RTE Pune Updates – बारा जूननंतर RTE निवड यादी होणार प्रसिद्ध! – Pune RTE Admission 2024

Pune RTE Admission 2024

Pune RTE Admission 2024 Update

आरटीई अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ९ हजार २१७ खासगी शाळांमधील रिक्त असलेल्या १ लाख ५ हजार ३९९ जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आरटीई पोर्टलवर प्राप्त अर्जामधून विद्यार्थ्यांची निवडीसाठी शुक्रवारी (दि. ७) एससीईआरटी येथे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन सोडत लॉटरी काढण्यात आली. उच्च न्यायालय दाखल याचिकेवर दि. १२ जून रोजी सुनावणी झाल्यानंतर आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एससीईआरटी मध्ये प्राप्त अर्जातून आरटीई प्रवेशासाठी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या. यावेळी शिक्षण आयुक्तांसह प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे, एससीईआरटीच्या उपसंचालक शोभा खंदारे, सहसंचालक कमलादेवी आवटे, प्राथमिक सहसंचालक देवीदास कुल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गतवर्षीच्या तुलनेत अर्जामध्ये घट – २०२३-२४ मध्ये ८ हजार ८२३ शाळांमध्ये १ लाख १ हजार ८४६ विद्यार्थ्यांच्या रिक्त जागांवर प्रवेशासाठी ३ लाख ६४ हजार ४१३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८२ हजार ४८३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. यंदा ९ हजार २१७ खासगी शाळांमधील रिक्त असलेल्या १ लाख ५ हजार ३९९ जागांसाठी दि. ४ जूनपर्यंत २ लाख ४२ हजार ८७९ इतक्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

 


राज्यातील खासगी शाळांतील आरटीई प्रवेशाच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची सोडत शुक्रवारी (ता. ७) सकाळी अकरा वाजता पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात होणार आहे. या प्रवेशासंदर्भातील प्रकरण न्यायालयात असल्याने १२ जूनला सुनावणी झाल्यानंतर प्रवेशाच्या सोडतीचा निकाल १३ जून रोजी शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर केला जाणार आहे. 

राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये एक लाख ५३ हजार ३९९ जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या जागांसाठी राज्यभरातून २ लाख ४२ हजार ८७९ पालकांनी अर्ज केले आहेत. मुंबईतील ३३८ शाळांमध्ये ६ हजार २६५ प्रवेशाच्या जागांचाही समावेश आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात आरटीईच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांचीही नोंदणी केली होती. मात्र, यासंदर्भात काही पालक संघटनांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर आरटीईचे प्रवेश हे खासगी शाळांमध्येच करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यात मुंबईतील काही शाळांनी आरटीई प्रवेशासाठी पळवाटा शोधत प्रवेश नाकारण्याचे प्रकार सुरू केले आहेत. यामुळे १२ जून रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर प्रवेशासंदर्भात चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, या शाळांची नोंदणी झाल्याने प्रवेश बंधनकारक आहे. या प्रवेशाची लॉटरी ही ७ जून रोजी जाहीर होणार असली, तरी न्यायालयातील प्रकरणामुळे १३ जूनपर्यंत पालकांना वाट पाहावी लागणार आहे. आरटीई प्रवेशासंदर्भात न्यायालयात १२ जून रोजी सुनावणी होणार आहे. यात मुंबईतील काही शाळांनी मनमानी सुरू ठेवत आरटीईचे प्रवेश देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. यामुळे या शाळांसंदर्भातही १२ जून रोजी होणाऱ्या सुनावणीदरम्यान निर्णय येण्याची शक्यता असल्याने ऑनलाईन सोडतीचा निकाल हा १३ जून रोजी जाहीर केला जाणार आहे.


Pune RTE Admission 2024

Pune RTE Admission 2024: राज्यभरातील ७५ हजार ८५६ शाळांमधील ९ लाख ७१ हजार २०३ जागा प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, येत्या आठवडाभरात विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

आरटीई अंतर्गत वंचित घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. खासगी शाळांमधील प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून शाळांना शुल्काची प्रतिपूर्ती केली जात होती. परंतु शिक्षण विभागाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात आरटीई प्रवेशासाठी शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा केली. त्यानुसार खासगी शाळांऐवजी सरकारी व अनुदानित शाळांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ज्या भागात सरकारी आणि अनुदानित शाळा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणीच खाजगी शाळांमध्ये प्रवेश शक्य आहे. या बदलावर शिक्षण क्षेत्र आणि पालक संघटनांनी जोरदार टीका केली होती. या बदलांनंतर शाळांची नोंदणी सुरू झाली. आरटीईच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार राज्यातील 75 हजार 856 शाळांमध्ये प्रवेशासाठी 9 लाख 71 हजार 203 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या आठवडाभरात विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. शिक्षण विभागाने आरटीईमध्ये केलेल्या बदलानंतर पालक आरटीई प्रवेशांना कसा प्रतिसाद देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे


Pune RTE Admission 2023 – Under the Right to Education Act, free and compulsory education is provided to children, and 25% reservation is made for entry into certain schools. Seven days ago, online applications for admission of 1,36,000 children to reserved seats in schools were registered. Further applications will be accepted in the coming days, and there is a high possibility of a high number of applications being submitted.

 

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी सात दिवसांत तब्बल 1 लाख 36 हजार बालकांची ऑनलाइन अर्ज नोंदणी झालेली आहे. आगामी कालावधीत आणखी अर्ज नोंदणी होणार असून यंदा अर्ज नोंदणीचा उच्चांक गाठला जाण्याचीच अधिक शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

 

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी “आरटीई’ प्रवेशासाठी 8 हजार 828 शाळांनी नोंदणी केली असून 1 लाख 1 हजार 969 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. 1 मार्च पासून “आरटीई’ पोर्टलवर बालकांच्या पालकांना ऑनलाइन प्रवेश भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 17 मार्चपर्यंत अर्ज नोंदणीसाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

पुणे जिल्ह्यात 936 शाळांमध्ये 15 हजार 655 एवढा प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत.या जागांसाठी राज्यात सर्वाधिक 31 हजार 207 अर्जांची नोंदणी झालेली आहे. ठाणे- 12,296, नागपूर-15,710, नाशिक-8,383, मुंबई-7,573, छत्रपती संभाजीनगर- 6,996, जळगाव-4,105, नांदेड- 3,875, रायगड-4,585, नगर-3,471 याप्रमाणे प्रवेशासाठी अर्ज नोंदणी झालेली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड