पोलीस भरती प्रक्रियेमध्ये होणारमोठा बदल, तरुणांना मिळणार दिलासा!
महाराष्ट्र पोलीस भरती 2019
२०१९ साली होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. या वर्षीच्या पोलीस भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा व त्यानंतर मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. जे उमेदवार लेखी परीक्षेतून उतीर्ण होतील त्यांना मैदानी चाचणी करिता पात्र ठरविण्यात येईल, व त्या अखेर पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. शासनाने केलेल्या या महत्वपूर्ण बदलाच्या पूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
पोलीस भरती प्रक्रियेच्या अद्यावत माहिती नुसार, या भरती प्रक्रीये मध्ये खालील प्रमाणे काही महत्वाचे बदल करण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्य राखीव पोलिस दलाच्या गट क्रमांक १३, मुख्यालय वडसा देसाईगंजी, गडचिरोली येथे सशस्त्र पोलिस कॉन्स्टेबल पदाकरिता अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी गोंडी व मडिया भाषेच्या अतिरिक्त १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागेल. तसेच हे अर्जदार १५ वर्षांच्या मुदतीपर्यंत राज्याबाहेर हस्तांतरित करण्यास पात्र नसतील.
महाराष्ट्र पोलिस भरती २०१९ प्रक्रियेच्या लेखी परीक्षे मध्ये जे अर्जदार किमान 35% गुण (मागासवर्गीय अर्जदारांसाठी 33% गुण) मिळवून उत्तीर्ण होतील, त्यांच्यापैकी गुणवत्ता नुसार, प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पद्संखेच्या १ : १० या प्रमाणात प्रवर्गनिहाय खालीलप्रमाणे शारीरिक चाचणी करिता पात्र ठरविण्यात येईल.
- 5 किलोमीटर धावणे – 50 गुण
- 100 मीटर धावणे – 25 गुण
- शॉट पुट – 25 गुण
- एकूण – 100 गुण
पोलीस भरती साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे, राज्य शासन काही महत्वपूर्ण निर्णय घेणार असून निवड चाचणीमधील पद्धतीमध्ये बदल करण्याच्या विचारात आहे. निवड प्रक्रियेमधील लांबलचक पद्धत टाळून आधी लेखी परीक्षा आणि मग शारीरिक चाचणीचा निर्णय काही दिवसांपूर्वी शासनाने घेतला होता.
शारीरिक चाचणीसाठी बंधनकारक असलेली लांबउडी आणि पूल अप्स मैदानी चाचणी मधून वगळण्यात येणार असल्याचे समजत आहे आणि मैदानावर घेण्यात येणारी चाचणी १०० ऐवजी ५० गुणांची होणार आहे. यासाठी पुरुषांना १६०० मिटर धावणे ३० गुण, गोळा फेक १० गुण आणि महिलांना ८०० मीटर धावणे ३० गुण गोळा फेक १० गुण आणि इतर एका मैदानी प्रकारा मध्ये १० गुण असे बदल होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शासनाने हे बदल केले तर उमेदारांचे मैदानातील त्रास कमी होईल आणि मैदानी परीक्षा आणखी सोप्पी होईल आणि त्यासोबतच पोलीस प्रशासनाचे वेळ वाचणार आहे. रिक्त पदे संदर्भात नवीन परिपत्रक काढण्यात आले आहे, त्यानुसार लवकरच पोलीस भरती घेऊन पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण ४७६५ जागा (अजूनही बदल होऊ शकतो) भरण्यात येणार आहे. विभागानुसार रिक्त पदांचा तपशील व परिपत्रक खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र पोलिस विभागात भरतीसाठी १३००० रिक्त जागा आहेत.
Sir police bharti online form date Please confirm me i am Ex-servicemen
Pls sir bharti kadhi nighanar aahe.
Pls sir bharti kadhi nighanar aahe. Pls email sir
Ty.. For information
I am. Ready for the Bharti and I know will crack the exam
And will
Do my
Mon and dads name in upper level
Thank you
And also thank you for the
Mo
Mpsc world website which helps an alert the people frm the notification
Jai jawan jai kisan