पुणे महापालिकेतील भरती निकाल, पडताळणी पूर्ण परंतु नियुक्ती आदेश रखडले! – Result PMC Bharti @pmc.gov.in

Pune Mahanagarpalika Bharti Result

पुणे महापालिकेतील १६९ कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीतील अडथळे संपण्याचे नाव घेत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारात या भरतीच्या पुढील टप्याची वाट बघत आहेत. आपल्याला माहीतच असेल या भरतीतील उमेदवारांची परीक्षा झाली, निवड यादी जाहीर झाली, कागदपत्रांची छाननीदेखील झाली. तरीही गेल्या जवळपास तीन आठवड्यांपासून या अभियंत्यांच्या महापालिकेत नियुक्तीचे आदेश काढण्यात आलेले नाहीत. या भरती प्रक्रियेवर काही जणांनी आक्षेप घेतल्याने प्रशासनाने सर्व प्रक्रिया ठप्प केली आहे. महापालिकेत कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता असल्याने त्याचा परिणाम कामावर होत आहे. महापालिकेने २०२२मध्ये १३५ कनिष्ठ अभियंत्यांची भरती प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर ११३ जागांसाठी नवीन जाहिरात काढून त्यावर अर्ज मागविले होते; पण ही भरती आधी लोकसभा निवडणूक, नंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत रखडली. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्वरित परीक्षा होईल असे सांगितले जात होते. मात्र, त्यात ११३ मध्ये आणखी ५६ जागांची भर घालून १६९ जागांची भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पुन्हा एकदा अर्ज मागविण्यात आले होते. यानंतर परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या; पण परीक्षेच्या दिवशी नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका असल्याने उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्यास भाग पाडले. त्यानंतर जानेवारी महिन्यात परीक्षेची तारीख जाहीर केली. त्यावेळी परीक्षा केंद्र चुकीचे असणे, वादग्रस्त परीक्षा केंद्र निवडणे, अशा तक्रारी केल्याने पुन्हा ऐन वेळी परीक्षा रद्द करावी लागली.

कनिष्ठ अभियंता भरती ही जवळपास तीन वर्षांत चार वेळा पुढे ढकलली. त्‍यानंतर एप्रिल महिन्यात राज्यातील विविध शहरांमध्ये ‘आयबीपीएस’ संस्थेच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा पार पडली. त्यानंतर जून महिन्यात या परीक्षेचा निकाल लागला. त्यात ५४५ उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी महापालिकेत बोलविण्यात आले. २४ ते ३० जून या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी पार पडली. त्यानंतर पुढील आठवडाभरात अंतिम निवड यादी जाहीर होण्याची शक्यता होती. ‘आयबीपीएस’द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत बोगस उमेदवार होते. एकाच नावाच्या अनेक व्यक्ती यात उत्तीर्ण झाल्या आहेत. ही भरती पारदर्शक झालेली नाही, असे आरोप करण्यात आले. त्यावर अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही अनेकांनी या परीक्षेबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अंतिम निवड ठप्प झाली आहे. आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण झालो आहोत, पण कोणी तरी तक्रार करत असल्याने पुढची प्रक्रिया थांबवून ठेवली आहे. या तक्रारीचा निपटारा लवकर करून अंतिम निवड यादी जाहीर करावी. गेल्या तीन वर्षांपासून कायम अडथळे आणले जात आहेत.


Pune Mahanagarpalika Bharti Result: महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या पदाच्या एकूण १६९ जागांसाठी घेतलेल्या भरती परीक्षेचा निकाल अखेर मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. महापालिकेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध केला असून, गेल्या अनेक महिन्यांपासून निकालाची वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवेद्वारे भरण्यासाठी सुधारित जाहिरात क्र. १/१५७९, दि. ०१/१०/२०२५ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुषंगाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३, या पदाची दि.२२/०४/२०२६, दि.२३/०४/२०२६ व दि. २९/०४/२०२६ या ०३ दिवसात महाराष्ट्रातील विविध शहरात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली आहे. सदरील परीक्षेचा निकाल पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. ०९/०६/२०२६ रोजी जाहीर करण्यात आला असून, https:///www.pmc.gov.in यावर हा निकाल पाहता येणार आहे.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३, या पदाकरिता कागदपत्रे तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी अलाहिदा पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
सदर भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व गुणवत्तेवर आधारित असून कोणत्याही उमेदवाराने नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही मध्यस्थ, दलाल, किंवा तोतया व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. कोणी व्यक्ती नोकरीसंदर्भात खोटे दावे करत असल्यास, पैसे मागणी अथवा खोटी माहिती देत असल्यास अशा प्रकरणाची माहिती तात्काळ प्रशासनास द्यावी. अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडल्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ सरळसेवा भरती – निकाल 


Pune Mahanagarpalika Bharti Result

महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६९ जागांच्या भरती परीक्षेचा निकाल आदर्श आचारसंहितेत अडकला आहे. दुसरीकडे परीक्षा दिलेल्या उमेदवारांकडून सातत्याने निकालाबाबतची विचारणा केली जात आहे. स्थानिक निवडणूक विभागाकडून महापालिकेला स्पष्ट निर्देश दिले जात नसल्याने पालिकेची कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून मार्गदर्शनाची विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेत अभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे कामकाजावरही परिणाम होत आहे. यामुळे लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी होत आहे.


Pune Mahanagarpalika Bharti Result

MSU अंतर्गत विविध पदांसाठी मनुष्यबळ भरती करिता दि. २८.०३.२०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व सदर जाहिरातीची अंतिम तारीख दि. १६.०४.२०२५ अशी होती. प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून दि. २४.०६.२०२५ रोजी प्रारूप पात्र/अपात्र यादी पुणे महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. तदनंतर अर्जदारांचे आक्षेप / हरकती नोंदविण्यासाठी दि. ०१.०७.२०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. दि. २२/०८/२०२५ रोजी अंतिम निवड व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. २२/०८/२०२५ प्रसिद्ध केलेल्या यादी मधील Assistant Public Health Specialist पदांच्या यादी मध्ये बदल झाल्याने सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

सुधारित Assistant Public Health Specialist पदाची यादी


 

 PMC Clerk Result 2026

Organization Pune Municipal Corporation
Post NameClerk
Vacancies 200
StateMaharashtra
Application Form Start Date 
Online Application Form Last Date 
Admit Card Release Date 
Exam Date
Result Date
Selection Process Written Exam, Typing Test & Document Verification
Official Website https://pmc.gov.in/

How To Check The PMC Clerk Typist Result?

  • पुणे महापालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://pmc.gov.in/ ला भेट द्या
  • पीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर, तुमच्यासमोर पॉप-अपवर भरती चा पर्याय असेल, त्यावर क्लिक करा.
  • आता, लिपिक परीक्षेच्या निकालासाठी एक पर्याय तुमच्यासमोर असेल, त्यावर टॅप करा आणि PDF गुणवत्ता यादी डाउनलोड करा
  • पीडीएफ फाइल उघडा आणि तुमचा रोल नंबर, नोंदणी क्रमांक किंवा उमेदवाराचे नाव शोधा आणि तुम्ही टायपिंग चाचणीसाठी पात्र आहात की नाही ते तपासा.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड