महापालिकेच्या सुरक्षा विभागात 400 सुरक्षा रक्षकांची भरती लवकरच | PMC Security Guard Bharti 2024

PMC Security Guard Bharti 2024

PMC Security Guard Bharti Update 2024

PMC Security Guard Bharti 2024 : Pune Municipal Corporation has not recruited permanent security guards since 2010. Therefore, 400 posts of permanent security guards are vacant. Apart from that, 800 private security guards are needed to look after the security of various establishments of the municipality. Therefore, there are no security guards at various establishments of the municipality. Due to this, the question of how to manage the security of this Pune Municipal Corporation has come to the fore.

पुणे महापालिकेत २०१० पासून कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांची भरती झालेली नाही. त्यामुळे कायम सुरक्षारक्षकांच्या ४०० जागा रिक्त आहेत. त्याशिवाय पालिकेच्या विविध आस्थापनांची सुरक्षा पाहण्यासाठी ८०० खाजगी सुरक्षारक्षकांची गरज आहे. त्यामुळे पालिकेच्या विविध आस्थापनांवर सुरक्षारक्षक नाहीत. यामुळे या पुणे महापालिकेची सुरक्षाव्यवस्था करणार तरी कशी असा प्रश्न समोर आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पालिकेंतर्गत येणारी मुख्य इमारत, शाळा, उद्याने, नाट्यगृहे, क्षेत्रीय कार्यालये, पाण्याच्या टाक्या, जलतरण तलाव, अमिनेटी स्पेसच्या जागा यांसारख्या सुमारे ५०० आस्थापना आहेत. सध्या पुणे महापालिकेत खाजगी सुरक्षारक्षकांची संख्या १ हजार ६४०, तर कायमस्वरूपी ३२०, असे एकूण १ हजार ९६० सुरक्षारक्षक आहेत; पण आस्थापनांची संख्या पाहता सुरक्षारक्षकांची संख्या अपुरी पडत आहे, असे पालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी सांगितले.

सुरक्षा अधिकारीपद रिक्त

पुणे महापालिकेत तीन सुरक्षा अधिकारीपदे आहेत. त्यात राकेश विटकर हे सुरक्षा अधिकारी आहेत. कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे यांच्याकडे सुरक्षा अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार आहे. एक सुरक्षा अधिकारीपद रिक्त आहे. पालिकेच्या मुख्य सुरक्षा अधिकारीपदी रमेश शेलार आहे; पण त्यांच्याकडे पर्यावरण विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्याकडे मुख्य सुरक्षा अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.

महिला सुरक्षा अधिकारी नेमा

पालिकेत महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहे. आता सुरक्षाव्यवस्थेत तृतीयपंथीयाचा समावेश केलाय. या सर्व बाबींचा विचार करून पालिकेत एक महिला सुरक्षा अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

८०० खाजगी सुरक्षारक्षक तातडीने भरा

पुणे महापालिकेत खाजगी आणि कायमस्वरूपी अशा सुरक्षारक्षकांची संख्या १ हजार ९६० आहे; पण पालिकेच्या आस्थापनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांची ही संख्या अत्यंत कमी पडत आहे. त्यामुळे एखादा सुरक्षारक्षक आजारी पडल्यास बदली सुरक्षारक्षक देता येत नाही. त्यामुळे ८०० खाजगी सुरक्षारक्षक तातडीने भरावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.


PMC Security Guard Bharti 2023

PMC Security Guard Bharti 2023 –  While efforts are being made at the government level to empower the third party class and provide them with job opportunities, the Pune Municipal Corporation has also taken the initiative in this. 50 third-party security guards are to be appointed in the security department of the municipal corporation. The proposal for its approval will be submitted to the Municipal Commissioner soon. These security guards will be posted at five major high-traffic locations. Know More about PMC Security Guard Bharti 2023 in this blog :

केंद्रशासन व राज्यशासनाच्या सूचनांनुसार महापालिकेकडून तृतीयपंथी वर्गाचे समक्षमीकरण, त्यांना नोकरीमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळया योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या सुरक्षा विभागात 50 तृतीयपंथी सुरक्षा रक्षक नियुक्त केले जाणार आहेत.

पुणे महानगरपालिका अंतर्गत ५६१ पदे रिक्त! Pune Mahanagarpalika Bharti 2023

Various activities are implemented for them by the Municipal Corporation to accommodate all the sections of the society. Financial or other assistance is provided through schemes implemented by the Social Development Department. The security department has taken the initiative to provide employment opportunities to third-party citizens. In this, 50 third castes will be appointed on contractual basis. Currently 1640 contract security guards are taken from two contractors, these 50 will be hired from them. At present, 28 applications have been received. After the approval of the Additional Commissioner and the Commissioner, his appointment will be sealed.

प्रस्ताव महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडून तयार करण्यात आला असून, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला सुरक्षा रक्षक म्हणून या सर्वांची नियुक्ती महापालिकेत मोठया प्रमाणात वर्दळ असलेल्या ठिकाणी केली जाणार असल्याची माहिती सुरक्षा विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. पण त्याचसोबत महापालिकेला कामाच्या ठिकाणी त्यांच्यासाठी सौहार्दाचे व चांगले वातावरण उपलब्ध करून देणे, स्त्री, पुरुष कर्मचाऱ्यांचे वर्तनही चांगले ठेवणे यासाठी विशेष सूचना दिल्या जाणार आहेत.

केंद्रशासन व राज्यशासनाच्या धोरणानुसार महापालिकेकडून तृतीयपंथींसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी तसेच महापालिकेच्या इमारतींमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यात आली असून, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने सुरक्षा विभागाने पुढाकार घेतला आहे. यामध्ये 50 तृतीय पंथीयांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे. सध्या दोन ठेकेदारांकडून 1640 कंत्राटी सुरक्षा रक्षक घेतले आहेत, त्यांच्याकडूनच या 50 जणांना कामावर घेतले जाईल. सध्या 28 जणांचे अर्ज आले आहेत. त्यास अतिरिक्त आयुक्त व आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर त्यांना पालिकेच्या सेवेत घेतले जाणार आहे. महापालिकेची मुख्य इमारत, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, राजीव गांधी रूग्णालय येरवडा, सारसबाग तसेच मंगळवारपेठेतील महापालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयात त्यांची सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नोकरी मिळावी यासाठी काही सामाजिक संघटनांनी याबाबत मागणी केली होती.

महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, क्षेत्रीय कार्यालये, विविध वास्तू, मैदान, उद्याने या ठिकाणी सुरक्षा रक्षक आवश्‍यक आहेत. महापालिकेकडे सुरक्षा रक्षकाच्या ६५० जागा आहे, त्यापैकी केवळ ३२० सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने हे मनुष्यबळ अपुरे असल्याने १६४० सुरक्षा रक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले आहेत. त्यासाठी वर्षाला सुमारे ५० कोटी रुपये खर्च केले जातात.

दरम्यान तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेत नोकरी मिळावी यासाठी काही सामाजिक संघटनांनी याबाबत महापालिकेकडे मागणी केली होती. यासंदर्भात बैठकाही झालेल्या आहेत. त्यामध्ये एकमत झाल्यानंतर प्रस्ताव मागविण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात सुरक्षा विभागात 50 जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. पण त्याचसोबत महापालिकेला कामाच्या ठिकाणी त्यांच्यासाठी सौहार्दाचे व चांगले वातावरण उपलब्ध करून देणे, स्त्री, पुरुष कर्मचाऱ्यांचे वर्तनही चांगले ठेवणे यासाठी विशेष सूचना दिल्या जाणार आहेत.

याठिकाणी होणार नियुक्तीस असणार हे सुरक्षारक्षक

  • पुणे महापालिका भवन, शिवाजीनगर
  • राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रज
  • राजीव गांधी रुग्णालय, येरवडा
  • कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
  • सारसबाग, स्वारगेट
  • एकूण सुरक्षा रक्षक – १९२०
  • कायम सुरक्षा रक्षक – ३२०
  • कायम महिला सुरक्षा रक्षक -८
  • कंत्राटी सुरक्षा रक्षक – १६४०
  • महिला सुरक्षा रक्षक – सुमारे ७७५

‘सुरक्षा विभागात तृतीय पंथी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. पण त्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला जाईल.’

– माधव जगताप, उपायुक्त, सुरक्षा विभाग

‘तृतीय पंथी नागरिकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणले पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे महापालिकेने उशिरा का होईना पण चांगला निर्णय घेऊन तृतीय पंथींची नियुक्ती करावी. तसेच इतर विभागांमध्येही आवश्‍यक शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांनाही संधी द्यावी.’


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Prakash chitte says

    Surksha rakshak

  2. Mangesh chavahan says

    Posts ofive pepet

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड