रॅपिडो, भारतातील आघाडीची कॅब सेवा देणारी कंपनी, लवकरच महिलांसाठी विशेष सेवा सुरू करणार आहे. ‘पिंक रॅपिडो’ या उपक्रमाअंतर्गत महिलांना बाईक चालक म्हणून संधी देण्यात येणार आहे, ज्यामुळे २५,००० महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. भारताची आघाडीची कॅब सेवा प्रदाता रॅपिडो लवकरच महिलांसाठी विशेष सेवा सुरू करणार आहे. ‘पिंक रॅपिडो’ या उपक्रमाअंतर्गत महिलांना बाईक चालक म्हणून संधी दिली जाणार आहे. या योजनेमुळे तब्बल २५,००० महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा उपक्रम महिलांच्या सुरक्षा आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी राबवण्यात येत आहे. लवकरच या सेवेची अधिकृत घोषणा होईल. तरी इच्छुक महिलांनी आपले ड्रायव्हिंग लायसन्स तयार ठेवावे!!

महिलांसाठी खास Pink Rapido सेवा
रॅपिडो सध्या देशभरात टॅक्सी, ऑटो आणि बाईक राईडिंग सेवा पुरवते. मात्र, आतापर्यंत केवळ पुरुषच बाईक कॅप्टन म्हणून काम करू शकत होते. आता, कंपनीने महिलांसाठी स्वतंत्र पिंक रॅपिडो बाईक सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा कर्नाटकातील बंगळुरूमध्ये प्रथम सुरू होणार असून, पुढे देशभर विस्तारली जाणार आहे.
सुरक्षिततेला प्राधान्य
महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करता पिंक रॅपिडो बाईकसाठी महिला कॅप्टन्सचीच नियुक्ती केली जाणार आहे. महिलांना प्रवासादरम्यान सुरक्षित आणि आरामदायी अनुभव मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणी
रॅपिडोचे सह-संस्थापक पवन गुंटुपल्ली यांनी एका आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार परिषदेत ही घोषणा केली. पिंक रॅपिडो वर्षाच्या अखेरीस सुरू केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांसाठी रोजगाराची मोठी संधी
या नव्या सेवेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होतील तसेच त्यांना सुरक्षित आणि स्थिर रोजगारही मिळेल. कॅब आणि ऑटो सेवांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दिशेने पिंक रॅपिडो महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. लवकरच ही सेवा इतर शहरांमध्येही विस्तारली जाण्याची शक्यता आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















