Agniveer Rally Chandrapur – भारतीय लष्कराच्या ‘अग्निवीर भरती मोहीम २०२७’ अंतर्गत दक्षिण मुख्यालय आणि भरती संचालनालयाच्या वतीने विसापूर (जि. चंद्रपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात लष्कर भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या ‘अग्निवीर भरती मोहीम २०२७’ अंतर्गत दक्षिण मुख्यालय आणि भरती संचालनालयाच्या वतीने विसापूर (जि. चंद्रपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात लष्कर भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ते १६ ऑक्टोबर २०२६ दरम्यान चालणाऱ्या या भरती रॅलीला पूर्व महाराष्ट्रासह राज्यभरातून तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या भरती रॅलीमध्ये ऑनलाइन मध्यवर्ती प्रवेश परीक्षा (CEE) उत्तीर्ण झालेले सुमारे आठ हजार ५०० उमेदवार सहभागी होत आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांतील सर्व जिल्ह्यांमधील ‘अग्नवीर लिपिक’ पदासह विविध अग्निवीर संवर्गांसाठीच्या उमेदवारांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना शारीरिक चाचणीसह विविध टप्प्यांतून जावे लागत आहे. मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी होत असल्याने लष्करासह जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये मैदानावर वैद्यकीय मदत कक्ष, पिण्याचे पाणी, गर्दी नियंत्रणासाठी विश्राम क्षेत्र, मोबाईल स्वच्छतागृह आणि स्वच्छता व्यवस्था यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या भरती रॅलीमध्ये उमेदवारांची उपस्थिती तब्बल ९० टक्क्यांहून अधिक नोंदवली गेली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















