JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती!- Pik Karj Vasuli Maharashtra Update

Pik Karj Vasuli Maharashtra Update  – शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात २०२६ च्या खरीप हंगामात दुष्काळ घोषित केलेल्या २६५ तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या कर्जवसुलीस तत्काळ स्थगिती देण्याचा निर्णय आज सहकार विभागाने घेतला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबरला काढलेल्या शासननिर्णयानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांतील २६५ तालुक्यांमध्ये खरीप हंगामात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली होती. त्या अनुषंगाने सहकार विभागाने ३० सप्टेंबरला विशेष परिपत्रक जारी करून संबंधित उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. खरीप पीक कर्जाच्या परतफेडीची अंतिम मुदत ३१ मार्च असल्याने, नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या व मुदतीत कर्ज न भरू शकणाऱ्या बाधित शेतकऱ्यांची संमती घेऊन त्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. एक दिवसाचे वेतन देणार राज्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दिली आहे. या मुले शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे!!

Pik Karj Vasuli Maharashtra Update

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महासंघाचे राज्यातील सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकारी ऑक्टोबरमधील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीत स्वेच्छेने जमा करतील, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे आणि सरचिटणीस समीर भाटकर यांनी आज दिली. राजपत्रित अधिकारी महासंघाने या निर्णयाची माहिती देणारे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सादर केले आहे. यासंदर्भात शासन आदेश निर्गमित करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.

Pik Karj Vasuli Maf Maharashtra List (Yadi) 2026

यासंदर्भातील निवेदन मुख्य सचिव तसेच वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनाही देण्यात आले आहे. येथील शेतकऱ्यांना दिलासा राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या दुष्काळी उपाययोजना लागू होणार असून, नाशिक (१०), जळगाव (१५), अहिल्यानगर (१४), पुणे (८), सोलापूर (११), छत्रपती संभाजीनगर (९), बीड (११), लातूर (१०), नांदेड (१४), बुलडाणा (१३), अमरावती (१४), यवतमाळ (१६), नागपूर (१४) आणि चंद्रपूर (१२) या जिल्ह्यांतील बहुतांश तालुक्यांचा यात समावेश आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, जालना, धाराशिव, परभणी, हिंगोली, अकोला, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील बाधित तालुक्यांमधील शेतकऱ्यांनाही या स्थगिती आणि पुनर्गठनाचा थेट फायदा मिळणार आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अंमलबजावणी काटेकोर शासनाच्या या निर्णयानुसार बँकांनी पुनर्गठनाची ही संपूर्ण प्रक्रिया ३० एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जेणेकरून, बाधित शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी राज्यभरात काटेकोरपणे व्हावी यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, तसेच बँक ऑफ महाराष्ट्रच्या समन्वयाखालील राज्यस्तरीय बँकर्स समितीला दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड