पुणे रोजगार मेळाव्यात होणार दोन हजार पदांची मोठी भरती प्रक्रिया, अर्ज सुरु! | Pune Job Fair 2025
Pune Rojgar Melava 2025 - rojgar.mahaswayam.gov.in
Pune Mega Job Fair 2025
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता नौरोसजी वाडिया कॉलेज, बंडगार्डन रोड, पुणे येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील MIDC मधील विविध उद्योगांमधील २ हजारांपेक्षा जास्त रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील विविध उद्योजकांनी २ हजारांहून अधिक रिक्त पदांची माहिती दिली आहे. ही सर्व रिक्त पदे किमान १०वी, १२वी, पदवीधर, कोणत्याही शाखेचे आयटीआय, डिप्लोमा, ट्रेनी (प्रशिक्षणार्थी) या विविध पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी आहेत. या रोजगार मेळाव्यातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना विविध नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. साक्षात्कारासाठी हजर राहताना उमेदवारांनी आपले सर्व शैक्षणिक दस्तऐवज, पासपोर्ट आकाराचे फोटो, आवश्यकतेनुसार अर्जपत्र (बायोडाटा) यांच्या प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे, ४८१, रास्ता पेठ, सरदार मुदलियार रोड, पुणे ४११०११ येथे प्रत्यक्ष संपर्क साधा किंवा फोन नंबर ०२०-२६१३३६०६ वर संपर्क करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तसेच, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे, जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, कौशल्य रोजगार, उद्योजगता व नावीन्यता विभाग यांच्यातर्फे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्या गुरुवारी (दि. १६) आणि परवा शुक्रवारी (दि. १७ जानेवारी) करिअर रोजगार मेळावा आयोजित केला आहे. वाडिया महाविद्यालयात होणाऱ्या या मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, कार्यप्रशिक्षणासह पात्र उमेदवारांना नोकरीसाठी नियुक्ती दिली जाणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नामदेव शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी माहिती दिली.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाचे सहसंचालक अनुराधा ओक, सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक अनिल पवार, विभागीय शिक्षण उपसंचालक हारून अत्तार यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. मेळाव्याच्या पहिल्या दिवशी विप्रो पारी कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद ओझा, ज्येष्ठ लेखक आणि संगणकज्ज्ञ अच्युत गोडबोले, रेल्वे अधिकारी डॉ. मिलिंद हिरवे, नितीन सांगळे, डॉ. मिलिंद भोई मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी किमान बारावी उत्तीर्ण किंवा त्याहून अधिकची शैक्षणिक पात्रता असलेल्या, वयाची अठरा वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अॅप्रेंटिसशीप मेळावा होणार आहे. त्यात नियुक्तीसंदर्भात विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी डॉ. विकास गरड यांची विभागप्रमुख, तर सुवर्णा तोरणे यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे.
Pune Rojgar Melava Bharti 2025 has been conducted for eligible candidates. The Notifications are now published by the PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR. There are various vacancies are available at this Job Fair in the Pune District. There are a total of 2000 vacancies available to fill the posts. The job fair will be conducted on 17th Jan 2025. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details carefully before applying for this Pune Job Fair Recruitment. For more details about Pune Job Fair 2025, visit our website www.MahaBharti.in.
- मेळाव्याचे नाव – 2रा पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
- पदसंख्या – 2000 जागा
- शैक्षणिक पात्रता – (Read Complete details)
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
- नोकरी ठिकाण – पुणे
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – पुणे
- जिल्हा – पुणे
- रोजगार मेळाव्याची तारीख – 17 JAN 2025
- मेळाव्याचा पत्ता – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, शिवाजीनगर, पुणे
Pune Job Fair 2025 Details |
|
Job Fair Name |
2nd PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR |
Recruitment Name |
Pune Rojgar Melava 2025 |
Name of Posts | — |
Total Vacancies | 2000 Vacancies |
Official Website | rojgar.mahaswayam.gov.in |
All Important Dates For Pune Rojgar Melava 2024
|
|
Job Fair Date | 17 JAN 2025 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Pune Rojgar Melava 2025
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/pCN25 |
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/jfKJ8 |
✅ नोंदणी | https://shorturl.at/aotw0 |
Table of Contents
Comments are closed.