JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पुणे महानगर पालिकेत ७ हजार पदे रिक्त, नवीन पदभरती प्रक्रिया… !! | PMC Recruitment 

PMC Recruitment 

PMC Recruitment : पुणे महापालिकेच्या मनुष्यबळाची मोठी ‘पोकळी’ शहराच्या वाढत्या नागरी समस्यांवर भारी पडत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहराच्या हद्दवाढीमुळे नागरी सुविधांवरील ताण वाढत असतानाच, महापालिकेतील हजारो पदे रिक्त असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.महापालिकेच्या वर्ग-१ ते वर्ग-४ मधील तब्बल १५ हजार ९४० मंजूर पदांपैकी केवळ ९ हजार ३७ पदेच भरलेली आहेत. त्यामुळे तब्बल ६ हजार ९०३ पदे रिक्त असून, मोठ्या प्रमाणावरील मनुष्यबळाच्या कमतरतेचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.दरम्यान, पदे मोठ्या संख्येने रिक्त असतानाही आरक्षण अनुशेषाबाबत प्रशासनाने महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू नसल्याने आरक्षण अनुशेषाचा प्रश्न उद्भवत नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एका बाजूला हजारो पदे रिक्त असताना दुसऱ्या बाजूला आरक्षण अनुशेषाबाबत प्रशासनाची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.

महापालिकेतील हजारो पदे रिक्त असताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच कामाचा वाढता बोजा टाकून कारभाराचा गाडा हाकला जात असल्याचे चित्र आहे. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याबरोबरच दैनंदिन कामकाजावरही त्याचा फटका बसत आहे. रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज असताना भरती प्रक्रियेबाबत मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. नगरसेविका अर्चना जगताप यांनी ऑगस्ट महिन्यातील मुख्यसभेत महापालिकेतील रिक्त पदांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर प्रशासनाने ही माहिती सभागृहासमोर सादर केली. हजारो पदे रिक्त असल्याने महापालिकेचा कारभार तात्पुरत्या मनुष्यबळावर तसेच विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवून सुरू ठेवला जात आहे. दरम्यान, रिक्त पदे भरण्यासाठी विशेष भरती मोहीम कधी राबविणार आणि आरक्षणाचा अनुशेष कसा दूर करणार, हा महत्त्वाचा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा राहिला आहे. मनुष्यबळाच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असून, त्याचा थेट परिणाम महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांवर होत असल्याचे चित्र आहे.

कोणती पदे रिक्त

वर्ग-१ मध्ये २९८ मंजूर पदांपैकी १४७ पदे भरलेली असून, १५१ पदे रिक्त आहेत. वर्ग-२ मध्ये ८२९ पदांपैकी ५२० पदे भरलेली असून, ३०९ पदे रिक्त आहेत. वर्ग-३ मध्ये सर्वाधिक ७ हजार ६६९ पदे मंजूर असून, त्यापैकी ४ हजार १५६ पदे भरलेली, तर ३ हजार ५१३ पदे रिक्त आहेत. वर्ग-४ मधील ७ हजार १४४ मंजूर पदांपैकी ४ हजार २१४ पदे भरली असून, २ हजार ९३० पदे रिक्त आहेत.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

PMC Recruitment 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड