पवित्र पोर्टलवर नवीन शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक प्रकाशित! । Pavitra Portal Shikshak Bharti 2024

Pavitra Portal Shikshak Bharti 2024 - mahateacherrecruitment.org.in

Pavitra Portal Shikshak Bharti 2024

पवित्र पोर्टलवर आज  नवीन शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक प्रकाशित झाले आहे. खाली आपण यातील सर्व महत्वाच्या सूचना बघू शकता. 

• पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरतीबाबत समाजातील विविध घटकांतून आलेल्या सर्व निवेदनांचा, सूचनांचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे. योग्य व प्रचलित शासन नियमांशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.


• नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. शिफारसपात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्रांची/प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत.

• स्वप्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अभियोग्यताधारकांनी, नियुक्ती प्राधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यावयाची आहेत. ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवावीत.

• पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्रांच्या अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवरील दिनांक १/०९/२०२३ व इतर मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करावे.


 

शिक्षक भरतीस पात्र असलेल्या उमेदवारांना पवित्र पोर्टलवर जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. ही सुविधा येत्या 9 ते 12 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सुरू राहणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार उद्या, सोमवारी (दि.12) प्राधान्यक्रम लॉक करण्याचा शेवटचा दिवस आहे. प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांना खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांमधील नववी ते बारावी या गटातील प्राधान्यक्रम देण्याची सुविधादेखील सुरू आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची कार्यवाही करावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अभियोग्यताधारकांकडून ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या मुद्द्यांना पोर्टलवर एकत्रितरित्या न्युज बुलेटिनद्वारे उत्तरे देण्यात येत आहेत. अभियोग्यताधारकांचे वेळ, श्रम वाचविण्यासाठी आणि एकाच ठिकाणी अधिकृत माहिती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे कार्यालयात गर्दी करू नये तसेच कोणाही अधिकारी, कर्मचारी अथवा अनाधिकृत व्यक्ती यांना व्यक्तींशः संपर्क करू नये, असेही आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. काही उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी अडचणी येत असल्यास अशा उमेदवारांनी त्यांनी पूर्वीचे प्राप्त प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करून लॉक करण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवार पदभरतीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी राहणार नाहीत. त्यामुळे प्राधान्यक्रम नमूद करून लॉक करणे अनिवार्य आहे, असेही शिक्षण विभागातर्फे कळवण्यात आले आहे.

 


 

पवित्र पोर्टल वर उमेदवारांच्या विविध शंकाचे निवारण करण्याच्या उद्देशानं नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आहे. तरी आपण काळजी पूरक वाचावे. खालील लिंक वर या नवीन प्रसिद्धीपत्रक उपलब्ध आहे. 

नवीन प्रसिद्धीपत्रक पहा 

 


पवित्र पोर्टल वर बहूप्रतिक्षीत जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत. खालील स्क्रिनशॉट मध्ये दाखविल्या प्रमाणे आपण दिलेल्या झिप फाईल्स खाली दिलेल्या लिंक वरून सुद्धा डाउनलोड करू शकता. या झिप मध्ये सर्व PDF फाईल्स दिलेल्या आहे.  pavitra portal preference 2024 सुरु, त्वरीत उमेदवारांनी अपडेट करावा, लिंक सुरु. 

राज्यातील बहुप्रतीक्षेत असणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार, अखेर मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ आणि मुलाखतीसह चार हजार ८७९ पदांची भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीसाठी ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२’ ऑनलाइन पद्धतीने घेतली होती.

या चाचणीसाठी एकूण दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते. या चाचणीमधील गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीसाठी शिक्षण सेवक, शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.

 

Phase 1 WithOut Interviews Advertisements Download Link
Phase 1 With Interviews Advertisements Download Link
Online Application Link

 

 

शिक्षक भरती प्रक्रियेत माध्यम, बिंदुनामावली, विविध शिक्षक प्रवर्ग या सर्व विषयांचा एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या. सोशल मिडियावर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता. परंतु अशा कोणत्याही दबाव, खोडसाळपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय आणि शासनाचे विविध विषयावरील धोरणाचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षक भरतीच्या एकूण जागा जाहीर झाल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी जवळपास सात हजारांहून अधिक उमेदवारांनी प्राधान्यक्रम देखील दिला आहे.

 


शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीच्या कार्यवाहीला मुहूर्त लागला असून शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून देण्यास सोमवार (ता.२९) पासून प्रारंभ झाला असला तरी, प्रात्याक्षिक पवित्र पोर्टल सुरूच झालेले नसल्याचा अनुभव उमेदवारांना येत आहे. यातच, शासकीय शाळांची जाहिरात प्रसिद्ध नसल्याने संभ्रमावस्था आहे. त्यामुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गत अनेक वर्षांपासून प्रलंबित शिक्षक भरतीची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यात १५ हजार शिक्षकांची भरती प्रक्रीया राबविणार असल्याचे जाहीर केले आहे. 

जाहीर केल्याप्रमाणे या भरती प्रक्रियेला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसू नये यासाठी शिक्षण विभागाने भरतीबाबतचे वेळापत्रक ठरवून दिले. रयत शिक्षण संस्थेसह बहुतांश खासगी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड केल्या आहेत. मात्र, जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिकांच्या शाळांची जाहिरात अपलोड झालेली नसल्याचे चित्र आहे. पवित्र पोर्टलवर ज्या ‘टेट’ उत्तीर्ण उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यांच्याकडून आता प्राधान्यक्रम भरून घेण्यास सुरवात केली खरी मात्र, प्रत्यक्षात पोर्टल खुले झाले नसल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे.

वारंवार प्रयत्न करूनही पोर्टलवर उमेदवार प्राधान्यक्रम भरू शकलेले नाहीत. जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी मंगळवारी (ता.३०) मुदत संपली.

त्यामुळे बुधवारी (ता.३१) सकाळी संबंधित जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. पोर्टलच्या तांत्रिक बिघाडाबाबत विभागाने कानावर हात ठेवले आहेत.

रयत शिक्षण संस्था मध्ये 808 पदांची भरती प्रक्रिया सुरु, नवीन जाहिरात प्रकाशित!!

 

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे शिक्षक भरतीच्या कार्यवाहीला मुहूर्त लागला असून सोमवार (ता.२९) पासून शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील सुमारे १५ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून देण्यास सुरवात झाली आहे.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा शिक्षक भरतीला अडथळा येऊ नये, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिकांच्या शाळा, काही खासगी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत.

 

पवित्र पोर्टलवर ज्या ‘TET’ उत्तीर्ण उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यांच्याकडून आता प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. त्याची सुरवात सोमवारी झाली. जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी ३० जानेवारीची मुदत देण्यात आलेली आहे. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर संबंधित जाहिरात प्रसिद्ध होईल. ही मुदत मंगळवारी संपुष्टात येत असून ज्या शाळांची बिंदूनामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेतलेली नाही आणि २०२२-२३ मधील संच मान्यता अपूर्ण आहे, त्यांना पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करता येणार नाही. उर्वरित शाळांना आता शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात संधी दिली जाणार आहे.

 


Pavitra Portal Shikshak Bharti 2024: Jairam Swami Vidyamandir, Vadgaon, Yashwantrao Chavan Vidyalaya, Yashwantnagar run by Sahyadri Education Institute, Varne Gram Vikas Mandal, Mumbai, and Koyna Education Society Taldev has published an advertisement for the recruitment of “Shikshan Sevak” through the Pavitra Portal 2024. There are total of 35 vacancies are to be filled for the posts of Shikshan Sevak. For more details about Pavitra Portal Shikshak Bharti 2024, Pavitra Pranali Shikshan Sevak Bharti 2024.

पवित्र प्रणाली 2024 मार्फत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित जयराम स्वामी विद्यामंदिर वडगाव, यशवंतराव चव्हाण विद्यालय, यशवंतनगर, वारणे ग्राम विकास मंडळ, मुंबई, आणि कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेव अंतर्गत विविध शाळाद्वारे “शिक्षक” पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

‘पवित्र’वरील जाहिरात पाहता येणार!

स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्तपदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार जाहिरात सुविधा देण्यात आली होती. यात जिल्ह्यातील ४२ शिक्षण संस्थांनी बिंदू नामावली अपलोड केली होती. यातील २९ संस्थांच्या बिंदू नामावलीला मंजुरी दिली आहे. तर २४ संस्थांच्या जाहिरातींना मंजुरी मिळाली आहे. सोमवार, २९ जानेवारीपर्यंत जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

Jayram Swami Vidhyamandir Satara Shikshak Recruitment 2024

Yashvantrao Chauvan Vidhyalay Satara Application 2024

Varne Gramvikas Mandal Mumbai Notification 2024

Koyna Education Society Satara Shikshak Bharti 2024

Shikshan Prasarak Sanstha Karanje Satara Bharti 2024


Pavitra Pranali Shikshan Sevak Bharti 2024

सात वर्षांनंतर राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये ३२ हजार शिक्षकांची भरती होत आहे. आतापर्यंत २६ जिल्हा परिषदांसह काही महापालिकांच्या जाहिराती ‘पवित्र’ पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत. मात्र, कन्नड माध्यमांची बिंदुनामावली अजूनपर्यंत अपूर्ण असल्याने ‘कन्नड’मधून डीएड झालेल्या भावी शिक्षकांची चिंता वाढली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमधील पदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली आहे. आता आंतरजिल्हा बदलीतून येणाऱ्या शिक्षकांची संख्या गृहीत धरून सोलापूर जिल्हा परिषदेकडून दोन दिवसांत रिक्त पदांची जाहिरात ‘पवित्र’वर अपलोड होणार आहे. पण, कन्नड माध्यमांच्या शाळांमधील रिक्त शिक्षकांची बिंदुनामावली अजूनपर्यंत अंतिम झालेली नाही. त्यामुळे आमच्या माध्यमांची शिक्षक भरती कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करीत काही भावी शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली होती. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

अशी स्थिती अनेक जिल्हा परिषदांमध्ये असल्याची वस्तुस्थिती आहे. पण, ‘कन्नड’ची बिंदुनामावली पुण्याच्या मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेतली जात आहे. काही दिवसांत ती अंतिम होईल आणि त्यानंतर त्या माध्यमांचीही शिक्षक भरती होईल, असे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. मागासवर्गीय कक्षाला पाठविलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या बिंदुनामावलीत कन्नड शिक्षकांची ३२ पदे रिक्त आहेत. दरम्यान, सध्या एकूण रिक्तपदांपैकी ७० टक्के पदांचीच भरती होणार आहे.

‘या’ शाळांवर इंग्रजी विषय शिक्षक
पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये २० टक्के इंग्रजी माध्यमांचे शिक्षक घेण्याचा शासन निर्णय होता. तो रद्द झाला असून १३ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार आता ज्या मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग आहेत, अशाठिकाणी सहावी ते आठवीसाठी चारपैकी एक शिक्षक इंग्रजीचा असावा आणि केंद्र शाळांअंतर्गत जेवढ्या शाळा आहेत, त्याठिकाणी एक शिक्षक इंग्रजीचा (साधन व्यक्ती म्हणून) शिक्षक नियुक्त केला जाणार आहे. इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल वाढल्याने मराठी शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याने शासनाने असा निर्णय घेतला आहे. त्यानुसार साधारणत: एकूण रिक्तपदांपैकी २५ टक्के शिक्षक इंग्रजीचे भरती होणार आहेत. संबंधित जिल्हा परिषदांच्या मागणीनुसार ती पदे भरली जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


 

महाराष्ट्र शिक्षक भरती अंतर्गत पवित्र पोर्टल वर विविध जिल्ह्यांच्या जाहिराती येणे सुरु झाले आहे. आपण लॉगिन करून जाहिराती बघू शकता. खाली काही जिल्ह्यांच्या जाहिराती आम्ही दिलेल्या आहेत.  

 

Raigad Shikshak Bharti 2024

पवित्र पोर्टल लॉगिन लिंक 

शिक्षक भरतीबाबत राज्य , शासनाने ८० टक्के भरती करण्याचा , निर्णय घेतला होता. मात्र, तो बदलून आता ७० टक्के भरतीची जाहिरात काढण्यात येणार आहे. यामुळे लाखो उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे. शासनाने ठरल्याप्रमाणे ८० टक्के शिक्षक भरती करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती शिक्षक भरती संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत शिरगूर यांनी केली आहे. जिल्हा परिषद शाळा – २३०००, नगर परिषद महानगरपालिका शाळा. ५०००, खासगी अनुदानित शाळा- २७००० अशी एकूण ७० टक्के पदे रिक्त आहेत. उरलेली १० टक्के रिक्त पदे राज्यातील बिंदुनामावली तयार झाल्यावर जाहीर होणार आहेत.

 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात शिक्षक भरतीसंदर्भात बिंदुनामावलीतील दुरुस्तीबाबत आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यासंदर्भात कारवाई करणे आवश्यक आहे. आता पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना ८० टक्केऐवजी ७० टक्के रिक्त पदांची मागणी करावी, अशी नव्याने सूचना १९ डिसेंबर रोजी शिक्षण आयुक्तांनी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

यापूर्वीच अनेक महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीमध्ये आता पुन्हा १० टक्के जागा कमी भरल्या जाणार आहेत. या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील लाखो उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. जून २०२३ मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार शिक्षकांच्या रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास दिलेल्या परवानगीनुसार सर्व पदे भरायची आहेत. मात्र, बिंदुनामावलीसंदर्भात काही वैध, आक्षेप किंवा तक्रारी प्राप्त असल्यास त्यांचे निराकरण केले जाईल. शासनाच्या परवानगीनुसार उर्वरित १० टक्के रिक्त पदे भरतीची कारवाई करण्यात यावी, असेही आयुक्तांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बिंदुनामावली लवकरात लवकर पूर्ण करून संवर्ग व प्रवर्ग यादी जाहीर करावी. रिक्त जागांसंदर्भातही माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे.

 


Pavitra Portal Shikshak Bharti 2024: Shree Ghatai Devi Education Institute, Sayli, T. Satara and Vikram Education Society, Satara has published an advertisement for the recruitment of “Shikshan Sevak” through the Pavitra Portal 2024 which has been prioritized by the government for the recruitment of Teachers. A total of 18 vacancies are to be filled for the posts of Shikshan Sevak. For more details about Pavitra Portal Shikshak Bharti 2024, Pavitra Pranali Shikshan Sevak Bharti 2024.

पवित्र प्रणाली 2023 मार्फत श्री घाटाईदेवी शिक्षण संस्था, सायळी, ता. सातारा आणि विक्रम एज्युकेशन सोसायटी, सातारा अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, सायळी, ता. जि. सातारा या शाळाद्वारे “शिक्षक” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Shree Ghatai Devi Education Institute Satara Recruitment 2024

Vikram Education Society Satara Application 2024

Rural Development Education Institute Satara Bharti 2024

Pavitra Portal Shikshak Bharti 2024

Yai Taluka West Part Education Broadcasting Board Borgaon Bharti 2024

Pavitra Portal Shikshak Bharti 2024

Shree Sant Pachalegaonkar Maharaj Shikshan Sanstha Potale Karad Recruitment 2024

Shree Siddheshwar Education Institute Kuroli Recruitment 2024

 


Pavitra Pranali Shikshan Sevak Bharti 2023

 

शासन स्तरावरून कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्तपदे पवित्र पोर्टलद्वारा भरली जाणार असल्यामुळे बिंदू नामावली परिपूर्ण असणे गरजेचे असल्याची माहिती नाशिक विभागाचे सहाय्यक शिक्षण संचालक एल. डी. सोनवणे यांनी दिली.  जिल्ह्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांनी आपापल्या आस्थापनेवर कार्यरत असणारे, त्याचबरोबर रिक्त पदे, वाढीव पदे व अद्ययावत बिंदूनामावली यांची माहिती दिलेल्या प्रपत्रात भरून द्यावी. ही माहिती डिसेंबर महिना संपण्यापूर्वी भरून द्यायची आहे. संस्थेने एकापेक्षा जास्त संख्येने असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती अद्ययावतरित्या भरून संपूर्ण संस्थेची एकच बिंदूनामावली तयार करावी. शासनस्तरावरून कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्तपदे पवित्र पोर्टलद्वारा भरली जाणार असल्यामुळे बिंदू नामावली परिपूर्ण असणे गरजेचे आहे. नाशिक विभागात एकूण ७९ पायाभूत पदे असून, १७ पदे अतिरिक्त ठरलेली आहेत. या सर्व पदांचे समायोजन करण्यासाठी परिपूर्ण माहिती देणे अत्यावश्यक आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


Pavitra Portal Shikshak Bharti 2023: Anjani Group  Duyyam Shikshan Prasarak Mandal Hingone, Jalgaon and Kurha Division under Education Society Kurha for application under Shivaji High School and Kai. C.No. Patil Junior College Kunha, Shree Shivaji High School Vadoda, Navin Madhyamik Vidyalaya, Parambi Jalgaon has published an advertisement for the recruitment of “Shikshan Sevak” through the Pavitra Portal 2023 which has been prioritized by the government for the recruitment of Teachers. A total of 09 vacancies are to be filled for the posts of Shikshan Sevak. For more details about Pavitra Portal Shikshak Bharti 2023, Pavitra Pranali Shikshan Sevak Bharti 2023.

पवित्र प्रणाली 2023 मार्फत अंजनी गृप दुय्यम शिक्षण प्रसारक मंडळ हिंगोणे, जळगाव आणि कुन्हा विभाग एज्युकेशन सोसायटी कुन्हा अंतर्गत शिवाजी हायस्कूल व कै. ग.सं. पाटील ज्युनियर कॉलेज कुन्हा, श्री शिवाजी हायस्कूल वडोदा, नवीन माध्यमिक विदयालय, पारंबी जळगाव या शाळांद्वारे “शिक्षणसेवक” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

 • पदाचे नावशिक्षणसेवक
 • पदसंख्या09 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • अधिकृत वेबसाईट – https://mahateacherrecruitment.org.in/

Pavitra Portal Shikshak Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शिक्षणसेवक (अंजनी गृप दुय्यम शिक्षण प्रसारक मंडळ हिंगोणे, जळगाव) 04 पदे
शिक्षणसेवक (कुन्हा विभाग एज्युकेशन सोसायटी कुन्हा) 05 पदे

Educational Qualification For Pavitra Portal Shikshan Sevak Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षणसेवक (अंजनी गृप दुय्यम शिक्षण प्रसारक मंडळ हिंगोणे, जळगाव)
 • Hsc. D.ed – 5 वी
 • B.SC. B.ed/D.ed. – इ. ६ ते ८
 • B.A. B.ed. – इ.9 ते 10
 • B.Sc. B.ed – इ.9 ते 10
शिक्षणसेवक (कुन्हा विभाग एज्युकेशन सोसायटी कुन्हा)
 • B.Sc.Bed – इ. 9 ते 10
 • B.Sc Bed / B.A Bed – इ. ६ ते ८
 • Ded (TET) – इ. 5 वी

Pavitra Portal Shikshak Bharti Registration Process

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की, राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी – २०२२ चे आयोजन दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ या कालावधीमध्ये करण्यात आलेले होते, सदर परिक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर त्यांचे पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करुन घेण्यात आलेले आहेत.

 या शिक्षक भरतीचे संपूर्ण नवीन अभ्यासक्रम या लिंक वर उपलब्ध आहे . तसेच TAIT टेस्ट सीरीज २०२३ – MAHA TAIT Test Series 2023 या लिंक वर सरावासाठी मोफत उपलब्ध आहे🆕.

या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

जाणाऱ्या शाळांतील रिक्त पदे तदनंतर आता राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालविल्या भरण्यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करुन जाहिरात देण्याची सुविधा दिनांक १६/१०/२०२३ पासून देण्यात आलेली आहे.

जाहिरात देण्यासाठी आवश्यक असणारे युजर मॅनुअल व सूचना पोर्टलवर देण्यात आलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच व्यवस्थापनाने त्यांच्याकडील शिक्षक प्रवर्गाची बिंदूनामावली सहायक आयुक्त,मावक यांच्याकडून प्रमाणित करुन घेणे अनिवार्य आहे. सन २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार विषयनिहाय रिक्त शिक्षक पदांची मागणी पोर्टलवर करण्यात यावी.

पोर्टलवर जाहिराती देण्याची जबाबदारी खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाची आहे. खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाने दिलेली जाहिरात संबंधित सक्षम प्राधिकारी तपासून पोर्टलवर मान्य (Approve ) करतील. खाजगी शैक्षणिक संस्थांतील जाहिरात मान्य (Approve ) करताना मागासवर्ग कक्षाने मंजूर केल्याप्रमाणे भरती वर्षातील आरक्षणाची रिक्त पदे नोंद केल्याची तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदे यांची नोंद करणे आवश्यक आहे.

 

पूर्ण माहिती बघा

 


Pavitra Portal Shikshak Bharti 2023:  The teacher recruitment process initiated through the holy system in the state has gained momentum. The facility to advertise to all managements for recruitment of teachers has been made available on the holy system. Education Commissioner Suraj Mandhare said in a press release. The government conducted the Teacher Aptitude and Intelligence Test 2022 for recruitment of teacher posts through the holy system in all local bodies and private management schools in the state. Of the 2,39,730 candidates who registered for the test, 2,16,443 took the physical test. So far, 1,62,562 candidates have completed the self-certification process for teacher recruitment.

 

राज्यात पवित्र प्रणालीद्वारे सुरू करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेने वेग घेतला आहे. शिक्षक पदभरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ घेतली. चाचणीसाठी नोंदणी केलेल्या दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांपैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली. आतापर्यंत एक लाख ६२ हजार ५६२ उमेदवारांनी शिक्षक भरतीसाठीची स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे.

उमेदवारांच्या स्व-प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद, नागपूर खंडपीठाने निर्णय दिलेल्या प्रकरणात कार्यवाही सुरू आहे. सन २०२३च्या शिक्षक पदभरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची ऑक्टोबरपासून पवित्र प्रणालीवर सुरू करण्यात आली आहे. त्यासाठीची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राज्यातील २३ जिल्हा परिषदांची बिंदुनामावली प्रमाणित झालेली आहे. उर्वरित जिल्हा परिषदांची प्रमाणित बिंदुनामावली लवकरच प्राप्त होईल. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी व्यवस्थापनांनी बिंदुनामावली अद्ययावत करणे आवश्यक आहे, असे मांढरे यांनी स्पष्ट केले. शिक्षक पदभरतीची जाहिरात देण्यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे.


 

पवित्र पोर्टलवर नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे

पवित्र पोर्टलवर नाव नोंदणीच्या वेळेस उमेदवाराजवळ खालील कागदपत्रे पाहिजेत.

दहावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
पदवी परीक्षा गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
व्यावसायिक प्रमाणपत्र
आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांसाठी जातीचे प्रमाणपत्र
नॉन क्रमिलियर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अधिवास प्रमाणपत्र
टी ई.टी परीक्षा प्रमाणपत्र
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
त्याचप्रमाणे ज्यांना महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी त्या महिला आरक्षणासंदर्भात लागणारी प्रमाणपत्र

edustaff.maharashtra.gov.in Pavitra Portal 2023 Registration Link

Post For Pavitra Portal Registration 2023 For Shikshak Bharti Process 
Portal Name Maha TAIT Pavitra Portal (New Portal)
Pavitra Portal Registration By School Education and Sports Department
Mode Online Application forms & registration process
Portal For Education Staff and Aspirants of Teachers
Article Category Pavitra Portal Latest Updates 
Under Government of Maharashtra
Now Available Mumbai Pune Kolhapur Nashik Davison Wise
Helps Education Staff Teaching and Non-Teaching
Pavitra Portal edustaff.maharashtra.gov.in

 

edustaff.maharashtra.gov.in Pavitra Portal 2023 Link

Post For Pavitra Portal Registration 2023 For Shikshak Bharti Process 
Portal Name Maha TAIT Pavitra Portal (New Portal)
Pavitra Portal Registration By School Education and Sports Department
Mode Online Application forms & registration process
Portal For Education Staff and Aspirants of Teachers
Article Category Portal
Under Government of Maharashtra
Now Available Mumbai Pune Kolhapur Nashik Davison Wise
Helps Education Staff Teaching and Non-Teaching
Pavitra Portal edustaff.maharashtra.gov.in

Pavitra Portal Shikshak Bharti 2023: As per the latest newsOn 9th Feb 2023, The New Update is published for Pavitra Portal bharti 2023. As per this update Pavitra Portal Registration process will begin again for the Shikshak Bharti in Maharashtra. The details about this GR are given below @ education.maharashtra.gov.in. Pavitra Portal is the Maharashtra Shikshak Bharti portal for the registration process. Now there are some changes in this previous PavitraPortal System. New Updates & changes are given below.  

Pavitra Portal Registration 2023 will start soon in April 2023. Candidates who have given Maha TAIT Exam 2023 are eligible for Pavitra Portal Registration 2023. Get an overview of Pavitra Portal Registration 2023 in the table below. More details about this Pavitra Portal application process & Online registration process will be published here. So for more updates keep visiting us. All the updates about Pavitra Portal 2023 will be published here.

How to Apply for Pavitra Portal Online Registration?

 • Go to the official of the School Education and Sports Department, Government of Maharashtra that is edustaff.maharashtra.gov.in
 • Select the “Application” section visible at the left side of the page.
 • Thereafter, go to the “Pavitra” section and hit on the “Applicant” link.
 • Now hit on the “Registration link” already registered candidates have to press login details.
 • Enter your Tait Exam Number as Login ID and create your password using a mobile OTP option.
 • Now fill the application form by providing the complete information.
 • Fill Educational Qualification Details like State Board/University Passing month Marks Main Subjects, Secondary, Higher secondary, Degree etc.
 • Fill the details of the professional Qualification and Upload the required documents.
 • Finally, submit the form and note down your registration number.

Pavitra Portal Registration Eligibility Criteria

According to the sources that attending MAHA TAIT exam is compulsory for registration on education portal. Candidates who have not attended and not gain score in mahatait exam are not eligible for registration on Maharashtra Pavitra Portal. MAH-TET paper I/ Paper II pass out students are not eligible for Pavitra Portal Registration If they have not attended the Maha-TAIT exam 2017, and also CTET paper I/ Paper II pass out students are not eligible for Pavitra Portal Registration If they have not attended the Maha-TAIT exam 2017. It means that all candidates who faced MAHA TAIT Exam 2017 are only eligible to apply for registration on Pavitra Portal.

Pavitra Portal Registration Details. Pavitra Portal Details – Maharashtra government informed the Nagpur bench of Bombay High Court that it had stopped appointments of teachers through its newly launched portal Pavitra Portal till September 1. The reply came while hearing a plea by Stree Shikshan Prasarak Mandal and others contending.

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

14 Comments
 1. MahaBharti says

  Take this care while filling teacher recruitment application form on sacred portal, otherwise you will not be able to participate in the recruitment process

 2. MahaBharti says

  Step By Step Pavitra Shikshak Bharti Application Process

 3. MahaBharti says

  Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Application forms

 4. MahaBharti says

  Pavitra Portal Shikshak Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड