पंतप्रधान पीक विमा योजना त्वरीत नोंदणी करा 31 जुलै 2020 पूर्वी
PM Pik Vima Yojana Apply Now
PM Pik Vima Yojana Apply Now – दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ असो की गारपीट. देशभरातील अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) मोठी मदत करते. त्यामुळे यंदाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना त्याबाबत तशी नोंद करावी लागणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारख ही 31 जुलै आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे . अशा शेतकऱ्यांनी 31 जुलै 2020 अखेर नोंदणी करायची आहे.
काय आहे पंतप्रधान पीक विमा योजना?
नैसर्गीक संकटामुळे ओढावलेल्या परिस्थितीचा सामना करता यावा यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपीट किंवा तशाच प्रकारचे कोणते संकट आल्यास शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून नुकसानभरपाई दिली जाते. नैसर्गिक संकटामुळे शेतीचे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. काही झाले तरी शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा मार्ग स्वीकारु नये त्यासाठी त्याला त्याच्या पिकाचा मोबदला मिळावा, असा या योजनेचा हेतू आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शेतकऱ्याला विमा निवडीचा अधिकार
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याची तारीख 31 जुलै आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे असे शेतकरी अद्यापही या योजनेशी जोडले गेले नाहीत. त्यामुळे या योजनेसाठी नोंदणी करण्याची आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान, या योजनेच्या निकषांनुसार आतापर्यंत हप्त्याच्या रुपात (प्रीमियम) ठेवण्यात आलेली रक्कम 2% (खरीप पिकांसाठी) आणि 1.5% रब्बी पिकांसाठी देण्याचे प्रावधान आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या आवश्यकता आणि निवडीनुसार विमा घेण्येची मुभा आहे.
आवश्यक कागदपत्रं
आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी एक कागदपत्र, याशिवाय पत्त्यासाठीही या पैकीच एखादे कागदपत्र आपण वापरु शकता.
पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी बँकेत जाऊन आपण अर्ज करु शकता. याशिवाय हाच अर्ज आपण ऑनलाइनही करु शकता. त्यासाठी https://pmfby.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. संकेतस्थळावर आपण नोंदणी करु शकता. जर आपण पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी फॉर्म ऑफलाइन भरुन नोंदणी करु इच्छित असाल तर नजिकच्या राष्ट्रीयिकृत बँकेत जाऊनही आपण या विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.
Table of Contents
माझे नाव ”प्रधानमंत्री किसान सम्मान निधीत” असून मला पिक नुकसानीच्या पिकविमा योजनेचा लाभ घेता येईल का?