RBI परीक्षा मराठीसह अन्य 16 भाषांतून होणार!
RBI Recruitment
RBI Recruitment : परीक्षार्थींनी केंद्रीय स्तरावरील परीक्षा मराठीतून घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारच्या मराठी विभागाने मराठीतून परीक्षा घेण्याची विनंती केली होती. त्या पाठपुराव्याला यश आले आहे. ‘आरबीआय’मधील हजेरीसहायक या पदाची परीक्षा मराठीमधून देण्याची संधी महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थींना मिळणार आहे.
मराठीसह अन्य १६ भाषांतून ही परीक्षा होणार आहे. मराठी आणि कोंकणी भाषेतून परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याने परीक्षार्थींनी समाधान व्यक्त केले. परीक्षा केंद्रे नागपूर विभागात नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर येथील केंद्रावर ही परीक्षा होईल. तसेच मुंबई विभागात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सातारा केंद्रांवर परीक्षा होईल.
RBI Recruitment 2021: भारतीय रिझर्व्ह बँकेत (आरबीआय) नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सध्या सुवर्णकाळ सुरू आहे. बँकेत ज्युनिअर इंजिनीअर, ग्रेड बी ऑफिसर, सिक्युरिटी गार्ड पदांवर भरती प्रक्रिया सुरू असतानाच नोकरभरतीची एक आणखी जाहिरात आली आहे. १० फेब्रुवारी रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. लीगल ऑफिसर (ग्रेड बी), मॅनेजर (टेक-सिव्हिल), असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) आणि असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी) या पदांवर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
भारतीय रिजर्व बँकेत नोकरीची संधी – 642 पदे
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
इच्छुक उमेदवार बँकेचे अधिकृत संकेतस्थळ rbi.org.in वर उपलब्ध करण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जाच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. उमेदवार १० मार्च २०२१ पर्यंत आपला अर्ज सादर करू शकतात.
RBI Recruitment Vacancy Details – पदांची नावे
- लीगल ऑफिसर (ग्रेड बी) – ११ पदे
- मॅनेजर (टेक-सिव्हिल) – १ पद
- असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) १२ पदे
- असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी) – ५ पदे
- एकूण पदे – २९
How to Apply – अर्ज कसा करायचा?
आरबीआयच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर करिअर सेक्शनवर जावे. यानंतर २३ फेब्रुवारी या तारखेसह उपलब्थ करण्यात आलेल्या अप्लाय ऑनलाइन लिंकवर क्लिक करावे. यानंतर नव्या पेजवर विचारलेली माहिती भरून नोंदणी करावी. यानंतर रजिस्ट्रेशन क्रमांक किंवा यूजर नेम आणि पासवर्डसह लॉगइन करून अॅप्लिकेशन सबमिट करावे.
सोर्स : म. टा.
Table of Contents
Sir,
Ya job chi interview kuthe ahe
Raigad madhe vacancies ahet ka
Sir,
Ya job chi interview kuthe ahe
I want job data entry