प्राध्यापक भरती पुन्हा लांबणीवर राज्यपाल कार्यालयाच्या विद्यापीठांना सूचना!!- Pradhyapak Bharti 2024
Professor Recruitment 2024
Pradhyapak Bharti 2024 Update
राज्यातील अकृषी विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या जागा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. राज्य सरकारच्या मान्यतेमुळे या रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, प्राध्यापक भरतीची प्रक्रिया थांबवण्याच्या सूचना राज्यपाल कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्राध्यापक भरती पुन्हा लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या २६०० जागा मंजूर आहेत. त्यांपैकी १२०० जागा रिक्त आहेत. प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी राज्यभरातील पात्रताधारकांनी अनेक वर्षे संघर्ष केला आहे. अनेकदा आंदोलने, उपोषणे केली आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांतील रिक्त असलेल्या ६४९ जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानंतर विद्यापीठांनी बिंदूनामावली, आरक्षण अशी सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून भरतीसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. काही विद्यापीठांमध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊन पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे नियोजन आहे.
बऱ्याच वर्षांपासून राज्यभरातील हजारो पात्रताधारक प्राध्यापक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यापीठांची प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू झाल्याने पात्रताधारकांसाठी एक आशा निर्माण झाली होती. मात्र, आता ही प्रक्रिया अचानक थांबवली जाणे पात्रताधारकांसाठी अडचणीचे ठरणार आहे. भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार का, त्यात काही बदल केले जाणार का, असे अनेक नवे प्रश्न आता निर्माण होत आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गेल्या काही वर्षांत न झालेली भरतीप्रक्रिया, निवृत्ती किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेली पदे यामुळे विद्यापीठांमधील विभागांमध्ये प्राध्यापकांची फारच कमी झाली आहे. त्याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होत आहे. विद्यापीठांना कंत्राटी प्राध्यापक नियुक्त करून शैक्षणिक कामकाज करावे लागत आहे. प्राध्यापक भरतीला मिळालेली मंजुरी राज्यभरातील हजारो पात्रताधारकांसह विद्यापीठांसाठीही दिलासादायक ठरली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयाने पुढील आदेशापर्यंत प्राध्यापक भरती न करण्याच्या सूचना दिल्याने विद्यापीठांना ही प्रक्रिया थांबवावी लागणार आहे. राज्यपाल कार्यालयाच्या पत्रामुळे भरती प्रक्रियेच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अकृषी विद्यापीठांमधील सहायक प्राध्यापकांच्या भरतीला कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी स्थगिती दिली असली तरी ही सहायक प्राध्यापकांची पदे स्वतंत्र आयोगामार्फत भरण्यासंदर्भात प्रशासन विचाराधीन आहे. तशा हालचालीही सुरू झाल्या आहेत.
प्राध्यापक भरतीबाबत वारंवार कुलपतींकडे तक्रारी येत असल्याने त्यांनी विद्यमान दोन कुलगुरुंची समिती स्थापन करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना आचारसंहितेपूर्वी दिल्या होत्या. शिवाय त्यांनी सर्व विद्यापीठांमधील कुलगुरुंचे अभिप्रायही मागवले होते. ही पदे स्वतंत्र आयोगामार्फत भरण्यासाठी अनेक कुलगुरुंनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसंदर्भातील तक्रारी, सावळागोंधळ टाळण्यासाठी ही भरतीप्रक्रिया स्वतंत्र आयोगाकडून राबविली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीच कुलपतींनी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सर्व विद्यापीठात सुरु असलेल्या भरतीप्रक्रियेला स्थगिती दिली असल्याचे मानले जाते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या १११ रिक्त पदांच्या भरतीसाठी एसईबीसी आरक्षणाचा समावेश करीत सप्टेंबर महिन्यांत नव्याने दुसऱ्यांदा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. प्राध्यापक भरती प्रक्रियेत जुन्या, तसेच नवीन जाहिरातीनुसार एकूण ६ हजार ५२० उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांतील प्राध्यापकांच्या १११ रिक्त पदभरतीसाठी पहिल्यांदा दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यास सुरुवातीस दि. १ ते ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यामध्ये दि. १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ केली होती. पहिल्या जाहिरातीनुसार ५ हजार ५८३ अर्ज केले होते. एसईबीसी आरक्षणाचा समावेश करीत विद्यापीठ प्रशासनातर्फे पुन्हा नव्याने दि. २३ सप्टेंबर २०२४ राजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, तसेच दि. १४ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले, दुसन्या जाहिरातीनंतर ९३७ उमेदवारांनी अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुलाखती केव्हा सुरू होणार?
सुरुवातीला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर एसईबीसी आरक्षण प्राध्यापक भरतीसाठी लागू करण्यास राज्य शासनाकडून मान्यता घेणे यामुळे प्राध्यापक भरतीप्रक्रियेला ब्रेक लागला होता. गत दहा महिन्यांपासून प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू असून मुलाखती केव्हा सुरुवात होणार? याकडे उमेदवारांचे रांचे लक्ष लागले आहे.
पूर्णवेळ अधिष्ठाता, कुलसचिव नियुक्ती केव्हा?
कुलसचिव तसेच विविध विद्याशाखांच्या अधिष्ठाता पदांवर पूर्णवेळ उमेदवारांची निवड रखडलेली असून, या महत्त्वाच्या पदाची धुरा प्रभारी व्यक्तींकडे आहे. गत दोन वर्षांपासून पूर्णवेळ अधिष्ठाता, तसेच गत एक वर्षांपासून पूर्णवेळ कुलसचिवपद भरलेले नाही. त्यामुळे निवडप्रक्रियेत पारदर्शकता राहणार का? असा सवाल शैक्षणिक वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया स्थानिक पातळीवर करण्यात येते. मात्र, कुलपती विद्यापीठस्तरीय प्राध्यापक भरतीसाठी स्वतंत्र बोर्ड किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरती करण्यासाठी आग्रही आहेत. त्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र पाठवून अभिप्राय मागविल्याची माहिती समोर आली आहे. राज्य शासनाने अकृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार काही विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतीसाठी अर्जही मागविले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही ७२ जागांच्या भरतीसाठी अर्ज मागविले होते.
मात्र, सत्ताधारी पक्षाशी संबंधित संघटनांनी कुलगुरूंचा कार्यकाळ कमी असल्याचे कारण दाखवून प्राध्यापक भरती थांबविण्याची मागणी केली होती. त्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापक भरती रखडलेली आहे. विद्यापीठास नव्या आरक्षण प्रणालीनुसार प्राध्यापक भरतीसाठी अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्याचवेळी राज्यातील नागपूर, गडचिरोली येथील विद्यापीठांमध्ये झालेल्या प्राध्यापकांच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. या संपूर्ण पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या कुलपतीपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती झाल्यानंतर विद्यापीठातील प्राध्यापक भरतीमध्ये सुसूत्रता आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना केलेली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीसाठी एक स्वतंत्र आयोग असावा, त्यादृष्टीने चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या १११ रिक्त पर्दाच्या भरतीसाठी एसईबीसी आरक्षणाचा समावेश करीत नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना येत्या ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यास मागील ९ महिन्यांपासून सुरू असलेली प्राध्यापक भरती पुन्हा सुमारे दोन महिने रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे विद्यापीठाच्या विविध विभागातील प्राध्यापकांच्या १११ रिक्त पदभरतीसाठी ३० डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यास सुरुवातीला १ ते ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यामध्ये १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ केली होती.
सुरुवातीला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर एसईबीसी आरक्षण प्राध्यापक भरतीसाठी लागू करण्यास राज्य शासनाकडून मान्यता घेणे यामुळे प्राध्यापक भरती प्रक्रियेला ब्रेक लागला होता. विद्यापीठात मोठ्या संख्येने प्राध्यापकांची पदे रिक्त असून मागील अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरती झालेली नाही. त्यामुळे अध्यापनासह संशोधनाच्या कामातही अडथळे निर्माण होत आहेत. जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठांच्या यादीतील रैंकिंगवरही प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे अत्यंत गरजेचे आहे.
निवडणूक आयोगाकडे परवानगी मागणार नवीन जाहिरातीनुसार, येत्या ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील, त्यानंतर अर्जाची छाननी होऊन मुलाखतीला प्रारंभ होणार आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान विधानसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी उमेदवारांच्या मुलाखतीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले,
राज्यात प्राध्यापकांची ११ हजार ६७ पदे आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंबलबजावणी व शैक्षणिक गुणवत्तेसाठी शंभर टक्के प्राध्यापकांची पदे भरा, अशी मागणी नेट-सेट, पीएचडीधारक संघर्ष समितीने केली आहे. पदे न भरल्यास आत्मबलीदान करण्याचा ईशाराही समितीने दिला आहे. राज्यातील प्राध्यापक भरतीबाबतची प्रक्रिया रखडली. नेट-सेट, पीएचडीधारकांकडून शंभर टक्के पदभरतीबाबत अनेकदा आंदोलने झाली. यानंतर आता पात्रताधारक पुन्हा रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत. शंभर टक्के प्राध्यापक भरतीचा निर्णय शासनाने २४ सप्टेंबरपर्यंत घ्यावा, असे नेट-सेट, पीएचडीधारक संघर्ष समितीने घेतला आहे. शासनाने निर्णय न घेतल्यास आत्मबलीदान करण्याचा इशाराही देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतचे निवेदन दिल्याचे समितीने कळविले आहे.
निवेदनात म्हटले आहे, राज्यात कायमस्वरूपी प्राध्यापक भरती होत नसल्यामुळे हजारो सेट, नेट, पीएचडीधारक बेरोजगार युवक गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. आता या तुटपुंज्या मानधनावर संसाराचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वित्त विभाग तसेच उच्चस्तरीय अधिकार समिती यांच्या अनागोंदी कारभारामध्ये उच्चशिक्षित बेरोजगारांची पिढी भरडली जात आहे. राज्यामध्ये गेल्या १२ वर्षांपासून प्राध्यापक भरती सुरळीतपणे सुरू नाही. त्यामुळे शंभर टक्के पदभरतीचा निर्णय घ्यावा; अन्यथा २५ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्र्याचे मूळ गाव असलेल्या मौजे दरे (ता. जावळी, जि. सातारा) येथे सकाळी ११ वाजता सामूहिक आत्मबलीदान करु, समिती सदस्यांनी म्हटले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या १११ रिक्त पदांच्या भरतीसाठी एसईबीसी आरक्षणाचा समावेश करीत नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार दि. १४ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे यापूर्वी अर्ज करू न शकलेल्या इच्छुक पात्र उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी प्राप्त होणार आहे. पुणे विद्यापीठातर्फे १११ प्राध्यापकांची पदभरतीसाठी यापूर्वी दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यास सुरुवातीस दि. १ ते ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यामध्ये दि. १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ केली होती. दिलेल्या मुदतीमध्ये तब्बल सहा हजाराहून अधिक उमेदवारांनी विद्यापीठाकडे अर्ज केले होते.
दरम्यान, प्राध्यापक भरतीसाठी एसईबीसी आरक्षण लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली.त्यामुळे सुधारित जाहिरात प्रसिद्ध करून पद भरती केली जाणार आहे. विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी सुधारित जाहिरात विद्यापीठाच्या https:// admin.unipune.ac.in/recruitme nt/ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यापीठातर्फे प्रसिद्ध केलेल्या नवीन जाहिरातीमध्ये खुल्या संवर्गातील आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या दहा टक्के एसईबीसी संवर्गातील जागांमध्ये बदल केला आणार आहे. प्राध्यापकांच्या १११ रिक्त पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव, आरक्षण तसेच इतर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
राज्यात लवकरच मोठी प्राध्यापक भरती! भरती तातडीने सुरू करण्याचे निर्देश
[…] Pradhyapak Bharti 2023 – राज्यात लवकरच मोठी प्राध्… […]
New Update