PDKV मध्ये लिपिक, सहायक, शिक्षक, अन्य पदभरतीस शासनाची मंजुरी, नवीन पदभरतीला मुहूर्त!

PDKV Buldhana Bharti

PDKV Bharti

जर आपण कृषी विद्यापीठात नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बुलडाणा येथील कृषी महाविद्यालयासाठी पदनिर्मितीस शासनाने मंजुरी दिली आहे. अनेक दिवसांपासून रेंगाळेला हा प्रश्‍न मार्गी लागला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत बुलडाणा येथे ६० विद्यार्थी क्षमतेचे भाऊसाहेब फुंडकर कृषी महाविद्यालय सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्रापासून चालवले जात आहे. या महाविद्यालयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत ९ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत ४५ शिक्षक वर्गीय, ४३ शिक्षकेत्तर अशी एकूण ८८ पदे निर्माण करण्यास उच्चाधिकार सचिव समितीने मान्यता दिली होती. 

त्यानंतर आता शासनानेही या पदनिर्मितीस मान्यता दिली आहे. या महाविद्यालयासाठी सहायोगी अधिष्ठाता एक, तीन प्राध्यापक, आठ सहयोगी प्राध्यापक, ३३ सहायक प्राध्यापक अशी एकूण ४५ शिक्षकवर्गीय पदे राहणार आहेत. तर सहायक कुलसचिव एक, सहायक नियंत्रक एक, वरिष्ठ संशोधन सहायक सहा, कनिष्ठ संशोधन सहायक ६, कृषी सहायक ८, शाखा अधिकारी १, वरिष्ठ लिपिक ४, कनिष्ठ लिपिक ४, वीजतंत्री १, ग्रंथालय सहायक १, प्रयोगशाळा सहायक १० अशी एकूण ४३ पदांना मान्यता मिळाली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

खालील अन्य पदांची मान्यता:

  1. सहायक कुलसचिव: १ पद
  2. सहायक नियंत्रक: १ पद
  3. वरिष्ठ संशोधन सहायक: ६ पद
  4. कनिष्ठ संशोधन सहायक: ८ पद
  5. कृषी सहायक: १ पद
  6. शाखा अधिकारी: १ पद
  7. वरिष्ठ लिपिक: ४ पद
  8. कनिष्ठ लिपिक: ४ पद
  9. वीजतंत्री: १ पद
  10. ग्रंथालय सहायक: १ पद
  11. प्रयोगशाळा सहायक: १० पद

खालील शिक्षकवर्गीय पदांची मान्यता दिलेली आहे:

  1. अधिष्ठाता: १ पद
  2. प्राध्यापक: ३ पद
  3. सहयोगी प्राध्यापक: ८ पद
  4. सहायक प्राध्यापक: ३३ पद

आता कृषी विद्यापीठस्तरावरून भरती प्रक्रिया राबवली जाईल, असे सांगितले जात आहे. भाऊसाहेब फुंडकर कृषी महाविद्यालयामुळे कृषी शिक्षणाची सोय निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांची पदनिर्मितीनंतर आता महाविद्यालयाच्या इमारत निर्मितीलाही कधी मुहूर्त मिळतो, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड