राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या अटी आणि हक्कांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. विविध शासकीय विभागांसह महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना लवकरच किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी, सुरक्षेसाठी विमा आणि विशेष पगारवाढ म्हणून भत्ता मिळणार आहे. या संदर्भातील धोरण निश्चित करण्याची जबाबदारी मनपा प्रशासक जी. श्रीकांत आणि सचिव सौरभ राव यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पुण्यात यशदा येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या विषयावर चर्चा झाली. लवकरच मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करून हे धोरण अंतिम केले जाणार आहे.
सध्या राज्यातील अनेक शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या सेवानिवृत्ती व इतर कारणांमुळे घटत आहे. परिणामी कंत्राटी भरतीची गरज वाढली असली तरी, एकत्रित धोरण नसल्याने स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवावी लागते. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळत नाही, वेतन वेळेवर मिळण्यात अडथळे येतात, तसेच कोणत्याही सुविधा न मिळाल्याने एजन्सीकडून पिळवणूकही होते.
या पार्श्वभूमीवर कंत्राटी भरतीसाठी स्वतंत्र नियमावली (SOP) तयार केली जात असून, त्यात किमान वेतन कायदा, सुरक्षा विमा, भत्ता आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी जबाबदारी निश्चिती यांसारख्या तरतुदी असतील. या धोरणामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक आणि सामाजिक संरक्षण मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















