रेशन कार्ड रद्द करण्याची कारवाई सुरू पुरवठा विभागाची कडक कारवाई; नागरिकांनी सावध राहा! | Ration Scam Halted! Cards to Be Cancelled!
Ration Scam Halted! Cards to Be Cancelled!
सध्या शहरात काही लोकांकडून रेशनचं धान्य विकत घेऊन ते खुल्या बाजारात विकले जात असल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या प्रकारामुळे गरजूंना स्वस्त दरात मिळणारे हे अन्नधान्य अधिक पैसे मिळवण्यासाठी गैरमार्गाने खरेदी-विक्री होत आहे. यामुळे धान्य तस्कर अधिक सक्रिय झाले असून गरीब आणि गरजू लोकांच्या हक्काच्या धान्याचा अपहार होत आहे. या मुके ऍन पुरवठा विभागानं धडक कारवाईचा आदेशदीला असून सरळ रेशन कार्डच रद्द कारण सुरु केलं आहे. खरं तर हा एक स्तुत्य उपक्रम विभागाने सुरु केलं आहे. कारण गर्जून पर्यंत सुविधा पोहचणं आवश्यक आहे. तसेच योजनांचा गैरफायदा घेणारे बाहेर निघणे आवश्यक आहे!!
पुरवठा विभागाची कारवाई – दोन ठिकाणी धाड, शेकडो पोती जप्त!
या प्रकारांवर शहर पुरवठा विभागाने कडक पावले उचलली आहेत. अन्न सुरक्षा व पुरवठा विभागाने बंगाली पंजा आणि ताजनगर परिसरात धाड टाकून शेकडो पोती धान्य जप्त केले आहे. ही धान्यसाठवणूक बेकायदेशीर आणि अन्यायकारक होती. या कारवायांमुळे अशा धान्यतस्करांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कार्ड रद्द होण्याचा धोका – नागरिकांनी सावधगिरी बाळगावी!
पुरवठा विभागाने जाहीरपणे सांगितले आहे की, कोणी रेशनचं धान्य जाणीवपूर्वक विकताना आढळल्यास त्या लाभार्थ्याचं रेशन कार्ड रद्द करण्यात येईल. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांनी थोड्या पैशांसाठी आपले हक्काचे धान्य विकू नये, अन्यथा भविष्यात कायमचे रेशन बंद होऊ शकते.
तीन महिन्यांचे धान्य एकत्र मिळत असल्याने साठेबाजी वाढली!
राज्य शासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एकाचवेळी तीन महिन्यांचे रेशन वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काहींना अधिक धान्य मिळालं असलं तरी, त्याचा गैरवापर करून साठेबाजी आणि खुले बाजारात विक्रीचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी धान्य विकत घेणारे एजंट वस्त्यांमध्ये फिरताना दिसत आहेत.
गरीबांची गरज, तस्करांचा फायदा – गैरवर्तनाचा आहेर!
धान्य विकत घेणारे एजंट गरीबांना काही रकमेचा मोह दाखवून त्यांच्याकडून धान्य उचलत आहेत. गरिबीमुळे काही जण आपलं हक्काचं धान्य विकण्यास तयार होतात आणि तस्कर त्याचा गैरफायदा घेतात. हे धान्य नंतर खुल्या बाजारात जास्त दराने विकले जाते, जे पूर्णपणे गैरकायदेशीर आहे.
रेशनचे धान्य पोषणमूल्यांनी युक्त – विकू नका, वापरा!
शासकीय रेशन दुकानांमध्ये मिळणाऱ्या तांदळामध्ये आयर्न, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन बी-१२, बी-१, बी-३ आणि व्हिटॅमिन-ए अशा १२ प्रकारच्या जीवनसत्त्वांचा समावेश असतो. त्यामुळे हे धान्य पौष्टिक व आरोग्यदायी आहे. हे स्वतःच्या कुटुंबासाठी वापरणेच अधिक हितावह आहे, विक्री करून आरोग्याशी तडजोड करू नये.
नागरिकांनी सहकार्य करावे – तस्करी रोखणे सर्वांची जबाबदारी!
शहर पुरवठा विभागाचे अधिकारी विनोद काळे यांनी आवाहन केले आहे की, नागरिकांनी रेशनचे धान्य विकू नये आणि अशा प्रकारांची माहिती प्रशासनाला द्यावी. तस्करांवर कारवाई सुरूच राहणार आहे आणि आवश्यक असल्यास गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू केली जाईल.
निष्कर्ष – रेशन तस्करी रोखण्यासाठी जनजागृती आणि कठोर कारवाई दोन्ही आवश्यक!
गरिबांच्या अन्नसुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या रेशनसारख्या योजना यशस्वी होण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, प्रशासन व पुरवठा विभाग यांचं समन्वय महत्त्वाचा आहे. धान्यतस्करांविरुद्ध कठोर कारवाई आणि लाभार्थ्यांनी आपली जबाबदारी ओळखणे हेच या संकटावर उपाय आहे.