्रीय मंडळ निवडले आहे.) तरी संबंधित सूचनांचे पालन करून दिलेल्या कालावधीमध्ये १०० टक्के विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा नोंदणी व शाळा व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करावी ही शेवटची मुदतवाढ असून यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


RTE Admission 2026 @ student.maharashtra.gov.in

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या नोंदणी व पडताळणीस २७ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ठरलेल्या कालावधीत सर्व शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात दिनांक ९ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत शाळा नोंदणी व शाळा पडताळणी प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, अनेक शाळांकडून नोंदणी व पडताळणीची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे यांनी दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजीच्या पत्रान्वये या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले.

यानुसार, दिनांक २० ते २७जानेवारी २०२६ या कालावधीत संबंधित सर्व विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी आपली ऑनलाईन नोंदणी व शाळा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कालावधीनंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळा पडताळणी करताना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, बंद झालेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत तसेच स्थलांतरित शाळा या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येणार नाहीत. तसेच, शाळेला ज्या शिक्षण मंडळाची मान्यता आहे, त्याच मंडळाअंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे का, याची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 


RTE Admission 2026 @ student.maharashtra.gov.in

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यान्वये (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रियातील पहिल्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी येत्या ९ जानेवारी ते १९ जानेवारी २०२६ दरम्यान विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांची नोंदणी आणि शाळा व्हेरिफिकेशन असे निर्देश शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेस मान्यता दिली आहे. त्यासाठी शाळांना नोंदणीसाठी ९ जानेवारीपासून लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शाळेची मान्यता ज्या शिक्षण मंडळाची आहे, तेच मंडळ नोंदणी करताना निवडले आहे का, याची तपासणी करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, राज्य मंडळाची मान्यता असलेल्या शाळेने केंद्रीय मंडळाची नोंदणी करू नये, अशी सूचना देण्यात आली आहे, असे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालया च्या वतीने सांगण्यात आले.

व्हेरिफिकेशन करताना बंद झालेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरित झालेल्या शाळा या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत प्रविष्ट होणार नाहीत, याची काटेकोर खबरदारी घेण्यात यावी. या बाबतीत त्रुटी आढळल्यास त्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्यावर निश्चित होईल.

शिक्षणाचा मूलभूत अधिकार या कायद्यान्वये राज्य शासनाच्यावतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. या जागांच्या प्रवेशासाठी नवीन शैक्षणिक वर्षात शासनाकडून मान्यता दिली जाते.
त्यानुसार २०२६-२७ साठी आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. याअंतर्गत प्रवेशासाठी शाळांची नोंदणी सुरुवातीस करण्यात येणार आहे. यासाठी ९ जानेवारीपासून शाळांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यास लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २०२५-२०२६ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ९० शाळांनी नोंदणी केली होती.

 


 

RTE Admission 2026 @ student.maharashtra.gov.in

यंदा मुंबईमधील खासगी विनाअनुदानित शाळांमधील ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के प्रवेशप्रक्रिया काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिका शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ‘आरटीई’ नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये पहिलीच्या प्रवेशासाठी २५ टक्के जागा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. प्रवेशप्रक्रियेसाठी पात्र शाळांची ऑनलाइन नोंदणीपूर्व तयारी पूर्ण झाली आहे. शासनाची अधिकृत अधिसूचना जारी होताच शाळांची नोंदणी प्रक्रिया वेगाने सुरू होईल. शिक्षण विभागाच्या सूत्रांनुसार ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

कोणते कागदपत्र महत्वाचे ?

उत्पन्न, जन्म प्रमाणपत्र, जातीचा दाखला…, पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांच्या उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला, रहिवासी पुरावा, जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्ड तयार ठेवावे, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे. तसेच या वर्षी तक्रार निवारणासाठी हेल्प डेस्क यंत्रणा सुरू केली आहे. पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे सर्व ठिकाणी विविध मदत केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत किंवा होणार आहेत.

त्यामुळे प्रवेश प्रक्रिया कशी राबवायची किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी शाळानोंदणी, विद्यार्थीनोंदणी आदींसंदर्भात कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिल्या नसल्यामुळे प्रक्रिया सुरू केली नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील स्पष्टीकरण राज्य सरकारकडून येईल आणि त्यानंतर शाळानोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आर.टी.ई. २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे

महत्वाच्या सूचना:

  • सर्व कागदपत्रे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत
  • आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे सर्व बालकांसाठी अनिवार्य आहेत

 

अ.क्र.प्रवर्ग / तपशीलवैध कागदपत्रांची सूची
वंचित जात संवर्गातील बालक (SC, ST, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, OBC, SBC)वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला (तहसीलदार/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला). परराज्यातील दाखला ग्राह्य नाही. उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही
दिव्यांग बालकेजिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकीय अधीक्षक यांचे ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र
एच.आय.व्ही. बाधित/प्रभावितजिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षक यांचे प्रमाणपत्र
NEW कोव्हीड प्रभावित (१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ दरम्यान मृत्यू)पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र आणि मृत्यू कोव्हीड-१९ मुळे झाल्याचे शासकीय/महानगरपालिका रुग्णालय किंवा आय.सी.एम.आर.
NEW अनाथ बालकेअनाथालयाची कागदपत्रे. बालक अनाथालयात नसल्यास सांभाळ करणाऱ्या पालकांचे हमीपत्र. [cite_start]वार्षिक उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकतहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी). [cite_start]आर्थिक वर्ष २०२२-२३ किंवा २०२३-२४
७ & ८घटस्फोटित / न्यायप्रविष्ट प्रकरणातील महिलान्यायालयाचा निर्णय किंवा प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा. आईचा रहिवासी पुरावा. [cite_start]जातीचा किंवा उत्पन्नाचा दाखला (गटाप्रमाणे).
विधवा महिलापतीचे मृत्यू प्रमाणपत्र, आईचा रहिवासी पुरावा आणि आवश्यकतेनुसार जातीचा/उत्पन्नाचा दाखला[cite: 11].
१०आधार कार्ड NEWविद्यार्थी किंवा पालकाचे आधार कार्ड किंवा पावती अनिवार्य. आधार नसल्यास ९० दिवसांच्या आत सादर करण्याच्या अटीवर तात्पुरता प्रवेश[cite: 11].
११जन्मतारखेचा पुरावाग्रामपंचायत/न.पा./म.न.पा. [cite_start]दाखला किंवा रुग्णालय/आंगणवाडी रजिस्टरमधील उतारा किंवा पालकांचे प्रतिज्ञापत्र[cite: 11].
१२रहिवासाचा पुरावारेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज/टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स देयक, राष्ट्रीयकृत बँक पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट[cite: 11].
भाडेतत्त्वावर राहणाऱ्यांसाठीदुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत ११ महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा भाडेकरार (अर्ज भरण्यापूर्वीचा)

 

 


 

RTE Admission 2025 @ student.maharashtra.gov.in

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षणातून होणारी प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होत असल्याने पालक, विद्यार्थी आणि शाळा यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शैक्षणिक वर्ष येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश नोंदणी जानेवारीतच सुरू करावी, अशी ठाम मागणी पालकांनी केली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्यास पात्र बालकांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते, यामुळे यंदाही प्रक्रिया वेळेत सुरु करावी अशी मागणी होत आहे.

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राज्यभरात ८ हजार ८६ शाळांमध्ये १ लाख ९ हजार १०२ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी तब्बल ३ लाख ०५ हजार १५१ अर्ज दाखल झाले होते. या अजपैिकी १ लाख ०१ हजार ९६७बालकांची निवड सोडतीने करण्यात आली होती. पहिल्या प्रतीक्षा फेरीत १२,००८, दुसऱ्या फेरीत ४,७८९, तिसऱ्या फेरीत १,४९९ आणि चौथ्या फेरीत ५४७ अशा प्रकारे एकूण ८८ हजार १९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. ०.५ किमीपर्यंत असलेल्या शाळांत २९ हजार ६०६, ०.५ ते १ किमीमध्ये ४२ हजार ८७१ बालकांना प्रवेश मिळाला. मात्र १ किमीपेक्षा अधिक अंतरावरील शाळांमध्येही १५ हजारांहून अधिक बालकांना जावे लागले.


 

RTE Admission 2025 @ student.maharashtra.gov.in

शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांसाठीच्या प्रवेशप्रक्रियेला याच महिन्यात सुरुवात होईल. प्रवेशप्रक्रियेत एक किलोमीटरमधील विद्यार्थ्यांना शासकीय तसेच खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय काही अन्य बदल करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील अधिसूचना येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीई प्रवेशासाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच प्रवेशप्रक्रियेला सुरुवात केली होती. त्यामुळे साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण प्रवेशप्रक्रिया संपल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळेच यंदा ही प्रवेशप्रक्रिया या महिन्यातच सुरू करण्यात येणार आहे.

 

 


 

RTE Admission 2025 @ student.maharashtra.gov.in

राज्यातील शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले असले तरी हजारो जागा अद्याप रिक्त राहिल्या आहेत. राज्यभरातील १ लाख २९ हजारांहून अधिक जागांपैकी तब्बल २० हजारांपेक्षा जास्त जागा भरल्या गेल्या नाहीत. कागदपत्रांमधील त्रुटी, तांत्रिक अडचणी आणि पालकांच्या गोंधळामुळे अनेक गरजू विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.

या वर्षी ठाणे, मुंबई, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. उदाहरणार्थ, पुण्यात ९,८५८ उपलब्ध जागांपैकी ७,४९८ प्रवेश झाले असून, २,३६० जागा रिक्त आहेत. ठाण्यात १२,३२२ जागांपैकी ९,५७८ प्रवेश तर २,७४४ जागा रिक्त आहेत.

प्रवेश न होण्यामागे अनेक कारणे समोर आली आहेत —

  • अपूर्ण कागदपत्रे : काही पालकांकडून आवश्यक कागदपत्रांचा अपुरा संच अपलोड करण्यात आला.

  • तांत्रिक अडचणी : ऑनलाइन पोर्टलवरील समस्येमुळे अर्ज प्रक्रिया सुरळीत पार पडली नाही.

  • पालकांची अनभिज्ञता : प्रवेशासाठी लागणाऱ्या अटी व नियमांविषयी माहितीचा अभाव.

  • गुंतागुंत प्रक्रिया : अनेक टप्प्यांमधून जावे लागल्याने अर्जदारांचा उत्साह कमी झाला.

या पार्श्वभूमीवर शैक्षणिक हक्क कायद्याअंतर्गत राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ व त्रुटीमुक्त करण्याची मागणी पालक व शैक्षणिक संघटनांकडून होत आहे.

 

 


RTE Admission 2025 @ student.maharashtra.gov.in

 

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत राज्यभरातून ६० हजार ९८९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेशासाठी अंतिम मुदत आज, सोमवारी (१० मार्च) संपत आहे. एक लाख एक हजार ९६७ विद्यार्थ्यांचा निवड यादीत समावेश झाला होता. मात्र, यापैकी ६० हजार प्रवेशच निश्चित झाले आहेत. त्यामुळे रिक्त जागांवर प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार का, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. आरटीई प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून १० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, निवड यादीतील हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. यंदा ८८६३ शाळांनी ‘आरटीई’ची नोंदणी केली होती. सर्व शाळांमधून एक लाख नऊ हजार ८७इतक्या जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. यंदा तीन लाख पाच हजार १५२ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले. आरटीईची ऑनलाइन सोडत काढून निवड यादीत एक लाख एक हजार ९६७ विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला, तर ८५ हजार ४५७ विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादीत निवड करण्यात आली. सर्वप्रथम १४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशाची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत केवळ ४६ हजार जागांवर प्रवेश निश्चित झाले. त्यामुळे रिक्त जागांवर प्रवेशासाठी १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

 

✅2024 RTE प्रवेशासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्र – RTE Admission 2024 Documents list

दहा दिवसात केवळ १५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. पालकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन यंदा शिक्षण विभागाने लवकर प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्याने पालकांनी ‘आरटीई’ कडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. प्रवेशासाठी सर्वप्रथम कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. मात्र, बहुतांश पालकांकडे मूळ कागदपत्रे नाहीत; तसेच नवीन कागदपत्रांसाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केल्याने पालकांना निर्धारित वेळेत प्रवेश घेता आलेला नाही.

RTE ऑनलाईन अर्ज प्रणाली २०२५ लिंक  

 


शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेशप्रक्रियेसाठी पात्र विद्यार्थ्यांना येत्या एक ते १० मार्च या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ४७ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ‘आरटीई’ प्रवेश मुदतवाढीसंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. यंदा राज्यातील आठ हजार ८५३ शाळांमधील एक लाख नऊ हजार ८७ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी तीन लाख पाच हजार १५२ विद्याथ्यांनी अर्ज केले होते. ऑनलाइन सोडतीद्वारे एक लाख एक हजार ९६७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करून प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत राज्यभरातून ४७ हजार ९०६ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून सुमारे ५४ हजार ६१ जागा रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवेश जाहीर झालेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रवेशप्रक्रियेत पालकांच्या निवासी पत्त्याच्या पुराव्याबाबतही स्पष्टी करण देण्यात आले आहे. त्यानुसार स्वतःच्या मालकीची निवासव्यवस्था असलेल्या पालकांना शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना, वीज देयक, दूरध्वनी देयक, मिळकत करदेयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पारपत्र, आधारकार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेची खातेपुस्तिका (पासबुक) यापैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. स्वतःच्या मालकीची निवास व्यवस्था नसलेल्या पालकांना ते ज्या क्षेत्रातील शाळा निवडत आहेत, त्या क्षेत्रातील निवासी पुरावा म्हणून शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना, वीज देयक, दूरध्वनी देयक, मिळकत कर देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पारपत्र, आधारकार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेची खातेपुस्तिका या पैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येईल.

 


शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता पालकांना २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत २ लाख ५२ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेता येतो. आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते. यंदा राज्यभरातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये प्रवेशासाठी १ लाख ९ हजार १११ जागा उपलब्ध झाल्या आहेत. या प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी १४ ते २७ जानेवारीची मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्यापही अर्ज न भरलेल्या पालकांना संधी मिळण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, किंवा या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद !

ज्या पालकांना आपल्या पाल्याच्या पहिलीतील प्रवेशासाठी ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाइन अर्ज करायचे आहेत, त्यांना २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व अर्जाची छाननी करून प्रवेशासाठी लॉटरी प्रक्रियेने विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पालकांना संबंधित शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यापूर्वी पडताळणी समितीमार्फत अर्ज व प्रमाणपत्रांची पडताळणी करून घावी लागणार आहे.

 


आरटीई प्रवेश प्रक्रियेतील शाळा नोंदणीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थी नोंदणी सुरू होत असून, सोमवार (दि. 14) पासून नोंदणीस प्रारंभ होणार आहे. राज्यातील ८ हजार ६२४, तर नाशिक जिल्ह्यातील ४०५ खासगी शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंद केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना १ लाख ५ हजारवर जागा उपलब्ध होणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशपात्र शाळांची पडताळणी १८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली, शाळा नोंदणीसाठी शाळांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, ही मुदत ४ जानेवारीपर्यंत वाढविली होती. जिल्ह्यात एकूण ४०५ शाळा असून, त्यामध्ये २५ टक्के याप्रमाणे ५ हजार २९६ जागा राखीव आहेत. यापुढील टप्प्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले जाणार आहेत. त्यानंतर लॉटरी काढून प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे (चौकट) प्रवेशयोग्य मुलाच्या आई-वडिलांचे शासकीय ओळखपत्र (जसे की, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, जन्माचा दाखला किंवा पासपोर्ट), विद्यार्थ्यांचे ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बेघर मुले किंवा प्रवासी कामगारांच्या मुलांच्या प्रवेशासाठी एक प्रतिज्ञापत्र, मुलाचा पासपोर्ट साइज फोटो, बालक अनाथ असेल, तर माता-पिता दोघांचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. 

 

आरटीईचा ऑनलाईन अर्ज कसा भराल ?

शाळेची यादी माहिती झाल्यानंतर पालकांना आपल्या मुलांचे अर्ज भरण्यासाठी rte25admission.maharashtra.gov.in वर जावे लागेल. आरटीई २५ टक्के आरक्षणाच्या खाली शाळेच्या यादीवर क्लिक करा. आता तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा त्यानंतर ब्लॉकमधील शाळेच्या यादीवर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर शाळेची यादी व प्रवेश अर्ज तुमच्या कॉम्प्युटर स्क्रिनवर दिसू लागेल. अर्जामध्ये मुलाचे संपूर्ण नाव, ठिकाणाचे नाव, लिंग व अन्य माहिती अचूक भरवी. अर्ज भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करणे गरजेचे आहे.

 

परिसरात आरटीईअंतर्गत शाळा असल्यास संबंधित शाळेतून आरटीई अर्ज घ्यावा. एका मुलासाठी एकाच शाळेत आरटीई फॉर्म भरू शकतात. तसेच ऑनलाइनही फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यावी. त्यानंतर प्रिंट कॉपी आवश्यक कागदपत्रे जोडून शाळेत जमा करावी.

आरटीई फॉर्म ऑनलाइनही भरू शकतात. यासाठी शाळेची यादी माहीत झाल्यानंतर उमेदवारांना अधिकृत वेबसाइट rte25admission.maharashtra.gov.in वर जावे लागेल. होमपेजवर अधिसूचना आरटीई २५ टक्के आरक्षणच्या खाली शाळेच्या यादीवर क्लिक करावे. आता तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडावे त्यानंतर ब्लॉकमधील शाळेच्या यादीवर क्लिक करावे. त्यावर क्लिक केल्यानंतर शाळेची यादी व प्रवेश फॉर्म तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसू लागेल, हा फॉर्म राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर एका निर्धारित कालावधीमध्ये उपलब्ध असतो. हा फॉर्म दरवर्षी मर्यादित कालावधीसाठी वेबसाइटवर उपलब्ध असतो. मुदत संपल्यानंतर हा फॉर्म संकेतस्थळावर उपलब्ध नसतो. फॉर्ममध्ये मुलाचे संपूर्ण नाव, ठिकाणाचे नाव, लिंग व अन्य माहिती अचूक भरावी. फॉर्म भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्म सबमिट करावा.

 

 

 


शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांच्या प्रवेशासाठी नोंदणी (रजिस्ट्रेशन) केली जाणार आहे. यंदा प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होणार असल्यामुळे अपेक्षा आहे की इतर मुलांसोबत आरटीई अंतर्गत प्रवेश घेणारे विद्यार्थीही वेळेत शिक्षण सुरू करू शकतील. कारण सीबीएसई बोर्डासह अनेक खाजगी शाळा प्रवेश प्रक्रिया जानेवारी-फेब्रुवारीतच पूर्ण करतात, तर आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत चालू राहते. उशिरा होणाऱ्या प्रवेशाचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. यामुळे यावेळी 18 डिसेंबरलाच शाळांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी आरटीई प्रवेशासाठी अधिक जागा उपलब्ध आहेत, मात्र शाळांची संख्या कमी झाली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत राज्यातील 8,732 शाळांनी नोंदणी केली असून प्रवेशासाठी 1 लाख 7 हजार 104 जागा उपलब्ध आहेत, तर मागील वर्षी 9,217 शाळांमध्ये 1 लाख 5 हजार 238 जागा उपलब्ध होत्या. असे सांगितले जाते की आरटीई प्रवेश टाळण्यासाठी अनेक शाळा अल्पसंख्याक दर्जा मिळवत आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या १३ जानेवारीपासून विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी दिली जाणार आहे. ९ हजार शाळांनी आतापर्यंत नोंदणी केल्याने एक लाखांहून अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी १८ डिसेंबरला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आणि नोंदणीसाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. परंतु अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे ४ जानेवारीपर्यंत शाळा नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली होती. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू.  धन्यवाद !

 

 

RTE Admission 2025: खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी राबवली जाणारी आरटीई प्रवेशप्रक्रिया यावर्षी १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणीसह सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी जानेवारी महिन्यात सुरू होईल, तर प्रवेशासाठीची लॉटरी मार्च महिन्यात काढली जाईल. विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदाच जून-जुलै महिन्यात संपूर्ण प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईल, ज्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग वेळेत सुरू करता येणार आहेत.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्याअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटक आणि आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठीची आरटीई प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात राबवली जाते. यावर्षीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी पत्राद्वारे कळविले की, १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणीस सुरुवात होईल आणि जून-जुलै महिन्यापर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाईल.

डिसेंबर महिन्यात सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू होत असताना, आरटीई प्रवेशप्रक्रियेच्या मुहूर्ताला मात्र विलंब होत होता. मात्र यंदा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रिया डिसेंबर महिन्यातच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १५ डिसेंबर रोजीच पूर्वतयारी कार्यशाळा घेण्यात येणार आहे, जी पूर्वी १५ जानेवारीला नियोजित होती. विशेष म्हणजे, अंतिम प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्याची अंतिम तारीख १० एप्रिलऐवजी १० मार्च करण्यात आली आहे.

२०२४-२५ शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रिया अनेक कारणांमुळे लांबली होती. आधी चुकीच्या निर्णयांमुळे, नंतर न्यायालयीन प्रकरणांमुळे आणि पुनप्रक्रियेमुळे वेळेत प्रवेश न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. शाळांनाही २५ टक्के जागांवर प्रवेश देण्याचा ताण सहन करावा लागला, आणि पालकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे यंदा तरी प्रवेशप्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती.

गेल्या वर्षाचा अनुभव:
अमरावती जिल्ह्यातील २३२ शाळा आरटीई प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या होत्या. या शाळांमध्ये २३९६ जागांसाठी ६६२६ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २३०० विद्यार्थ्यांची सोडत निघाली, मात्र फक्त १५१३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. अनेक जागा रिक्त राहिल्या. यंदा मात्र प्रक्रिया एक महिना आधी सुरू होणार असल्याने उर्वरित जागांवरील प्रवेशही व्यवस्थित होण्याची शक्यता आहे. यासाठी शिक्षण विभागाने शाळांना नोंदणीसाठी आवाहन केले आहे.


शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही जागा रिक्त राहिल्या आहेत. आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नसून, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही जागा रिक्त राहिल्या आहेत. आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नसून, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.

 

सुरुवातीला २३ ते ३१ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी मुदत देण्यात आली होती- मात्र प्रवेशाचा टक्का कमी असल्याने आधी ५ ऑगस्टपर्यंत आणि त्यानंतर ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र गुरुवारी सायंकाळपर्यंत ५९ हजार ११२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यामुळे जवळपास ४५ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. याबाबत माहिती देताना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, आरटीईच्या प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. रिक्त जागांचा आढावा घेऊन प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून येत्या दोन ते तीन दिवसांत स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील.

 


 

 

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेतील ५० हजारांहून अधिक जागा अजूनही रिक्त असून प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी ८ ऑगस्टपर्यंत संधी मिळाली आहे.

यंदा राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी २ लाख ४२ हजार ५१६ अर्ज दाखल झाले होते त्यातन ९३ हजार ९ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले. सुरुवातीला शिक्षण विभागाने या प्रवेशासाठी २३ ते ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधीत ३९ हजार ४०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यानंतर ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर प्रवेश घेणाऱ्यांची संख्या ५३ हजार २०० पर्यंत पोहोचली आहे

 


RTE अंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन लॉटरीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या ९३ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी कागदपत्रे पडताळणी पूर्ण केली असून शाळांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. प्रवेश घेण्यासाठी आज सोमवारी (दि.५ ऑगस्ट) शेवटची संधी असून त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद!

राज्यात आरटीई अंतर्गत ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ रिक्त जागांसाठी २ लाख ४२ हजार ५१६ अर्ज प्राप्त झाले होते. २० जुलै रोजी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी निवड झालेल्या ९३ हजार ९ विद्यार्थ्यांची यादी आरटीई पोर्टलवर  २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ रिक्त जागांसाठी २ लाख ४२ हजार ५१६ अर्ज प्राप्त झाले होते. २० जुलै रोजी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी निवड झालेल्या ९३ हजार ९ विद्यार्थ्यांची यादी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर दि. २३ जुलैपासून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी आणि प्रवेश निश्चित करण्यास सुरुवात झाली. राज्यातील अनेक जिल्ह्यांत दि.२५ आणि २६ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून प्रवेश घेण्यासाठी मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. प्रतीक्षा यादीतील ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी देण्यात येणार आहे.


 

त्यामुळे बालकांच्या प्रवेशासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पालकांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. ही शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण णि विभागातर्फे दरवर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत शुक्रवारी काढण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
राज्यातील नऊ हजार २१७ शाळांमधील एक लाख पाच हजार ३९९ जागांवरील प्रवेशासाठी दोन लाख ४२ हजार ९९७ अर्ज आले आहेत. प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बालकांच्या पालकांची उत्सुकता आता संपणार आहे. ऑनलाइन सोडत जाहीर झाल्यानंतर प्रवेश मिळालेल्या बालकांच्या प्रवेश अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्रवेशाबाबत मेसेज पाठविण्यात येईल. तसेच आरटीई पोर्टलवरही बालकांच्या लॉगिनमध्ये प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेचा तपशील दिसू शकणार आहे

अधिक माहितीसाठी: https://student.maharashtra.gov. in/adm_portal/Users/rte_index_new

RTE Admission Process 2024

आरटीई कायद्यातील जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त जागांवर प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाइन माध्यमातून प्रवेश अर्ज करण्यास पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. दि. २९ मे रोजी रात्री ८ वाजेपर्यंत आरटीई पोर्टलवर दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून, अर्ज करण्यासाठी आता शेवटच्या दोन दिवसांचा कालावधी उरला आहे. 

आठवडाभरात आरटीईचे दी लाख अर्ज प्राप्त राज्य शासनाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त जागांवर दि. १७ मे पासून ऑनलाइन प्रवेश अर्जास सुरुवात झाली. गत एक आठवड्यात १ लाख ५६ हजारपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत.

आरटीईच्या जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त २५ टक्के जागांची माहिती आरटीई पोर्टलवर अद्ययावत करीत पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू होताच पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. शुक्रवार दि. २४ मे रोजी रात्री आठ वाजेपर्यंत १ लाख ५६ हजार ५५० अर्ज प्राप्त झाले होते. तर पुणे जिल्ह्यांत १७ हजार ५९६ रिक्त जागांसाठी सर्वाधिक रिक्त जागांच्या दुप्पट ३३ हजार अर्ज आले होते. पालकांना येत्या ३१ मे पर्यंत https://student.maharashtra.g ov.in/adm_portal संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज करता येणार आहेत.

राज्यातील ९ हजार १९७ शाळांमध्ये १ लाख ४ हजार ७३५ जागा रिक्त आहेत. त्यासाठी पहिल्या आठ दिवसातच दीड लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. पुढील एक आठवड्याच्या कालावधीत सरासरी तेवढेच अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर नियमाप्रमाणे यंदाही लॉटरी पध्दतीने विद्यार्थ्यांची निवड करावी लागणार आहे.

  • राज्य शासनाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. शिक्षण विभागाने आरटीईच्या जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त २५ टक्के जागांची माहिती आरटीई पोर्टलवर अद्ययावत केली आणि दि. १७ मेपासून नव्याने ऑनलाइन माध्यमातून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली.
  • पहिल्या चार दिवसांतच प्रवेश अर्जानी एक लाखांचा टप्पा गाठला होता. एक आठवड्यानंतर दि. २४ मेपर्यंत दीड लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर दि. २९ मे रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अर्जांची संख्या २ लाख १ हजार ३८३ एवढी झाली होती.
  • राज्यातील ९ हजार १९७ शाळांमध्ये १ लाख ४ हजार ७३५ जागा रिक्त आहेत. पालकांना येत्या ३१ मेपर्यंत https://student.maharashtra.g ov.in/adm_portal संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज करता येणार आहेत.
  • अर्ज करण्यासाठी मुदतवाढीची शक्यता? – राज्य शासनाने केलेल्या आरटीईतील बदलामुळे पालकांना दोन वेळा प्रवेश अर्ज करण्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. जुन्या नियमानुसार अर्ज करण्यास येत्या ३१ मेपर्यंत मुदत दिली असून, शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत… पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आणखी काही दिवस मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
  • या जिल्ह्यांत सर्वाधिक अर्ज
    • जिल्हा | रिक्त जागा | प्राप्त अर्ज (दि. २९ मेपर्यंत)
    • पुणे – १७ हजार ५९६ – ४१ हजार १५०
    • नागपूर – ६ हजार ९२० – १७ हजार ८१९ ११ हजार ३७७ १६ हजार ४९४ ४ हजार ४५१ १२ हजार ३८० ५ हजार २७१ १२ हजार १६४
    • ठाणे – ११ हजार ३७७ – १६ हजार ४९४
    • छत्रपती संभाजीनगर – ४ हजार ४५१ – १२ हजार ३८०
    • नाशिक – ५ हजार २७१ – १२ हजार १६४

???? अर्ज करा

 

image not found RTE २५% ऍडमिशन साठी पालकांकरीता सूचना: Click Here to download

पालकांकरीता सूचना (2024-2025)

1)  आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2024-2025  या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.

2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

3)  आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.

4) १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.

5) अर्ज भरत असताना  आवश्यक कागदपत्र   पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.

7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे  २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे  दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज  लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

8)  अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला  मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.

10) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .

11) RTE २५ % प्रवेश 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30/04/2024 पर्यंत राहील.

12) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

13) सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .

14) सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

15) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

16) जर तुम्हाला १ किमी च्या अंतरावर अनुदानित/सरकारी शाळा उपलब्ध असल्यास तुम्हास Self Finanace school सिलेक्शन साठी उपलब्ध नसेल व Self Finanace school not available असा मेसेज दिसेल.

 

image not found बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtemah2020@gmail.com OR educom-mah@mah.gov.in वर इमेल पाठवावा.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड