महापालिकेतर्फे दहावी आणि बारावीची परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी येत्या गुरुवारपासून (आठ ऑगस्ट) ते ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी ही माहिती दिली. दहावीच्या विद्यार्थ्यांना १५ हजार, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेपाचपर्यंत अर्ज करावा लागेल. तसेच महाराष्ट्रातील विविध योजने आणि नोकरी विषयक सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

काय आहे पुणे महानगर पालिकेची शिष्यवृत्ती योजना ?
■ महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या दहावी व बारावीमध्ये ८० टक्क्यांहून
अधिक गुण मिळवलेल्या खुल्या गटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मौलाना अबुल कलाम आझाद योजनेंतर्गत अर्थसाह्य केले जाते.
■ ७० टक्के गुण मिळवलेल्या पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, ४० टक्के अपंगत्व असलेल्या व ६५ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थी यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजनेंतर्गत इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाह्य दिले जाते.
■ यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. दहावी, बारावीनंतर शासनमान्य संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती मिळेल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















