पुणे महानगर पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता, नवीन पदभरती प्रतीक्षेत!- Doctor Shortage in Pune PMC Hospitals!
PMC Hospital Bharti 2025
PMC Hospital Bharti 2025 – पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची तीव्र कमतरता जाणवत आहे. पीएमसीच्या २१ प्रसूतिगृहे आणि ५१ दवाखान्यांमध्ये तज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे गंभीर समस्यांना कारणीभूत ठरत आहेत. वर्ग ‘अ’ मधील १४४ मंजूर पदांपैकी तब्बल १०५ पदे रिक्त असून, न्यूरोसर्जन, हृदयरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ अशा महत्वाच्या पदांसाठी डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे नवीन पदभरती प्रक्रिया कधी राबविणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त राहणे आणि ते पण पुणे सारख्या मोठ्या शहरात हि आश्चर्याची बाब आहे.
महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे लोकसंख्या वाढली असली तरी, त्यानुसार मनुष्यबळात वाढ झालेली नाही. परिणामी, रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण अधिक वाढला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना आरोग्यसेवा मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आरोग्य विभागातील आकडेवारीनुसार, वर्ग ‘1’ मधील ७२%, वर्ग ‘2’ मधील ७०%, आणि वर्ग ‘3’ मधील ६९% पदे रिक्त आहेत. विशेषतः तज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने, अत्यावश्यक शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी रुग्णांना खाजगी दवाखान्यांचा पर्याय निवडावा लागत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये औषधे आणि अत्याधुनिक वैद्यकीय साधनांचीही कमतरता असल्याचे समोर आले आहे.
तज्ञांच्या मते, तात्पुरत्या कंत्राटी नेमणुकीपेक्षा कायमस्वरूपी भरती ही या समस्येचे दीर्घकालीन समाधान ठरू शकते. पुणे महानगरपालिकेने या रिक्त जागा लवकरात लवकर भरून काढाव्यात, तसेच नवीन डॉक्टरांच्या नियुक्त्या जलदगतीने कराव्यात, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून होत आहे.
आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आणि शहराच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तातडीने डॉक्टरांची भरती गरजेची आहे. महापालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा दर्जा सुधारण्याबरोबरच, नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे सुनिश्चित होईल.