शिक्षकेतर कर्मचारीभरती करण्याची मागणी

Pavitra Portal Shikshak bharti


Maharashtra Shikshak Bharti 2020 – Shikshka Bharti updates is published now. As per the New Sources Shikshak Bharti details are given here. As per the news sources yet the update is in progress. The Shikshak Bharti 2020 is delayed now due to Corona impact. Yet the update about School starting is pending. But Now the bharti For Shikshakottar Bharti is on demand.

शाळा नेमक्या कधीपासून सुरू करायच्या, याचा निर्णय अजून झालेला नाही. मात्र, शाळा सुरू होतील, तेव्हा शाळांची नियमित साफसफाई व स्वच्छता हा सर्वांत मोठा प्रश्न असेल. त्यासाठी शाळांना अतिरिक्त सेवक-शिपायांची गरज भासेल. त्यासाठीच २००१ पासून रखडलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

राज्यात २००१-०२ पासून शालेय शिक्षण विभागात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे. शिक्षकेतर पदे निश्चित करून तातडीने पदभरती करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळासह अनेक संघटनांनी वारंवार आंदोलने केली, मोर्चेही काढले. त्यानंतर सरकारने २८ जानेवारी २०१९ रोजी शासन आदेश काढून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची काही प्रमाणात भरती करण्यास परवानगी दिली होती; परंतु शिपाई व सेवक कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत निर्णय प्रलंबित ठेवला होता. आताही करोनाच्या पार्श्वभूमीवर चार मे २०२० रोजी सरकारने आदेशद्वारे नवीन नियुक्ती करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे ही पदे रिक्तच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pavitra Portal Shikshak bharti 2020- 2021 – Maharashtra Pavitra Portal Shikshak Bharti 2020 Details are given here. The respective updates about Pavitra Portal & updates will be decalred here. Due to the Corona Effect Shikshak Bharti is on hold now. The large number of candidates are waiting for this shikshka Bharti from all over Maharashtra. The More updates 7 Details will be available Soon.

शिक्षक भरतीला परवानगी मिळावी – राज्य सरकारने आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागाने नवीन प्रकारची पदभरती करू नये, असे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा फेरविचार करून उर्दू व मराठी माध्यमाच्या शिक्षक भरती प्रक्रियेस विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने केली आहे. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना संघाने निवेदन दिले आहे.

राज्यात पवित्र पोर्टलद्वारेच्या शिक्षक भरती प्रक्रिया  सव्वा वर्षापासून सुरु आहे. शिक्षक भरतीसाठी पूर्वीच सर्व जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शाळांमधील शिक्षक भरतीचा टप्पा पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शिक्षक भरती साठी शासनाकडून विशेष परवानगी मिळवण्यासाठी शिक्षण विभागाने धडपड सुरु केली आहे. यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या मार्फत राज्य शासनाकडे दोन दिवसात प्रस्तावही पाठविण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्यातील ‘पवित्र’ या पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षकांची भरती प्रक्रिया अर्धवट अवस्थेत आहे. वित्त विभागाने १६ हजार १२४ शिक्षकांच्या भरतीला परवानगी दिली होती. त्यापैकी १२ हजार नव्या शिक्षकांची भरती झालेली आहे. काही कारणामुळे काही पदांच्या भरती अर्धवट अवस्थेत आहेत. या भरतीचे काय होणार असाही संभ्रम आता टीईटी व सीईटी उत्तीर्णधारकांपुढे आहे.

विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने वर्षापूर्वी घेतला होता. नवीन व जून्या शासनाने विविध विभागाच्या मेगा भरतीच्या अनेकदा घोषणा ही केल्या. मात्र त्याची पूर्तता होऊ शकली नाही. हे उमेदवारांबाबत अन्यायकारकच आहे. शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठी पवित्र पोर्टलही कार्यान्वित करण्यात आले होते. या भरती प्रक्रियेत सुरुवातीपासून कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचे अडथळे येतच आहे.

राज्यात 12 हजार 140 शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठीचा कार्यक्रम आखण्यात आला होता. निवड यादीतील सुमारे 6 हजार उमेदवारांना शाळांमध्ये नोकरी मिळाली आहे. माजी सैनिकांच्या 1 हजार 200 जागांसाठी आरक्षणनिहाय उमेदवार मिळाले नाहीत. खासगी शाळांमध्ये मुलाखती घेऊन उमेदवारांची शिक्षक भरती करण्यात येणार आहे. यात 850 शैक्षणिक संस्थांमधील 3 हजार जागा भरण्यात येणार आहेत.

दरम्यान, राज्य शासनाच्या वित्त विभागाने करोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली असल्याचे नमूद करत काटकसरीच्या दृष्टीने काही निर्णय जाहीर केले आहेत. यात सार्वजनिक आरोग्य , वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभाग वगळता इतर कोणत्याही विभागात नवीन पदभरती करू नये असे स्पष्ट केले आहे. यामुळे नोकरभरतीला बंदी घालण्यात आल्याचे जाहीर होताच बेरोजगार उमेदवाराकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. या नोकरभरती वरील बंदीमुळे सुमारे ४ हजार ५०० जागांची शिक्षक भरती अडकून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी उमेदवारांकडून होऊ लागली आहे.

‘काही विषयांना वगळा’

या निर्णयामुळे जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित छोट्या शाळांना पदभरती बंदीचा मोठा फटका बसेल. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक हे विषयनिहाय अध्यापन करतात. त्यातच विज्ञान-गणित शिकविणारा एकच शिक्षक जूनमध्ये निवृत्त झाला तर त्याविषयाचे अध्यापन कुणी करावे? असा प्रश्न निर्णाण झाला आहे. त्यामुळे सरसकट पदभरती बंदी न करता इंग्रजी, विज्ञान व गणित विषयांना भरती बंदीतून वगळण्यात यावे, अशी मागणी भाजपचे शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली आहे.

पवित्र पोर्टलद्वारेची उर्वरित शिक्षक भरती शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. ‘आरटीई’ कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या पटसंख्या नुसार शाळांमध्ये शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. या भरतीतील जुनीच सर्व कामे पूर्ण करावयाची आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेस परवानगी मिळण्याची गरज आहे. यासाठी शासन स्तरावर प्रस्तावातून सविस्तरपणे बाजू मांडण्यात येणार आहे. शासनाने शिक्षक भरतीसाठी सकारात्मकता दर्शविणे अपेक्षित आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.8 Comments
 1. Anjali Shinde says

  Shishak Bharti madhe me apply karu shakate ka ? Me M. A. B. Ed.. ahe. Maji khup divsachi ambition ahe.

 2. More Nirmala popatrao says

  Shikshak barti sathi tet lagtech ka? Mi ma.bed ahe.mala job chi garaj ahe mi Kay karu shakte.

 3. Pushpalata says

  I have completed 32 yrs in CBSC pattern in K.V. Successfully with as Excellent Innovative teacher l am B.SC B.ED with CHEM Won prizes in social Activities also Awarded by Sakal and Lokmat News papers NIE I am still interested in End to do something shall l get change pl waiting for reply as early as possible Thanking you

 4. Priyanka vetal says

  Me Bsc B.ed plus Tait pass ahe but Tait nantar je registration zal te kel nahi any chance to do this registration or apply for government teacher post

 5. Priyanka potdar says

  Tet pass asne garjeche ahe ka

 6. Sukeshni more says

  Hello sir,maz m.sc B.ed zalel ahe tr mi yasathi try karu shaktey ka ki ata m.ed sathi ln addmission ghetle ahe

 7. अरुण says

  नमस्कार सर मी माजी सैनिक आहे त्या संदर्भात जर जॉब असेल तर कळवा प्लीज

 8. Deepika Ramtekkar says

  ME BA B.ed tet & ctet 1 paper pass aahe. Tet pass houn 3 vvarsh zale partntu tait pariksha kadhi honar.Shikshak bharat bharti kadhi honar.

Leave A Reply

Your email address will not be published.