भारतीय टपाल विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या 21,413 रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. त्यापैकी गोव्यात 73 पदे रिक्त असून, या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री डॉ. प्रम्मासानी चंद्रशेखर यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी यासंदर्भात अतारांकित प्रश्न विचारला होता.
चंद्रशेखर यांच्या उत्तरानुसार, गोव्यासाठी एकूण 407 ग्रामीण डाक सेवक पदे मंजूर करण्यात आली आहेत. 230 पदे उत्तर गोव्यात, तर 177 पदे दक्षिण गोव्यात आहेत. सध्या उत्तर गोव्यात 35 आणि दक्षिण गोव्यात 38 पदे रिक्त आहेत.
ग्रामिण डाक सेवकाच्या दीर्घ अनुपस्थितीबाबत नियम:
- जर ग्रामीण डाक सेवक 45 दिवसांहून अधिक सुटीवर असेल, तर त्या जागी दुसऱ्या उमेदवाराची नेमणूक केली जाते.
- सध्या टपाल खात्यात 36 बदली उमेदवार कार्यरत आहेत.
- ग्रामिण डाक सेवक भरती विविध प्रक्रियेद्वारे केली जाते.
21,413 पदांची भरती ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे.
संविधानाच्या कलम 16(2) नुसार जात, धर्म, पंथ, लिंग किंवा प्रदेश या आधारांवर कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
नोकरीच्या संधीसाठी पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे!
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















