रेल्वे भरती मंडळाने (RRB) आज एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. या नवीन नोटिफिकेश नुसार दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी दुसऱ्या सत्रात घेण्यात आलेली JE CBT-2 परीक्षा रद्द केली आहे. उमेदवार अधिकृत RRB वेबसाईटवर ही नोटीस पाहू शकतात. सॉफ्टवेअर च्या त्रुटी मुले हि परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचं कारण सांगण्यात येत आहे. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लवकरच महाभरतीवर प्रकाशित करू.

ही परीक्षा रद्द करण्यामागचं कारण असं आहे की, सॉफ्टवेअर प्रणालीतील एका चुकेमुळे पहिल्या सत्रातील काही प्रश्न दुसऱ्या सत्रातही आले होते. त्यामुळे पारदर्शकता आणि विश्वासार्हतेसाठी परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. अधिकृत नोटीसमध्ये म्हटलंय की, “RRB परीक्षा प्रक्रियेत पूर्ण गोपनीयता राखण्यासाठी प्रश्नपत्रिकेचं तयार करणं, प्रक्रिया, साठवण, एनक्रिप्शन आणि व्यवस्थापन पूर्णपणे सॉफ्टवेअर आधारित आहे. मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी या प्रणालीवर भर दिला जातो.”
ही CBT-2 परीक्षा २२ एप्रिल रोजी झाली होती. त्याची उत्तरतालिका (Answer Key) देखील प्रसिद्ध करण्यात आली असून, हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२५ आहे. प्रत्येक प्रश्नासाठी हरकतीसाठी रु.५०/- शुल्क आणि बँक सेवा शुल्क लागू होईल. जर हरकत योग्य आढळली, तर उमेदवाराला हे शुल्क परत दिलं जाईल. दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरलेले उमेदवार दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जातील. यासाठी सामान्यीकृत गुणांच्या आधारे उमेदवारांची यादी तयार केली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी RRB च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















