Ponda Municipal Council Goa Bharti 2025
फोंडा पालिकेच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करून ठराव घेण्यात आले. त्यात पालिकेच्या क्षेत्रात सीसीटीव्ही बसवणे, पालिकेची शांतीनगर येथील जुनी इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत बांधणे तसेच नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे पालिकेच्या नगरसेवकांची इंदोर वारी यावेळी चर्चेचा विषय ठरली. नगराध्यक्ष आनंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व नगरसेवकांनी चर्चेत भाग घेतला. फोंडा पालिका क्षेत्रातील कचराफेकू व्यक्तींना आणि गैर कृत्यांना आळा बसावा, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहेत. या सीसीटीव्ही कॅमेरामुळे पालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या ठिकाणी लक्ष ठेवता येणार असल्याने हे कॅमेरे बसवण्याचे ठरले.

शांतीनगर – फोंडा येथील पालिकेच्या मालकीच्या जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी सोळा निवासी खोल्या आहेत, त्या जीर्ण झाल्या असून याजागी नवीन इमारत पालिकेने बांधावी की ‘पीपीपी’ तत्वावर बांधावी यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी पालिका संचालनालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पालिका संचालनालयाकडून होकार आल्यानंतर मग निर्णय घेण्यात येणार आहे.
फोंडा पालिकेत गवत कापण्यासाठी नवीन यंत्रे खरेदी करणे तसेच शांतीनगर – फोंडा येथील उद्यानात बाकड्यांसह मुलांना खेळण्यासाठी नवीन उपकरणे बसवणे व इतर अनेक विषयांवर चर्चा करून आवश्यक ठराव घेण्यात आले. फोंडा पालिकेत पालिका अभियंता तसेच सहायक पालिका निरीक्षकांची पदे भरण्याबरोबरच कंत्राटी तत्वावर सिव्हील अभियंता पदे भरण्यासंबंधीही यावेळी चर्चा झाली. पालिकेला अवजड वाहन चालवणाऱ्या चालकांची गरज असल्याने ही पदेही भरली जाणार आहेत.
Important Links For PMC Goa Bharti 2022 | |
| ? PDF जाहिरात | https://cutt.ly/2HnVGMA |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.pmcgoa.com |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















