JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या बढतीचा मार्ग मोकळा; खातेनिहाय परीक्षा देणाऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा! | Mantralaya Employees Promotion

मंत्रालयातील खातेनिहाय परीक्षा उत्तीर्ण होऊनही पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. त्यांच्या बढतीचा मार्ग आता उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे मोकळा झाला आहे. पोलिस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रमाणेच मंत्रालयातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही काळापासून रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षण आणि सेवाज्येष्ठतेचा वाद न्यायालयात पोहोचला असून, त्याचे पडसाद आता मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बढती प्रक्रियेवरही उमटत आहेत. पोलीस खात्यात खातेनिहाय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आरक्षित प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी त्यांची नियुक्तीची तारीख ग्राह्य धरण्यात यावी, असा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला होता. मात्र, या निर्णयाला खुल्या प्रवर्गातील पोलीस कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) आव्हान दिले. त्यानंतर मॅटने राज्य सरकारचा संबंधित शासन निर्णय रद्द केला. या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, न्यायालयाने मॅटच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

पदोन्नतीचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असतानाही मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी राज्य शासनाने अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात बढती दिली होती. आता याच निर्णयाचा आधार घेत मंत्रालयातील अधिकाऱ्यालाही पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणेच आपल्यालाही न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार बढती देण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या मंत्रालयातील अतिरिक्त कक्ष अधिकाऱ्याच्या बाजूने उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.

मनुष्यबळाच्या अभावामुळे राज्य शासनाने खुल्या आणि आरक्षित प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती दिली होती. ही पदोन्नती न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. याच आदेशाचा आधार घेत मंत्रालयातील एका अतिरिक्त कक्ष अधिकाऱ्याने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. पोलिसांप्रमाणेच आपल्यालाही अंतरिम आदेशाचा लाभ देऊन अतिरिक्त कक्ष अधिकारी पदावरून कक्ष अधिकारी पदावर बढती द्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. न्या. सुमन शाम आणि न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्याची मागणी मान्य करत त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याचे अंतरिम आदेश दिले. या प्रकरणातील मूळ याचिकांवर २४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

लाभ देण्यास हरकत नाही

खातेनिहाय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पोलिसांना तात्पुरती बढती देण्यात आली आहे. याप्रमाणे मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचा लाभ देण्यात काहीच हरकत नाही. कारण मूळ जीआरनुसार हा लाभ मागितलेला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

बढतीतील आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित

सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा मुद्दा अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला असतानाच, त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मागास प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बढतीमध्ये आरक्षण द्यावे की नाही, हा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र, शासनाच्या या निर्णयालाही आक्षेप घेण्यात आल्याने प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. यासंदर्भात वरिष्ठ वकील अनिल साखरे आणि अॅड. प्रशांत नागरगोजे यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आल्या असून, त्यावर सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड