JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

मोठी बातमी: प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये बदल; नवीन GR डाउनलोड करा !! – Revised Rules For Pradhyapak Bharti In Maharashtra

Revised Rules For Pradhyapak Bharti In Maharashtra: प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये बदल  राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने चार महिन्यांतच पुन्हा एकदा बदल केला आहे. नव्या निकषांनुसार उमेदवारांच्या शैक्षणिक आणि संशोधन गुणवत्तेला ६० गुण, अध्यापन कौशल्य मूल्यमापनाला २० टक्के गुण आणि मुलाखतीसाठी २० टक्के गुण दिले

राज्यातील १,१७२ महाविद्यालयांत ५,०१२ सहायक प्राध्यापक पदांची भरती!! – Pradhyapak Bharti 2026

प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये बदल 

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये नियमित प्राध्यापक भरतीसंदर्भातील सुधारित अध्यादेश अखेर जाहीर करण्यात आला आहे. या नव्या तरतुदीनुसार उमेदवारांचे मूल्यमापन तीन प्रमुख निकषांवर केले जाणार असून शैक्षणिक व संशोधन गुणवत्ता यासाठी ६० गुण, अध्यापन कौशल्य परीक्षणासाठी २० गुण आणि मुलाखतीतील कामगिरीसाठी २० गुण असे एकूण १०० गुणांचे विभाजन निश्चित करण्यात आले आहे.

याशिवाय पीएच.डी. व एम.फिल. धारकांना स्वतंत्र गुण देण्यात येणार आहेत. तसेच नेट-जेआरएफ, फक्त नेट आणि सेट पात्र उमेदवारांसाठी वेगवेगळ्या गुणांची तरतूद करण्यात आली आहे. तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्य केलेल्या प्राध्यापकांचा अध्यापन अनुभवही ग्राह्य धरला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यपाल कार्यालयाकडून प्राप्त निर्देशांच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी हा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र, शिक्षण क्षेत्रातून काही आक्षेप नोंदवले गेल्याने त्यात सुधारणा करून नव्याने अधिसूचना काढण्यात आली आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील गुणांनाही महत्त्व देण्यात आले असून संबंधित उमेदवाराने मिळवलेल्या टक्केवारीनुसार त्यांचे मूल्यांकन होणार आहे. त्यामुळे शैक्षणिक कारकिर्दीत उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेत निश्चितच लाभ होणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागउच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापकांच्या भरती प्रक्रीयेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपध्दती विहित करण्याबाबत.20260211141644110811-02-2026201Download

राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीसाठी राज्य सरकारने अखेर मान्यता दिली आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या भरती प्रक्रियेस मार्ग मोकळा झाला आहे. सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी नव्या गुणांकन पद्धतीनुसार निवड केली जाणार आहे.

 

नवीन प्रक्रियेनुसार, उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनास ८० टक्के गुण, तर मुलाखतीसाठी २० टक्के गुण दिले जाणार आहेत. तसेच, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निवड समितीच्या बैठकांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे.

गेल्या काही वर्षांत प्राध्यापक पदांसाठी पैसे मागितल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. तसेच, गुणवत्ताधारक उमेदवारांऐवजी कमी पात्र उमेदवारांची निवड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नवीन कार्यपद्धतीमुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता राहील, असे सरकारचे म्हणणे आहे.

निवड प्रक्रियेत उमेदवारांच्या अध्यापन क्षमतेचे आणि संशोधन प्रावीण्याचे मूल्यमापन केले जाईल. त्याचबरोबर परिसंवाद, व्याख्यान प्रात्यक्षिक, तसेच अध्यापन व संशोधनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवर चर्चा होईल. १०० गुणांच्या एकत्रित मूल्यांकनात किमान ५० टक्के गुण मिळवणारे उमेदवारच अंतिम निवडीसाठी पात्र ठरणार आहेत.

यापुढे राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये याच कार्यपद्धतीनुसार भरती होणार आहे. निवड समितीच्या बैठकांचे चित्रीकरण करून त्यास सीलबंद ठेवले जाईल. तसेच, प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी निवड समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड