Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या फेरपरीक्षांना सुरळीत सुरुवात

Pune University Re-Exam 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या फेरपरीक्षांना सुरळीत सुरुवात झाली असून, सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी गुरुवारी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा दिली आहे, अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी परीक्षांमध्ये अडचणी आल्याचे नमूद केले. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची तक्रार आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पुणे विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या फेरपरीक्षेला आज गुरुवारी ५ नोव्हेंबरपासून ऑनलाइन एमसीक्यू पद्धतीने सुरुवात झाली. तांत्रिक अडचणी, अतिवृष्टी, एका दिवशी दोन परीक्षा अशा विविध कारणांमुळे परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत परीक्षा घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परीक्षेबाबत विविध तक्रारी असणाऱ्या, विद्यार्थ्यांचीही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे २७ हजार विद्यार्थी अपेक्षित आहे. गुरुवारी झालेल्या परीक्षेत साधारण साडेअकरा हजार विद्यार्थ्यांची ६३४ विषयांसाठी परीक्षा होणार होती. मात्र, त्यापैकी केवळ पाच हजार विद्यार्थ्यांनी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत परीक्षा दिली.

दोन ते तीन विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत तक्रार होती. त्यांची तक्रार तातडीने सोडवण्यात आली. फेरपरीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्या असल्याने, अनुपस्थित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नसल्याची शक्यता आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे रात्री आठ वाजेपर्यंत कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत. विद्यार्थ्यांना तक्रारी असल्यास, त्यांनी थेट विद्यापीठाकडे नोंदवाव्या, अशी माहिती डॉ. काकडे यांनी दिली.


Pune University Exam : Pune University Re-Exam 2020: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या ऑनलाइन फेरपरीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. तांत्रिक कारणांमुळे नियमित परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत होईल.

Pune University Re-Exam 2020 : या वेळापत्रकानुसार ५ नोव्हेंबरला शिक्षणशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुकला, मानसनीती आणि समाजशास्त्र, शारीरिक शिक्षण या अभ्यासक्रमांची, ६ नोव्हेंबरला वाणिज्य, व्यवस्थापन व विधी अभ्यासक्रम, तर ७ नोव्हेंबरला कला आणि विज्ञान अभ्यासक्रमांची परीक्षा होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.

अंतिम वर्षातील नियमित, पुनर्रपरीक्षार्थी, बहि:स्थ अभ्यासक्रमातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा १२ ऑक्‍टोबरपासून घेण्यात आली. तांत्रिक आणि अन्य कारणांसाठी परीक्षेदरम्यान अडचणींचा सामना करावा लागलेल्या विद्यार्थ्यांकडून गुगल फॉर्म भरून घेण्यात आला होता. यात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच ही फेरपरीक्षा देता येणार आहे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

पुणे विद्यापीठ संकेतस्थळ – www.unipune.ac.in

वेळापत्र – https://bit.ly/2TSs3E8

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sandesh Santosh Gonbare says

    incomplete my yesterday exam business communication SYBcom because covid issue

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड