पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा २०२५ अपडेट– महत्वाची माहिती! | Pune University Summer Exams timetable – Important Updates!
Pune University Summer Exams schedule– Important Updates!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र मार्च-एप्रिल २०२५ परीक्षांचे आयोजन २५ मार्चपासून करण्यात आले आहे. या अंतर्गत पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत पार पडतील. प्रत्येक अभ्यासक्रमानुसार परीक्षा वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
उत्तरपत्रिका तपासणी वेगाने होणार
परीक्षा सुरू होताच मान्यता प्राप्त केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प केंद्रांमध्ये (CAP) उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू केली जाईल. यामुळे निकाल लवकर लागण्यास मदत होईल. तसेच, महाविद्यालयांचे प्राचार्य आणि संचालक यांना परीक्षा आयोजनासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गुण नोंदणीसाठी सुरक्षित प्रणाली
विद्यापीठस्तरावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी विविध सत्रांतर्गत गुण स्वीकृती प्रणालीसाठी परीक्षा विभागाने सुरक्षित एक्सेल शीट उपलब्ध करून दिली आहे. महाविद्यालयांना ही शीट वापरून गुण विद्यापीठाच्या प्रणालीत अपलोड करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
महाविद्यालय स्तरावर होणाऱ्या परीक्षा
कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावरच घेतल्या जातील. परीक्षांचे वेळापत्रक तयार करणे, प्रश्नपत्रिका निर्माण करणे, परीक्षा आयोजित करणे, उत्तरपत्रिका तपासणी आणि गुण भरावयाचे कार्य महाविद्यालयच पार पाडतील.
उत्तरपत्रिका धोरणातील बदल
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ३६ पानी, अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी २४ पानी आणि इनसेन परीक्षांसाठी १६ पानी मुख्य उत्तरपत्रिका वापरण्यात येईल.
विद्यापीठ व महाविद्यालयांसाठी सूचना
- परीक्षा केंद्रावर योग्य बैठकव्यवस्था करावी.
- पुरेशी वीज आणि पंख्यांची सोय करावी.
- विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा असावी.
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नियमानुसार अतिरिक्त वेळ द्यावा.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
- परीक्षेच्या अर्धा तास आधी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
- परीक्षा कक्षात मोबाईल किंवा अन्य डिजिटल उपकरणे नेऊ नयेत.
- कुठलाही गैरप्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
- अधिकृत परीक्षा वेळापत्रकासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाचा वापर करावा.