‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया यंदा लांबणीवर!

RTE Admission 2020

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव आरक्षित 25 टक्के जागांवर राबवण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया यंदा लांबणीवर पडली आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जिल्हा परिषद व महापालिकेच्या शिक्षण विभागास अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. गेल्या वर्षी निम्म्या जागा रिक्त राहिल्या आहेत.

 

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक व दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या 25 टक्के आरक्षित जागांवर गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जातात. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी राखीव 25 टक्के जागांवर प्रवेश प्रक्रियेंतर्गत शाळा नोंदणी प्रक्रियेबाबत शिक्षण विभागास अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. दरवर्षी डिसेंबर महिन्यात शाळांच्या नोंदणीस सुरुवात होते. मात्र, मागील वर्षापासून प्रवेश प्रक्रियेला उशीर होत आहे.

 

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी शाळा व पालकांना अपेक्षा होती. परंतु, प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याविषयी शिक्षण विभागाला कोणत्याही सूचना नाहीत. गेल्यावर्षी ‘आरटी’ प्रवेश प्रक्रिया मार्च महिन्यापर्यंत लांबल्यामुळे प्रत्यक्ष ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सप्टेंबरपर्यंत सुरू राहिली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी ज्या शाळेत प्रवेश मिळाला तेथेच प्रवेश निश्चित करून घेतला. त्यामुळे ‘आरटीई’अंतर्गत जिल्ह्यात अनेक प्रवेश जागा रिक्त राहिल्याचे दिसून येत आहे.

 

अद्याप सूचना नाहीत…

शाळांच्या नोंदणीसंदर्भात कुठल्याही प्रकारचे शासनाकडून पत्र व आदेश प्राप्त झालेले नाहीत. प्रवेश प्रक्रियेंतर्गत शाळा नोंदणीनंतर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल. याचे प्रत्यक्ष वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप