Pune University SET Exam 2026

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आधी २६ जुलै रोजी होणार होती, परंतु त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सरळसेवा भरती अंतर्गत विविध विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या होत्या. तसेच, ७ ते २६ जुलै दरम्यान आषाढी वारी असल्याने वाहतुकीची गैरसोय लक्षात घेऊन ही परीक्षा ६ सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित केले गेले होते.
Pune University SET Exam 2026
सहायक प्राध्यापक पदासाठी २६ जुलै रोजी प्रस्तावित असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा, आषाढी वारीमुळे उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, ६ सप्टेंबर ही परीक्षेची संभाव्य तारीख जाहीर केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्र, गोवा राज्यात वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक, तसेच पीएच.डी. साठी आवश्यक ४१ व्या सेट परीक्षेचे आयोजन विद्यापीठातर्फे यंदा करण्यात येत आहे. २६ जुलै रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरतीअंतर्गत विविध विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत. सेट परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे उमेदवारांना कोणत्याही एकाच परीक्षेला उपस्थित राहता येईल, त्यामुळे त्यांचे नुकसान होईल. तसेच, ७ जुलै, २०२६ ते २५ जुलै या काळात आषाढी वारी असल्याने २६ जुलै रोजी परीक्षा घेतल्यास वाहतुकीची गैरसोय होऊन परीक्षा नियोजन आणि उमेदवारांना परीक्षेसाठी वेळेत पोहोचण्यात गैरसोय निर्माण होण्याची शक्यता आहे. या दोन्ही पार्श्वभूमीवर २६ जुलै रोजीची सेट परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निवेदने प्राप्त झाली आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेट परीक्षेपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी २६ जुलै रोजी आयोजित केलेल्या सेट परीक्षेची संभाव्य तारीख ६ सप्टेंबर २०२६ अशी जाहीर केली आहे.
⇒Maharashtra SET Exam Previous Year Paper With Answer PDF @ setexam.unipune.ac.in -15 June, 2025 रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका
⇒Maharashtra SET Exam Pattern And Syllabus PDF – Updated Syllabus PDF | सेट परीक्षेविषयीचे सविस्तर माहिती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरिता प्राधिकृत विभाग आहे. दि. २६ जुलै, २०२६ रोजी ४१ व्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरिता करण्यात आले होते. परंतु दिनांक २६ जुलै, २०२६ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरतीकरिता विविध विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही एकाच परीक्षेला उपस्थित रहाता येईल, त्यामुळे त्यांचे नुकसान होईल. तसेच दि. ७ जुलै, २०२६ ते २५ जुलै, २०२६ या काळात आषाढी वारीचे आयोजन असल्याने, २६ जुलै रोजी परीक्षा घेतल्यास वाहतुकीची गैरसोय होऊन परीक्षा नियोजन आणि परीक्षार्थी वेळेत परीक्षेस पोहोचण्यात गैरसोय निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. या दोन्ही पार्श्वभूमीवर दि. २६ जुलै, २०२६ रोजीची सेट परीक्षा पुढे आयोजित करण्याबाबत विद्यार्थ्यांची निवेदने प्राप्त झाली आहेत. सबब, दि. २६ जुलै, २०२६ रोजीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा व आषाढी वारी या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कोणताही विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचीत राहू नये यासाठी दि. २६ जुलै, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेची संभाव्य तारीख ६ सप्टेंबर, २०२६ अशी जाहीर करण्यात येत असून ह्याहीबाबतीत काही शैक्षणिक गैरसोय अथवा अडचणी निदर्शनास आल्यास त्या पडताळून त्यानुसार अंतिम निर्धारित तारीख पुढील १५ दिवसांत सविस्तर वेळापत्रकासह जाहीर करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

Pune University SET Exam 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यात २६ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ४१ व्या राज्य पात्रता परीक्षा (सेट) साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. उमेदवारांच्या मागणीचा विचार करून विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, आता उमेदवारांना विनाविलंब शुल्क २६ जूनपर्यंत तर विलंब शुल्कासह ३० जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
Pune University SET Exam 2026
सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात येईल, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्याकरिता मंगळवारी (दि. २ जून) सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याची मुदत १६ जून रोजी सायंकाळी ६ पर्यंत असणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने भरता येणार असून, विद्यापीठाच्या https://setexam unipune.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर संकेतस्थळावर नियमित शुल्कात परीक्षा अर्ज मंगळवारी (दि. २ जून) सकाळी ११ ते दि. १६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ पर्यंत उपलब्ध असेल. विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याचा कालावधी दि. १७ जून रोजी सकाळी ११ ते दि. १९ जून रोजी सायंकाळी ६ पर्यंत असेल. विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाइन पद्धतीने अचूक भरावा. अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी, तसेच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडे पाठवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा शुल्क क्रेडिट /डेबिट कार्ड, यूपीआय किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावी, विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे, जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क क्रेडिट / डेबिट कार्ड / यूपीआय /इंटरनेट बँकिंगद्वारे अदा करतील, त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवावा. सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर साधारणतः जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षा शुल्क भरून सुद्धा यादीत समाविष्ट नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा set-support@pun.unipune.ac.in या ई-मेल आयडीवर पाठवावा. सेट परीक्षेचे माहितीपत्रक, अभ्यासक्रम विद्यापीठाच्या “https://setexam unipune ac in” या सकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सेट परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व पणजी (गोवा) केंद्रांवर घेण्यात येईल, असे प्रभारी कुलसचिव तथा सदस्य सचिव (सेट) प्रा. प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले.
Pune University SET Exam 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणारी राज्य पात्रता परीक्षा (सेट) यंदा नियोजित वेळापत्रकानुसार जून-जुलै महिन्यांतच होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली. राष्ट्रीय पात्रता परीक्षेप्रमाणेच (नेट) सेट वर्षातून दोनदा घेण्याच्या दृष्टीने विद्यापीठ पातळीवर विचार सुरू असल्याचे डॉ. गोसावी यांनी स्पष्ट केले. विद्यापीठात आयोजित कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. गोसावी यांनी सेट व ‘पेट’बाबत (पीएचडी प्रवेश परीक्षा) सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील सरकारी विद्यापीठे; तसेच संलग्न महाविद्यालयांत तसहायक प्राध्यापक पदासाठी पात्र होण्यासाठी सेट अनिवार्य मानली जाते. महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम येथे तपासा तसेच मागील वर्षीचे पेपर्स येथे डाउनलोड करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) ही परीक्षा घेण्याची जबाबदारी पुणे विद्यापीठावर सोपवली आहे. राज्यात लवकरच मोठी प्राध्यापक भरती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा वेळेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी सेट विभागाकडून आवश्यक नियोजन व कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. गोसावी म्हणाले, ‘सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळविण्यासाठी; तसेच संशोधकांना रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरण्यासाठी ‘नेट’ वर्षातून दोनदा घेतली जाते. जून आणि डिसेंबर या दोन सत्रांप्रमाणेच ‘सेट’ ही दोन वेळा घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होऊ शकतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) घेण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. ‘सेट’ पूर्ण झाल्यानंतर लगेचच ‘पेट’ आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी दोन्ही परीक्षांसाठी वेळेवर आणि नियोजनबद्ध तयारी करावी, असे आवाहन डॉ. गोसावी यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागातर्फे घेण्यात येणारी यंदाची सेट परीक्षा नियोजित वेळेनुसारच घेण्यासाठी विद्यापीठाने पावले उचलली आहेत. एकीकडे परीक्षेची तयारी सुरू केली असताना दुसरीकडे सेट विभागाच्या समन्वयकपदी डॉ. प्रभाकर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते सोमवारी पदभार घेणार आहेत. त्यामुळे सेट परीक्षा नियोजित वेळेतच होणार असल्याची माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत सुमारे पाच हजार ५०० प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया सुरू असून, सेट परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास पात्र उमेदवारांना या भरतीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी नोडल एजन्सी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परीक्षेचे वेळापत्रक तातडीने जाहीर करण्यात यावे, अशी मागणी सेट परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी केली आहे.
Pune University SET Exam 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे आयोजित केले जाणारे सेट परीक्षा येत्या जून महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे परीक्षेच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या तयारीला लागावे. लवकरच त्या संदर्भातील अधिकृत घोषणा विद्यापीठातर्फे केली जाणार असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील विविध विद्यापीठांची संलग्न कॉलेजमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी सुमारे ५ हजार प्राध्यापकांची पदे भरण्यासंदर्भात शासनाकडून हालचाली सुरू आहेत. प्राध्यापकपदाच्या पात्रतेसाठी विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणारी सेट परीक्षा केव्हा घेतली जाणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. विद्यापीठ प्रशासनाने सेट परीक्षेच्या आयोजनासंदर्भात राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. विद्यापीठाला सेट परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे सेट परीक्षा आयोजना संदर्भातील समितीच्या परवानगीनंतर लवकरच विद्यापीठाकडून सेट परीक्षेच्या तारखेची घोषणा केली जाईल.
विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे आतापर्यंत ४० परीक्षा घेण्यात आल्या. या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या गेल्या. नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात होती. परंतु पेपरफुटीच्या घटनेमुळे नेट परीक्षा पुन्हा एकदा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाऊ लागली. त्यामुळे सेट परीक्षासुद्धा ऑफलाइन पद्धतीनेच घेतली जाऊ शकते. सेट परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू होती.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















