महसूल विभागात आनंदाचे वातावरण, 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना मिळणार पदोन्नती! – Promotion for Deputy Collectors !

राज्यात आठ वर्षांपासून रखडलेली 125 उपजिल्हाधिकाऱ्यांची पदोन्नती अखेर मंजूर करण्यात आली आहे. महसूल विभागाने या अधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती दिली असून, यामुळे राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Promotion for Deputy Collectors !

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पदोन्नतीचे आदेश दिले असून, लवकरच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी राज्यसेवेतील 23 अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) बढती देण्यात आली होती. 1954 च्या नियमानुसार या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. राज्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

IAS पदावर बढती मिळालेले अधिकारी:

  1. संजय ज्ञानदेव पवार
  2. नंदकुमार चैतराम भेडसे
  3. सुनील बजाजीराव महिंद्रकर
  4. रवींद्र जीवाजीराव खेबुडकर
  5. निलेश गोरख सागर
  6. लक्ष्मण भिका राऊत
  7. जगदीश गोपाळकृष्ण मनियार
  8. माधवी समीर सरदेशमुख
  9. बाळासाहेब जालिंदर बेलदार
  10. डॉ. ज्योत्स्ना गुरुराज पडियार
  11. अण्णासाहेब दादू चव्हाण
  12. गोपीचंद्र मुरलीधर कदम
  13. बापू गोपीनाथराव पवार
  14. महेश विश्वास आव्हाड
  15. वैदही मनोज रानडे
  16. विवेक बन्सी गायकवाड
  17. नंदिनी मिलिंद आवाडे
  18. वर्षा मुकुंद लड्डा
  19. मंगेश हिरामन जोशी
  20. अनिता निखील मेश्राम
  21. गीतांजली श्रीराम बाविस्कर
  22. दिलीप ज्ञानदेव जगदाळे
  23. अर्जुन किसनराव चिखले

या निर्णयामुळे महसूल विभागातील रिक्त जागा भरल्या जाणार असून, प्रशासन अधिक सक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड