पुणे विद्यापीठ सेट परीक्षेची नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर, आता परीक्षा… | Pune University SET Exam 2025

Pune University SET Exam Date 2025

Pune University SET Exam 2025

सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली चाळीसावी (४० वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, दि. १५ जून, २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदरहू परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व पणजी (गोवा) या केंद्रांवर घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे संकेतस्थळावर अर्ज दि. २४ फेब्रुवारी, २०२५ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. १३ मार्च, २०२५ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. ५०० रू. विलंब शुल्कासहीत अर्ज भरण्याचा कालावधी दि. १४ मार्च, २०२५ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. २१ मार्च, २०२५ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असेल. परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम आणि अन्य माहिती लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसांत उमेदवारांकडून परीक्षेसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक तत्वांनुसार परीक्षेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम येथे तपासा तसेच मागील वर्षीचे पेपर्स येथे डाउनलोड करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Pune University SET 2025

 


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या (सेट) तारखेत बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार सेट परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने नियोजनात बदल करण्यात आला असून, आता सेट परीक्षा १५ जून रोजी ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सेट परीक्षा ४ मे रोजी घेण्याचे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी एमपीएससी परीक्षा येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होणार असल्याची बाब लक्षात घेऊन सेट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. सेट परीक्षेची तारीख निश्चित करण्यासाठी सुकाणू समितीची बैठक झाली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि दोन विषयतज्ज्ञांचा समावेश होता. बैठकीत चर्चा करून १५ जून रोजी परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 


Pune University SET Exam Date 2025: विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा (सेट) ४ मे रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी या बाबतची माहिती परिपत्रकाद्वारे दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातर्फे सेट परीक्षा आयोजित करण्यात येते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (युजीसी नेट) धर्तीवर सेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती या पूर्वी विद्यापीठाकडून देण्यात आली होती. त्यामुळे सेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होण्याबाबत परीक्षार्थ्यांना उत्सुकता होती.मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेप्रमाणे आतापर्यंत घेण्यात आलेल्या ३९ सेट परीक्षांप्रमाणेच ४०वी सेट परीक्षाही पारंपरिक ओएमआर पद्धतीचेच घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सेट परीक्षेसंदर्भातील सविस्तर वेळापत्रक अभ्यासक्रम आणि इतर अनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आली आहे. परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आल्यामुळे परीक्षार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे


SEBC Reservation Applicable For Set Exam

Pune University SET Exam: The result of the state level qualifying examination for the post of Assistant Professor i.e. SET was pending for three months. The state government had explained that the delay was due to the demand for implementation of Socially and Educationally Backward Classes (SEBC) reservation. Finally the reservation has been implemented and the result will be announced in the first week of August.

महाराष्ट्र व गोवा या राज्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ही परीक्षा घेतली जाते. त्यासाठी एसईबीसी संवर्गाकरिता अधिनियम २०२४ मधील तरतुदीनुसार आरक्षण लागू करण्यात आले. सात एप्रिल रोजी झालेल्या या परीक्षेसाठी मराठा आरक्षण लागू करावे, अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली होती. त्यावर विद्यापीठाने राज्य शासनाकडे अभिप्राय मागविला होता. गेल्या काही महिन्यांपासून राज्य शासनाकडून उत्तर प्राप्त होत नव्हते. अखेर शासनाने यावर निर्णय दिला. त्यामुळे विद्याथ्यर्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम येथे तपासा तसेच मागील वर्षीचे पेपर्स येथे डाउनलोड करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य पात्रता (MH SET) ‘सेट’चा निकाल ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर केला जाईल; वाचा सविस्तर । MH SET Exam Result 2024

SEBC Reservation Applicable For Set Exam

विद्यापीठाची पूर्वतयारी राज्य सरकारचे स्पष्टीकरण येण्याआधीच सेट विभागाने एसईबीसी आरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक तयारी केली होती. या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. १९ ते २५ जुलै या कालावधीपर्यंत अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. परंतु अतिवृष्टी व इतर कारणांमुळे काही विद्यार्थ्यांना मुदतीत अर्ज भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे २७ व २८ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

The decision to apply SEBC reservation for announcing the result of SET exam has been approved, Savitribai Phule Pune University’s in-charge academic secretary and chief officer of SET department Dr. Vijay Khare has confirmed it. He said, before announcing the results of the set section, a deadline was given to the interested candidates to fill the SEBC cadre application. This deadline has been extended for two more days. After receiving the applications from the candidates, the necessary action will be taken within the next two days and the result will be declared soon.

Option form for only SEBC (NCL FY 2023-2024) Candidates who appeared for SET Exam conducted on 7th April, 2024.
 Extension for submission of SEBC OPTION for SEBC category Candidates SET Exam- 7th April, 2024.

सेटच्या निकालासाठी 66 एसईबीसी आरक्षण लागू करण्यासंदर्भात स्पष्टीकरण आले आहे. उमेदवारांकडून एसईबीसी संवर्गाचा अर्ज भरून घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ती मुदत आणखी दोन दिवस वाढविली आहे. उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात निकाल जाहीर केला जाईल. – डॉ. विजय खरे, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


Pune SET Exam Online Or Offline?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन पध्दतीने घेतली जाणारी नेट परीक्षा पुन्हा एकदा ऑफलाईन पध्दतीने घेतली जाणार आहे. येत्या जून महिन्यात होणारी नेट परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे. त्यामुळे राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेतली जाणारीही पुढील सेट परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार की ऑफलाईन या निर्णयाची प्रतिक्षा आहे. महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम येथे तपासा तसेच मागील वर्षीचे पेपर्स येथे डाउनलोड करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विद्यापीठ अनुदान आयोगाने नेट परीक्षेबाबत अनेक मोठे बदल केले आहेत. पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सुध्दा आता नेट परीक्षेला प्रविष्ट होऊ शकणार आहेत. तसेच नेट परीक्षेतील गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यांना पीएच. डी. साठी प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा देशभरातून नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होणार आहे. नेट परीक्षा १६ जून रोजी परीक्षा होणार आहे. तर दुसरीकडे राज्यात होत असलेल्या सेट परीक्षेसाठी सुमारे एक ते सव्वा लाख विद्यार्थी अर्ज करतात.

या सर्व विद्यार्थ्यांची केवळ महाराष्ट्रात नाही तर गोव्यातही परीक्षा घ्यावी लागते. आता पुढील परीक्षा ऑनलाईन घेण्याचे निश्चित झाले तर अद्याप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून निर्णय झालेला नाही. विद्यापीठाकडून १९९५ पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा ३२ विषयांसाठी घेण्यात येते. कोणत्याही विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षेत ५५ टक्के गुण (राखीव ५० टक्के) मिळवलेला विद्यार्थी किंवा शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थीही या परीक्षेसाठी अर्ज करतात.

नुकतीच विद्यापीठाच्यावतीने ७ एप्रिल २०२४ रोजी सेट परीक्षा घेण्यात आली. सेटची ही ३९ वी परीक्षा असून पारंपारिक पद्धतीने (ऑफलाईन) घेण्यात आली. यानंतरची ४० वी सेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याचा विचार असल्याचेही त्यावेळी म्हटले होते. तरी अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. सध्या ७ एप्रिल रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, सेट विभागाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन यावर पुढील बैठकीत चर्चा केली जाणार आहे. मात्र, नेट परीक्षा पुन्हा ऑफलाईन पध्दतीने घेतली जात असेल तर सेट ऑनलाईन का घ्यावी? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तसेच ऑनालाईन परीक्षेसाठी विद्यापीठाला मोठी यंत्रणा उभी करावी लागणार असल्याने अंतिम निर्णयावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.


Pune University SET Exam Date 2024

Pune University SET Exam Date 2024: State Eligibility Test (M-SET) exam date has been announced by Savitribai Phule Pune University. Accordingly M-SET exam will be conducted on April 7 next year in 2024

राज्‍य पात्रता परीक्षा (एम-सेट) परीक्षेच्‍या तारखेची घोषणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केली आहे. त्‍यानुसार पुढील वर्षी २०२४ मध्ये ७ एप्रिलला एम-सेट ही परीक्षा घेतली जाईल. पेन-पेपरवर आधारित ही शेवटची ऑफलाइन परीक्षा असणार आहे. २०२५ पासून सेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट करण्यात आले. तसेच ऑनलाईन अर्ज १२ जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहे. पूर्ण माहिती आपण खालील शुद्धिपत्रकात बघू शकता.  महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम येथे तपासा तसेच मागील वर्षीचे पेपर्स येथे डाउनलोड करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्‍या सूचनेप्रमाणे आतापर्यंत ३८ सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने (पेन व पेपर) आयोजन करण्यात आले होते. ३९ व्‍या सेट परीक्षेचे आयोजन यापूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने ७ एप्रिल २०२४ ला केले जाणार आहे. मात्र, २०२५ पासून घेण्यात येणारी सेट परीक्षा ही केंद्रनिहाय ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जाईल.

Pune University SET 2024 Schedule

Dates for correction / editing application from – 08/02/2004-11:00 am to 10/02/2024-06:00 pm

दरम्‍यान, एप्रिलमध्ये होणाऱ्या सेट परीक्षेच्‍या नोंदणी प्रक्रियेची परीक्षार्थ्यांना प्रतीक्षा कायम आहे. एकूण, ३०० गुणांसाठीच्‍या या परीक्षेत वस्‍तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्‍न विचारले जातील. यात पेपर क्रमांक एकमध्ये प्रत्‍येकी दोन गुणांसाठी ५० प्रश्‍न विचारले जाणार आहेत.

शिक्षक अध्यापन व संशोधन कौशल्‍ये या विषयावरील पेपर क्रमांक एक असेल. पेपर क्रमांक दोन हा परीक्षार्थ्यांचा विशेष विषयावर राहणार असून, एकूण ७१ विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.

‘नेट’च्‍या धर्तीवर बदल

राष्ट्रीय स्‍तरावर होणाऱ्या यूजीसी-नेट परीक्षेचे आयोजन संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) केले जाते. या धर्तीवर २०२५ पासून सेट परीक्षही संगणकावर आधारित घेतली जाईल. दरम्‍यान, यूजीसी-नेटप्रमाणे एम-सेट परीक्षाही वर्षातून दोन सत्रांमध्ये घेतली जाते की एकदा घेतली जाते, तसेच शिक्षणक्रम, विषयांच्‍या संख्येत काय बदल केले जातात, याकडे परीक्षार्थींचे लक्ष लागून राहणार आहे.

Apply here for SET Exam 7 April 2024
 English Adevrtisement of 39 M-SET Exam to be held on 7th April 2024
 Marathi Adevrtisement of 39 M-SET Exam to be held on 7th April 2024
 Circular of 39 M-SET Exam to be held on 7th April 2024


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड