पवित्र पोर्टल शिक्षक अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; अर्ज करा !!! । Pavitra Portal Shikshak Bharti 2025
Pavitra Portal Shikshak Online Application 2025
Pavitra Portal Shikshak Bharti 2025
Pavitra Portal Shikshak Bharti 2025: Pavitra Portal Shikshak has published a recruitment notice for the posts of “Teacher”. There are total of 06 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned link before the last date. Last date For submitting application is 10 days (21st of February 2025). For more details about Pavitra Portal Shikshak Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
पवित्र पोर्टल शिक्षक अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (21 फेब्रुवारी 2025) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
🔥थोडेच दिवस बाकी, बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये 129 लिपिक पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शिक्षक
- पदसंख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 दिवस (21 फेब्रुवारी 2025)
- अधिकृत वेबसाईट – https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/
Pavitra Portal Shikshak Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
शिक्षक | 06 |
Educational Qualification For Pavitra Portal Shikshak Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिक्षक | Graduate |
Salary Details For Pavitra Portal Shikshak Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शिक्षक | Consolidated Pay-GT 6-8 (16000) |
How To Apply For Pavitra Portal Shikshak Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (21 फेब्रुवारी 2025) आहे
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For tait2022.mahateacherrecruitment.org.in Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/DuGg3 |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/ChGSB |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/ |
Pavitra Portal Shikshak Bharti 2025
महाराष्ट्र शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदची बातमी. महाराष्ट्र राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा सोमवारपासून (दि. २०) सुरू करण्यात येणार आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीसाठी पुढील कार्यवाही करावयाची आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठीच्या ऑनलाइन कामासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. दुसऱ्या टण्यातील जिल्हा परिषदेकडी उर्वरित १० टक्के रिक्त पदे, पहिल्या फेरीतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले उमेदवार, अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा या बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यावयाची आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करिता पुढील आवश्यक कार्यवाहीच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदांकडील बिंदुनामावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी यांना दिल्या आहेत. शिक्षण संस्थांना पदभरतीची कार्यवाही तत्काळ करावयाची आहे.
राज्यातील खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आता सुरु झाला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया तातडीने सुरु करण्यासाठी पवित्र पोर्टल विकसीत करण्याचे काम तलिस्मा कार्पोरेट प्रा. लि. या कंपनीला दिले आहे. जानेवारीअखेर रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होतील आणि जूनअखेर भरती प्रक्रिया पूर्ण होईल, असे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. राज्य शासनाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य अभ्यासक्रम आराखडा यापूर्वीच मंजूर केला आहे. आता पहिल्यांदा आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असून या वर्गांची पाठ्यपुस्तक निर्मिती पूर्ण झाली आहे. जानेवारीअखेर त्या पुस्तकांची छपाई सुरु होईल. मराठी शाळांमध्ये आता ‘सीबीएसई’प्रमाणेच अभ्यासक्रम असणार असून त्यादृष्टीने नियोजन पूर्ण झाले आहे. शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी पटसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक आवश्यक आहेत.
नूतन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच राबविला जाईल, असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार आता शालेय शिक्षण विभागाची कार्यवाही सुरु झाली आहे. जानेवारीअखेर जिल्हा परिषदांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु होईल. त्यानंतर फेब्रुवारी व मार्चमध्ये पात्र उमेदवारांकडून सेल्फ सर्टिफिकेट भरून घेतले जाईल आणि शेवटच्या टप्प्यात त्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यात गुणवत्तेनुसार संबंधित उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतरही शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागांची भरती करण्यासाठी दुसरा टप्पा राबविण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासाठी शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने विचारणा होत आहे. त्यामुळे पदभरतीची तातडी असल्याने व पहिल्या टप्प्यात तलिस्मा कार्पोरेट प्रा. लि. कंपनीने चांगले काम केल्याचे विचारात घेऊन याच कंपनीस एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल, त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या कंपनीला शासनाकडून ६८ लाख ८४ हजार १२० रुपये दिले जाणार आहेत.
राज्यातील शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. शालेय शिक्षण हे आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण मिळावे, यासाठी आमचा कायम आग्रह आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी राज्यातील शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुंबईत दिली. राज्यातील शाळा संस्थाचालकांच्या प्रतिनिधींसोबत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे घेतलेल्या आढावा. बैठकीत भुसे यांनी ही घोषणा केली. यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आदींसह राज्यातील ७५ हून अधिक संस्थाचालक उपस्थित होते. पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील भरती आणि त्याचे काम सुरू लवकरच होईल, असे सांगत अजूनही राज्यातील काही संस्थाचालक आपल्या शाळांमधील माहिती ही पवित्र पोर्टलकडे देत नाहीत, त्यावर भुसे यांनी नाराजी व्यक्त केली.
एकीकडे आदिवासी पाड्यांवर असलेल्या शाळांतील मुले गुणवत्ता सिद्ध करत असताना अनेक शाळांमध्ये पाचवी-सहावीतील विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. हे प्रश्न कसे सोडवता येतील, यासाठी एकत्रित येऊन काम करण्याचे आवाहन भुसे यांनी संस्थाचालकांना केले. ते म्हणाले, तालुका आणि जिल्हा पातळीवर विषय सुटतील, असा प्रयत्न केला जाईल. संचालक आणि शाळांच्या कामासाठी विभागाकडून जाणीवपूर्वक त्रास होणार नाही. तसेच भौतिक सुविधांची माहिती घेऊन त्याचाही रोड मॅप तयार केला जाईल. राज्यात होणारी शिक्षकांची भरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाऊ नये, ती पद्धतच रद्द करून संस्था स्तरावर त्याचे अधिकार द्यावेत, अथवा वेगळी यंत्रणा राबवावी, अशी मागणी संस्था चालक प्रतिनिधींनी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली. त्याशिवाय टप्पा अनुदान, क्रीडा, संगीत शिक्षक भरती आदी अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची भावी शिक्षकांना प्रतीक्षा आहे. आचारसंहितेमुळे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती रखडलेली होती. आता आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत २१ हजार ६७८ शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबरोबरच खासगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया दोन वर्षांपासून सुरू आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात २१ हजार ६७८ जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात विविध कारणांनी रिक्त राहिलेल्या जागा आणि इतर रिक्त जागांसाठी दुसरा टप्प्यात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती. त्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती आता भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिक्षण विभागाकडून ‘पवित्र’ संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्याची भरती राबवली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक होण्याची आकांक्षा असलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षेला प्रतिसाद दिला असून, राज्यभरातून साडेतीन लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी नोंदणी केली आहे. राज्यात पहिली ते आठवीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर टीईटी आयोजित केली जाणार आहे. ९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून अर्ज नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. तर शुल्क भरण्यासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. एकूण ३ लाख ५५ हजार ९०५ उमेदवारांनी अर्ज भरला आहे. पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. या टप्प्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तथा शिक्षणाधिकाऱ्यांना आहेत, दिले याविषयीचे पत्र १३ सप्टेंबर रोजी देण्यात आले आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सध्या शिक्षक भरती सुरू आहे. मुलाखतीविना भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तसेच मुलाखतीसह या पदभरती प्रकारात ३१ ऑगस्टपर्यंत खासगी संस्थांवरील रिक्त जागांसाठी मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणी घेण्यात आली आहे. आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.
edustaff.maharashtra.gov.in Pavitra Portal 2025 Registration Link
Post For | Pavitra Portal Registration 2025 For Shikshak Bharti Process |
Portal Name | Maha TAIT Pavitra Portal (New Portal) |
Pavitra Portal Registration By | School Education and Sports Department |
Mode | Online Application forms & registration process |
Portal For | Education Staff and Aspirants of Teachers |
Article Category | Pavitra Portal Latest Updates |
Under | Government of Maharashtra |
Now Available | Mumbai Pune Kolhapur Nashik Davison Wise |
Helps | Education Staff Teaching and Non-Teaching |
Pavitra Portal | edustaff.maharashtra.gov.in |
edustaff.maharashtra.gov.in Pavitra Portal 2025 Link
Post For | Pavitra Portal Registration 2025 For Shikshak Bharti Process |
Portal Name | Maha TAIT Pavitra Portal (New Portal) |
Pavitra Portal Registration By | School Education and Sports Department |
Mode | Online Application forms & registration process |
Portal For | Education Staff and Aspirants of Teachers |
Article Category | Portal |
Under | Government of Maharashtra |
Now Available | Mumbai Pune Kolhapur Nashik Davison Wise |
Helps | Education Staff Teaching and Non-Teaching |
Pavitra Portal | edustaff.maharashtra.gov.in |
Table of Contents
If Drawing teacher vacancy is there pls send mail
Take this care while filling teacher recruitment application form on sacred portal, otherwise you will not be able to participate in the recruitment process
Step By Step Pavitra Shikshak Bharti Application Process
Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Application forms
Pavitra Portal Shikshak Bharti 2023