खुशखबर! पुण्यात ४० हजार रोजगारांच्या संधी बजाज देणार नोकरीच्या संधी! – Pune Bajaj Finserv Job Openings Latest Updates

Pune Bajaj Finserv Jobs – The foundation stone-laying ceremony for the proposed headquarters of Bajaj Finserv at Mundhwa, Pune, was held on Friday under the auspices of Chief Minister Devendra Fadnavis. Addressing the gathering, the Chief Minister highlighted that Mumbai and Pune have established themselves as the premier fintech hubs of the country, noting that Mumbai accounts for 61 percent of total fintech investments, while the sector has recorded a 59 percent growth in startups alongside investments amounting to 900 million. He emphasized the need to expand this fintech ecosystem to cities like Nashik, Chhatrapati Sambhajinagar, and Nagpur. The event was attended by Deputy Chief Minister Sunetra Pawar, Mayor Manjusha Nagpure, Municipal Commissioner Nawal Kishore Ram, District Collector Jitendra Dudi, Bajaj Finserv Chairman Sanjiv Bajaj, CSR Chairperson Shefali Bajaj, and Vice Chairman Rajiv Jain. Delivering the welcome address, Sanjiv Bajaj shared detailed plans regarding the features and vision for the new corporate campus, Pune Bajaj Finserv Job Openings Latest Updates.

बजाज फिनसर्व्हच्या मुंढवा येथील प्रस्तावित मुख्यालयाचा भूमिपूजनसोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या समारंभाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महापौर मंजूषा नागपुरे, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, बजाज फिनसव्र्व्हचे अध्यक्ष संजीव बजाज, ‘सीएसआर’च्या अध्यक्ष शेफाली बजाज, उपाध्यक्ष राजीव जैन या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, “पुणे आणि मुंबई ही शहरे देशातील फिनटेक इकोसिस्टीमची राजधानी झाली आहेत. एकूण फिनटेक गुंतवणुकीपैकी ६१ टक्के गुंतवणूक मुंबईत झाली आहे. फिनटेक स्टार्टअपमध्येही मोठी वाढ झाली असून, त्यात ५९ टक्के वाढ आणि ९०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक या क्षेत्रात झाली आहे. ही इकोसिस्टीम नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथेही नेण्याची गरज आहे.” या वेळी संजीव बजाज यांनी प्रास्ताविक केले. त्यातून मुख्यालयाबाबत माहिती दिली.

Pune Bajaj Finserv Job Openings Latest Updates

वाहतूक व्यवस्था वेगवान करण्याचा निर्धार येत्या तीन ते चार वर्षांत पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था असलेले शहर म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पुणे वेगाने वाढणारे शहर आहे. या वेगाला अनुरूप आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. त्यासाठी बाह्य आणि अंतर्गत रिंगरोडसोबत भुयारी मार्गांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. बजाज फिनसव्र्व्हचा कॅम्पस पुण्याच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला अधिक बळ देणारा ठरेल. बजाज फिनसव्र्व्हचा महाराष्ट्र शासनासोबत ६ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला असून, त्यातून राज्यातील गुंतवणूक आणि वित्तीय सेवा क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. त्यातून नव्या क्षेत्रांमध्ये पुण्यातील तरुणांसाठी रोजगार व कौशल्यविकासाच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड