पवित्र पोर्टल दुसरा टप्पा प्रतीक्षेत; शिक्षकपद भरतीची प्रतीक्षा! । Pavitra Portal Shikshak Bharti 2024
Pavitra Portal Shikshak Bharti 2024 - mahateacherrecruitment.org.in
Pavitra Portal Shikshak Bharti 2024
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची भावी शिक्षकांना प्रतीक्षा आहे. आचारसंहितेमुळे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती रखडलेली होती. आता आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत २१ हजार ६७८ शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबरोबरच खासगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया दोन वर्षांपासून सुरू आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात २१ हजार ६७८ जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली.
पहिल्या टप्प्यात विविध कारणांनी रिक्त राहिलेल्या जागा आणि इतर रिक्त जागांसाठी दुसरा टप्प्यात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती. त्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती आता भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शिक्षण विभागाकडून ‘पवित्र’ संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्याची भरती राबवली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक होण्याची आकांक्षा असलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षेला प्रतिसाद दिला असून, राज्यभरातून साडेतीन लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी नोंदणी केली आहे. राज्यात पहिली ते आठवीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर टीईटी आयोजित केली जाणार आहे. ९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून अर्ज नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. तर शुल्क भरण्यासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. एकूण ३ लाख ५५ हजार ९०५ उमेदवारांनी अर्ज भरला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. या टप्प्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तथा शिक्षणाधिकाऱ्यांना आहेत, दिले याविषयीचे पत्र १३ सप्टेंबर रोजी देण्यात आले आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सध्या शिक्षक भरती सुरू आहे. मुलाखतीविना भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तसेच मुलाखतीसह या पदभरती प्रकारात ३१ ऑगस्टपर्यंत खासगी संस्थांवरील रिक्त जागांसाठी मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणी घेण्यात आली आहे. आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.
पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पद भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. मुलाखतीशिवाय’ या प्रकारातील १६७९९ या जाहिरातीच्या रिक्त पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. ‘आता ‘मुलाखतीसह’ पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शासन निर्णय दिनांक ७/२/२०१९ मध्ये एकूण ३० गुणांची तरतूद करण्यात आली आहे. पात्र उमेदवाराची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्थास्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबिण्यात येते. अशा परिस्थितीत शिक्षक पदभरतीमध्ये एकसुत्रता (Uniformity) राखण्याच्यादृष्टीने व उमेदवारांचे योग्यरित्या वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा (SOP_Standard Operating Procedure) अवलंब करणेत येत असून यासाठी शासन पत्र दिनांक ०६/०८/२०२४ अन्वये मानक कार्यपद्धती (SOP_Standard Operating Procedure) निश्चित केली आहे. ‘मुलाखतीसह’ पदभरती मध्ये इयत्ता पहिली ते पाचवी / इयत्ता सहावी ते आठवी / इयत्ता नववी ते दहावी/ इयत्ता अकरावी ते बारावी या गटातील शिक्षणसेवक/शिक्षकांच्या ४८७९ रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. १०९६ व्यवस्थापनातील ४८७९ रिक्त पदांसाठी ७८०५ उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील जास्तीतजास्त १० प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाने ‘पवित्र पोर्टल’मधून ३२७ शिक्षकांची मागणी करणे आवश्यक आहे. मात्र, सन २०२२ च्या ‘पवित्र पोर्टल’मध्ये महापालिकेने शिक्षकांच्या रिक्त पदांची मागणी न केल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, मराठी, उर्दू व हिंदी माध्यमांच्या शाळांना कायमस्वरूपी प्राथमिक शिक्षक मिळू शकले नाहीत. दरम्यान, दोन वर्षापासून मानधनावरील शिक्षकांची मेगा भरती सुरू आहे. त्यातही उर्दू माध्यमांच्या शाळांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत सध्या शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे अध्यापनावर परिणाम झाला असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्यभर शिक्षक भरती ही शासनाने निर्माण केलेल्या ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे कोणत्या जागी किती जागांची भरती आहे, त्याबाबत निश्चित माहिती या पोर्टलच्या माध्यमातून प्राप्त होते. त्यामुळे पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येणारी भरती करणे आवश्यक असते.
प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन प्रशासन अधिकारी यांनी रिक्त पदांच्या जाहिराती शासनाच्या ‘पवित्र पोर्टल’कडे दिल्या नाहीत. प्राथमिक शिक्षण विभागाने संदर्भीय २ नुसार राज्य स्तरावरून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवनियुक्त प्राथमिक शिक्षण सेवकांच्या नियुक्तीसाठी मागणी न करता ३० नोव्हेंबर २०२२ रोजी २८५ रिक्त असलेल्या जागांसाठी मानधन तत्त्वावर महापालिकास्तरावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. संदर्भीय १ नुसार पुन्हा मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पिंपरी महापालिकास्तरावर मराठी माध्यमाच्या २४५, उर्दू माध्यमासाठी ६६ आणि हिंदी माध्यमाच्या १६ अशा रिक्तपदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वारंवार शिक्षण विभागाकडून मानधनावरील शिक्षकांची भरती सुरू आहे. त्यामुळे राज्यस्तरावर ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून रिक्त असलेल्या महापालिकास्तरावर कायमस्वरूपी नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या नेमणुका तत्काळ करण्याची कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
‘उर्दू’कडे प्रशासनाकडून दुजाभाव?
उर्दू शाळेत ६६ शिक्षकांची पदे रिक्त असताना संपूर्ण पदे भरण्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड एज्युकेशन सोसायटीने केला आहे. उर्दू माध्यमाच्या एकाही शिक्षण सेवकाची पवित्र प्रणालीद्वारे नियुक्ती केली नाही. महापालिकेने राबविलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला ४०० उमेदवार आले असतानाही केवळ ३० जागांवरच भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे.
आकडे बोलतात
- माध्यम – शिक्षक संख्या
- मराठी माध्यम – २४५
- उर्दू माध्यम – ६६
- हिंदी माध्यम – १६
‘पवित्र पोर्टल मधून जिल्ह्यात दाखल झालेल्या २७४ शिक्षकांना आज अखेर नियुक्ती देण्यात आली. साडेतीन महिन्यांपूर्वी हे शिक्षक आले होते. मात्र उन्हाळ्याची सुटी आणि लोकसभा निवडणुकीची धामधूम यामुळे त्यांची नियुक्ती लांबली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नूतन शिक्षकांना जिल्ह्याची भौगोलिक रचना समजवून घेऊन गुणवत्ता वृद्धिंगत करावी, असे आवाहन केले. ‘पवित्र पोर्टल मधून जिल्ह्यात दाखल झालेल्या २७४ शिक्षकांना आज अखेर नियुक्ती देण्यात आली. साडेतीन महिन्यांपूर्वी हे शिक्षक आले होते. मात्र उन्हाळ्याची सुटी आणि लोकसभा निवडणुकीची धामधूम यामुळे त्यांची नियुक्ती लांबली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नूतन शिक्षकांना जिल्ह्याची भौगोलिक रचना समजवून घेऊन गुणवत्ता
जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील मुख्य सभागृहात कार्यकारी अधिकारी सी. धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली ‘पवित्र पोर्टल’मधून आलेल्या शिक्षकांना आज नियुक्ती देण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड उपस्थित होते
प्राथमिक शिक्षण विभागाने ‘पवित्र पोर्टल’मधून ४८१ शिक्षकांची मागणी केली होती. त्यापैकी २७४ शिक्षक प्राप्त झाले आहेत. त्यात मराठी, कब्रड व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा समावेश आहे. मार्च महिन्यात शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती.
जिल्हा परिषदेत चार दिवसांपासून शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया संपल्यानंतर ‘पवित्र पोर्टल’मधून आलेल्या २७४ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या शिक्षकांना पदस्थापना देण्याचे काम सुरू होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे आणि शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी या शिक्षकांना मार्गदर्शन केले. कोणत्याही प्रकारच्या अडचणीबद्दल थेट संपकर्काचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या शाळा उद्यापासून (ता. १५) सुरू होत आहेत. ‘पवित्र पोर्टल’मधील शिक्षकांना शाळा देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. शाळेच्या पहिल्या दिवशी पवित्र पोर्टलमधील शिक्षकांना हजर होण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी दिले.
Maharashtra Pavitra Portal Teacher Vacancy 2024
अग्निपथ योजना बंद होणार? NDA सरकार घेणार मोठा निर्णय जिल्ह्यात शिक्षकांची हजारो पद रिक्त असल्याने ज्ञानदान करताना शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया जिल्हा परिषदेत सुरू असून, मुख्याध्यापक पदोन्नती झाल्यानंतर शिक्षकांच्या रिक्त पर्दाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मार्चपासून जिल्हा बदल्या झाल्यानंतर सुमारे ७२ शिक्षक टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषदेत रुजू झाले आहेत. परंतु अद्यापही त्यांना पदस्थापना न दिल्याने जिल्हा परिषदेत कारकुनी कामे करावी लागत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. १५ जूनपूर्वी जिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांना पदस्थापना द्यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष युवराज पवार, विभागीय अध्यक्ष पृथ्वीबाबा शिरसाठ, जिल्हाध्यक्ष बाजीराव सोनवणे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे केली आहे.
दृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालकांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
Pavitra Portal Shikshak Bharti 2024: आचारसंहितेचे कारण पुढे करत पवित्र पोर्टलद्वारे रखडलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया आता विनंती बदल्यांच्या प्रक्रियेनंतरच करण्याचे स्पष्ट आदेश राज्य सरकारने १७ मे रोजी दिले. विशेष म्हणजे १६ मे रोजी राज्यातील २५० टीईटी पात्र शिक्षकांच्या पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त्यांचे आदेश देण्यात आले आहे. त्यांना १ जून रोजी रुजू होण्याबाबतही स्पष्टता करण्यात आली आहे. त्यामुळे आता नेमकी कुठली प्रक्रिया राबवावी याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचाही संभ्रम असून, शासनाने जणू वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार केल्याचे यातून समोर आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने १७ मे रोजी काढलेल्या आदेशानुसार आता प्रथम शिक्षकांच्या विनंती बदल्या करून घ्याव्यात. म्हणजे जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यांतर्गत करण्यात येणाऱ्या बदल्यांची प्रक्रिया शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेच्या आधारे करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेपूर्वीच करण्याचे सांगण्यात आले आहे. शिक्षकांच्या बदल्या आधी होतील अन् मगच पवित्र पोर्टलद्वारे टीईटी पात्र शिक्षकांची नियुक्ती केली जाईल, असेच दिसत आहे. जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत, त्यांच्यापैकी जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त जागी नियुक्ती देण्यात यावी. परंतु हे करत असताना समुपदेशनापूर्वी संभाव्य नवीन नियुक्ती पदे विचारात घ्यावी. व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची काळजी घ्यावी. असे आदेश यापूर्वीच शासनाने दिले आहेत. त्यानुसारच आता नवीन शिक्षक नियुक्ती करताना अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
पेसाचा प्रश्न गंभीर, १५० शिक्षक न्यायालयात
नाशिक जिल्ह्यात पेसा क्षेत्रात नियुक्त शिक्षकांना शहरालगत नियुक्ती मिळावी यासाठी या गुरुर्जीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. परंतु यापूर्वीच अनेक वर्षांपासून पेसात काम करत असलेल्या शिक्षकांनीही शहरालगत नियुक्ती मागितली आहे. परंतु अद्यापही न मिळाल्याने जवळपास १५० शिक्षकांनी थेट न्यायालयातच धाव घेतली आहे.
पात्र शिक्षकांचाच विचार
विनंती बदल्यांसाठी नाशिक जिल्ह्यात विविध तालुक्यांतील १००० पेक्षा अधिक शिक्षकांनी अर्ज केले आहेत. परंतु यातील पात्र शिक्षकांचाच विचार केला जाऊ शकेल
बदल्यांमुळे शक्यता कमी
नाशिक जिल्हा परिषदेंतर्गत २०२२-२३ अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबवली. त्यामुळे आता ही प्रक्रिया राबविणे अशक्य असल्याचे विभागाने सांगितले.
शिक्षकांमध्ये संभ्रम
• टीईटी उत्तीर्ण २५० शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया झाली. नाशिकमधील ५० ते ६० शिक्षक असतील. त्यांना १ जूनपासून रुजू होण्याबाबत सांगण्यात आले आहे. पण आता नव्या आदेशाने अंतर्गत विनंती बदल्यानंतर नियुक्ती करण्याबाबत शासन आदेश आहेत. त्यामुळे काहिसा संभ्रम आहे. शासन जणू वराती मागून घोडे दामटवत आहेत. आचारसंहितेनंतर प्रक्रिया होऊ शकेल. – एस. बी. देशमुख, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ
Pavitra Portal Teacher Vacancy 2024
निवडणूक आयोगाने विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक स्थगित केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यांनी शिक्षक भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्त्या देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवड होऊनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. शिक्षक विभागातर्फे ‘पवित्र’ संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने ५७१ मराठीच्या जागांसाठी, तर ९२ उर्दूच्या जागांसाठी जाहिरात दिली होती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
त्यापैकी ३७० मराठीसाठी आणि उर्दूसाठी ३८ जणांची अंतिम निवड करण्यात आली होती. मात्र, कागदपत्रे पडताळणीासाठी मराठीचे १०, तर उर्दूचे ५ उमेदवार गैरहजर राहिले होते. कागदपत्र पडताळणीनंतर आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषदेने मराठीच्या २०० तर उर्दूच्या ३१ अशा एकूण २३२ उमेदवारांना पदस्थापना दिली होती.
दुसऱ्या टप्प्यात माध्यमिकच्या उमेदवारांना पदस्थापना द्यायची होती, मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीमुळे थांबली होती. शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेच्या पुढील कार्यवाहीबाबत निवडणूक आयोगाला प्रस्ताव दिला होता. त्यानुसार आयोगाने निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यांत शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार आता शिक्षक भरती प्रतीक्षेत असलेले १५४ मराठीचे,
तर एक उर्दू माध्यम असे १५५ जणांना लवकरच पदस्थाना दिली जाणार आहे. शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भातील सविस्तर आढावा शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे, असे शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, नवीन शिक्षकांना पदस्थापनेअगोदर विनंती बदली प्रक्रिया राबविण्यात यावी, असे शिक्षण विभागाचे आदेश होते. त्यामुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्याआगोदर विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांचा विचार केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक हजाराहून अधिक शिक्षकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले होते.
ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाने संदर्भ क्र 02 नूसार प्राथमिक शिक्षण सेवक या संवर्गीय कर्मचाऱ्याचे नियुक्ती करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना प्रदान केलेले आहेत. त्यानुसार शासनाने प्राथमिक शिक्षक संवर्गीय शिक्षकांची रिक्तपदे भरण्याकरिता पवित्र पोर्टल प्रणाली व्दारे भरती प्रक्रिया सुरु केली आहे. सदर पदभरती करण्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पवित्र प्रणाली मार्फत पदभरती करून नियुक्ती करण्यात येत आहे. संदर्भ क्रं. १७ नुसार पात्र यादी पवित्र प्रणाली संकेतस्थळावर प्राप्त झालेली आहे.
त्याअर्थी मी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड संदर्भ क्र. १७ मधील पात्र यादीतील उमेदवारापैकी संदर्भ ५ व १४ नुसार समितीमार्फत कागदपत्र पडताळणी करून समितीने निवड यादी घोषित केली आहे. त्या निवड केलेल्या प्राथमिक शिक्षण सेवक (पदवीधर शिक्षक-इ. 6 वी ते 8 वी) माध्यम-मराठी व उर्दू, विषय-गणित व विज्ञान, भाषा, सामाजिक शास्त्र या विषयासाठीच्या आणि (इ.1 ते 5) प्राथमिक शिक्षण सेवक उमेदवारांना प्राप्त निवड यादीतील समांतर आरक्षणातील उमेदवारांनी त्यांचे प्रमाणपत्र तपासणी अहवाल संदर्भ क्रं. २०नुसार प्राप्त झाला आहे. संबंधीत विभागाकडून उमेदवारांचे प्रमाणपत्र वैध असल्याचा तपासणी अहवाल प्राप्त प्रमाणे मला प्राप्त अधिकाराचा वापर करुन खालील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे अटी व शर्तीच्या अधिन राहून नियुक्तीने पदस्थापना करीत आहे.
पूर्ण PDF डाउनलोड करा
Pavitra Portal Shikshak Bharti 2024: शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक शिक्षक भरती २०१७ साठी सन २०१९ मध्ये जाहिरात दिलेल्या पैकी ज्या जिल्हा परिषदेच्या ५०% रिक्त पद भरतीची कार्यवाही झाली आहे त्या पदभरतीच्या वेळी राखून ठेवण्यात आलेल्या ५० % जागाबाबत शासनाकडे पुढील प्रक्रिया करण्यास आवश्यक प्रस्ताव व माहिती सादर करण्यात आली आहे. यावर शासन स्तरावरून निर्णय झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल. .
Pavitra Portal Teacher Update
अभियोग्यत्ताधारकांमध्ये संभ्रम अथवा निराशा निर्माण होईल असे काल्पनिक मुद्दे काही मंडळी रोज उपस्थित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. भरती प्रक्रिया न्याय्य व कोणत्याही खोडसाळपणाला थारा न देता पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे संभ्रम अथवा निराशा पसरवणाऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहावे. ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.
Maha PP Shikshak Update
Pavitra Portal Shikshak Bharti 2024: General Merit List with recommendation for selection of qualified candidates as per merit has been published by Management/Advertisement on 25/02/2024 through Pavitra portal. Accordingly, after verifying the documents of the eligible candidates, the appointment process was started at the level of the appointing authority through counselling.
पवित्र पोर्टल मार्फत दिनांक २५/०२/२०२४ रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन/जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरु करण्यात आली होती.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दरम्यान मा. भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा- २०२४ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले. तथापि, या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरु ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत मा. भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. यासंदर्भात मा. भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करणेस परवानगी दिली असून तसे शासन पत्र दिनांक १९/०४/२०२४ अन्वये या कार्यालयास कळवणेत आले आहे. त्यानुसार वरील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.
Pavitra Portal Shikshak Bharti Update
Pavitra Portal Shikshak Bharti 2024: New teacher recruitment press release has been published today on Pavitra portal. The first recommendation list for teacher recruitment as per Teacher Aptitude and Intelligence Test 2022 was released on 25/02/2024. After publication of the recommended list of candidates, the candidates who have any doubts regarding their selection, were given the facility to complain/report to the Grievance Redressal and Redressal Committee. Scrutiny of application received in prescribed format on official email id is almost complete,
पवित्र पोर्टलवर आज नवीन शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक प्रकाशित झाले आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार शिक्षक पदभरतीची पहिली शिफारस यादी दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारांची शिफारस यादी प्रसिद्ध केल्यानंतर ज्या उमेदवारांना स्वतःच्या निवडीबाबत काही शंका असल्यास, त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे तक्रार/निवेदन करण्याची सुविधा देण्यात आली होती. अधिकृत ईमेल आयडीवर विहित नमुन्यात प्राप्त अर्जाची छाननी जवळपास पूर्ण झालो आहे,
• दिनांक ०४/०४/२०२४ अखेर विहित नमुन्यात प्राप्त तक्रार अर्जावर कार्यवाही करून उमेदवारांच्या ईमेलवर समितीचा निर्णय दिनांक ०२/०४/२०२४ पासून कर्जावण्यात येत आहे. दिनांक ०४/०४/२०२४ अखेर पर्यंत निर्णय कळविलेल्या अर्जाची संख्या ४५३ इतकी आहे. तसेच अन्य ईमेलवर वेळोवेळी योग्य तो प्रतिसाद देण्यात आला आहे.
• उर्वरित तक्रार अर्जावर पुढील काही दिवसांत समितीचा निर्णय कळविण्यात येणार आहे.
लोकसभा २०२४ च्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सध्या लागू आहे. यास्तव निवडणूक आयोगाकडून शिक्षक पदभरतीबाबत परवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. महत्त्वाच्या बाबींची माहिती “न्यूज बुलेटीन” द्वारे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल.
शिक्षक भरतीस पात्र असलेल्या उमेदवारांना पवित्र पोर्टलवर जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. ही सुविधा येत्या 9 ते 12 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सुरू राहणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार उद्या, सोमवारी (दि.12) प्राधान्यक्रम लॉक करण्याचा शेवटचा दिवस आहे. प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांना खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांमधील नववी ते बारावी या गटातील प्राधान्यक्रम देण्याची सुविधादेखील सुरू आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची कार्यवाही करावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अभियोग्यताधारकांकडून ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या मुद्द्यांना पोर्टलवर एकत्रितरित्या न्युज बुलेटिनद्वारे उत्तरे देण्यात येत आहेत. अभियोग्यताधारकांचे वेळ, श्रम वाचविण्यासाठी आणि एकाच ठिकाणी अधिकृत माहिती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे कार्यालयात गर्दी करू नये तसेच कोणाही अधिकारी, कर्मचारी अथवा अनाधिकृत व्यक्ती यांना व्यक्तींशः संपर्क करू नये, असेही आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. काही उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी अडचणी येत असल्यास अशा उमेदवारांनी त्यांनी पूर्वीचे प्राप्त प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करून लॉक करण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवार पदभरतीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी राहणार नाहीत. त्यामुळे प्राधान्यक्रम नमूद करून लॉक करणे अनिवार्य आहे, असेही शिक्षण विभागातर्फे कळवण्यात आले आहे.
पवित्र पोर्टल वर बहूप्रतिक्षीत जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत. खालील स्क्रिनशॉट मध्ये दाखविल्या प्रमाणे आपण दिलेल्या झिप फाईल्स खाली दिलेल्या लिंक वरून सुद्धा डाउनलोड करू शकता. या झिप मध्ये सर्व PDF फाईल्स दिलेल्या आहे. pavitra portal preference 2024 सुरु, त्वरीत उमेदवारांनी अपडेट करावा, लिंक सुरु.
राज्यातील बहुप्रतीक्षेत असणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार, अखेर मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ आणि मुलाखतीसह चार हजार ८७९ पदांची भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीसाठी ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२’ ऑनलाइन पद्धतीने घेतली होती.
या चाचणीसाठी एकूण दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते. या चाचणीमधील गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीसाठी शिक्षण सेवक, शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
Phase 1 WithOut Interviews Advertisements Download Link
Phase 1 With Interviews Advertisements Download Link
Online Application Link
शिक्षक भरती प्रक्रियेत माध्यम, बिंदुनामावली, विविध शिक्षक प्रवर्ग या सर्व विषयांचा एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या. सोशल मिडियावर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता. परंतु अशा कोणत्याही दबाव, खोडसाळपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय आणि शासनाचे विविध विषयावरील धोरणाचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षक भरतीच्या एकूण जागा जाहीर झाल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी जवळपास सात हजारांहून अधिक उमेदवारांनी प्राधान्यक्रम देखील दिला आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीच्या कार्यवाहीला मुहूर्त लागला असून शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून देण्यास सोमवार (ता.२९) पासून प्रारंभ झाला असला तरी, प्रात्याक्षिक पवित्र पोर्टल सुरूच झालेले नसल्याचा अनुभव उमेदवारांना येत आहे. यातच, शासकीय शाळांची जाहिरात प्रसिद्ध नसल्याने संभ्रमावस्था आहे. त्यामुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गत अनेक वर्षांपासून प्रलंबित शिक्षक भरतीची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यात १५ हजार शिक्षकांची भरती प्रक्रीया राबविणार असल्याचे जाहीर केले आहे.
edustaff.maharashtra.gov.in Pavitra Portal 2023 Registration Link
Post For | Pavitra Portal Registration 2023 For Shikshak Bharti Process |
Portal Name | Maha TAIT Pavitra Portal (New Portal) |
Pavitra Portal Registration By | School Education and Sports Department |
Mode | Online Application forms & registration process |
Portal For | Education Staff and Aspirants of Teachers |
Article Category | Pavitra Portal Latest Updates |
Under | Government of Maharashtra |
Now Available | Mumbai Pune Kolhapur Nashik Davison Wise |
Helps | Education Staff Teaching and Non-Teaching |
Pavitra Portal | edustaff.maharashtra.gov.in |
edustaff.maharashtra.gov.in Pavitra Portal 2023 Link
Post For | Pavitra Portal Registration 2023 For Shikshak Bharti Process |
Portal Name | Maha TAIT Pavitra Portal (New Portal) |
Pavitra Portal Registration By | School Education and Sports Department |
Mode | Online Application forms & registration process |
Portal For | Education Staff and Aspirants of Teachers |
Article Category | Portal |
Under | Government of Maharashtra |
Now Available | Mumbai Pune Kolhapur Nashik Davison Wise |
Helps | Education Staff Teaching and Non-Teaching |
Pavitra Portal | edustaff.maharashtra.gov.in |
Pavitra Portal Shikshak Bharti 2023: As per the latest newsOn 9th Feb 2023, The New Update is published for Pavitra Portal bharti 2023. As per this update Pavitra Portal Registration process will begin again for the Shikshak Bharti in Maharashtra. The details about this GR are given below @ education.maharashtra.gov.in. Pavitra Portal is the Maharashtra Shikshak Bharti portal for the registration process. Now there are some changes in this previous PavitraPortal System. New Updates & changes are given below.
Pavitra Portal Registration 2023 will start soon in April 2023. Candidates who have given Maha TAIT Exam 2023 are eligible for Pavitra Portal Registration 2023. Get an overview of Pavitra Portal Registration 2023 in the table below. More details about this Pavitra Portal application process & Online registration process will be published here. So for more updates keep visiting us. All the updates about Pavitra Portal 2023 will be published here.
How to Apply for Pavitra Portal Online Registration?
- Go to the official of the School Education and Sports Department, Government of Maharashtra that is edustaff.maharashtra.gov.in
- Select the “Application” section visible at the left side of the page.
- Thereafter, go to the “Pavitra” section and hit on the “Applicant” link.
- Now hit on the “Registration link” already registered candidates have to press login details.
- Enter your Tait Exam Number as Login ID and create your password using a mobile OTP option.
- Now fill the application form by providing the complete information.
- Fill Educational Qualification Details like State Board/University Passing month Marks Main Subjects, Secondary, Higher secondary, Degree etc.
- Fill the details of the professional Qualification and Upload the required documents.
- Finally, submit the form and note down your registration number.
Pavitra Portal Registration Eligibility Criteria
According to the sources that attending MAHA TAIT exam is compulsory for registration on education portal. Candidates who have not attended and not gain score in mahatait exam are not eligible for registration on Maharashtra Pavitra Portal. MAH-TET paper I/ Paper II pass out students are not eligible for Pavitra Portal Registration If they have not attended the Maha-TAIT exam 2017, and also CTET paper I/ Paper II pass out students are not eligible for Pavitra Portal Registration If they have not attended the Maha-TAIT exam 2017. It means that all candidates who faced MAHA TAIT Exam 2017 are only eligible to apply for registration on Pavitra Portal.
Pavitra Portal Registration Details. Pavitra Portal Details – Maharashtra government informed the Nagpur bench of Bombay High Court that it had stopped appointments of teachers through its newly launched portal Pavitra Portal till September 1. The reply came while hearing a plea by Stree Shikshan Prasarak Mandal and others contending.
Table of Contents
ok
Teacher vacancy notification
New Upodate