पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीच्या प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत वाढली; आता १६ ऑगस्टपर्यंत संधी
Pavitra Portal Bharti Extension: An important and positive update has emerged for teachers and teacher recruitment aspirants in Maharashtra. The latest development has brought significant relief to thousands of candidates waiting for the Maharashtra teacher recruitment process. Under the teacher recruitment process being conducted through the Pavitra Portal based on the Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) 2025, the deadline for generating and locking preferences for vacant teacher posts has been extended. The last date, which was earlier 13 August 2026, has now been extended to 16 August 2026. Currently, a total of 1,70,108 candidates who have completed their self-certification on the Pavitra Portal are in the process of generating and locking their preferences. Considering the difficulties faced by candidates while submitting their preferences, the authorities have decided to extend the deadline.
महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमी मुले महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक पदभरती प्रक्रियेत उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शिक्षक पदांच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची अंतिम मुदत १३ ऑगस्ट २०२६ ऐवजी आता १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पवित्र पोर्टलवर सध्या स्व-प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या एकूण १,७०,१०८ उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याची कार्यवाही सुरू आहे. उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदविताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याची स्थिती
पवित्र पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्यात आले आहेत. त्याची स्थिती पुढीलप्रमाणे आहे:
| वेळ / स्थिती | मुलाखतीशिवाय | मुलाखतीसह |
|---|---|---|
| सकाळी ८:०० वाजेपर्यंत प्राधान्यक्रम जनरेट | १,३४,०८२ | १,२२,३८७ |
| सकाळी ८:०० वाजेपर्यंत प्राधान्यक्रम लॉक | ६४,९७९ | ३९,३०८ |
| रात्री ११:०० वाजेपर्यंत प्राधान्यक्रम जनरेट | १,४२,५३९ | १,३२,६०० |
| रात्री ११:०० वाजेपर्यंत प्राधान्यक्रम लॉक | १,०७,२५४ | ७८,७५४ |
उमेदवारांना यापूर्वी SMS द्वारे सूचना
प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत उमेदवारांना यापूर्वीच दोन वेळा वैयक्तिकरित्या SMS द्वारे स्वतंत्र सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अद्याप आपले प्राधान्यक्रम जनरेट अथवा लॉक केलेले नाहीत, त्यांनी विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करावी.
OTP ची समस्या सोडविण्यात आली
पवित्र पोर्टलवर लॉगिन करताना किंवा प्राधान्यक्रम लॉक करताना OTP संदर्भात काही उमेदवारांना अडचणी येत होत्या. या अडचणी सोडविण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे OTP मुळे ज्यांचे लॉगिन करणे किंवा प्राधान्यक्रम लॉक करणे बाकी राहिले आहे, अशा उमेदवारांनी पुन्हा पोर्टलवर लॉगिन करून आपले प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करावेत.
Preferences Dashboard वर प्राधान्यक्रमाची स्थिती पाहता येणार
उमेदवारांनी जनरेट केलेले आणि लॉक केलेले प्राधान्यक्रम यांची सद्यस्थिती सहजपणे समजावी यासाठी पवित्र पोर्टलच्या होम पेजवर Preferences Dashboard अंतर्गत प्राधान्यक्रम स्थिती पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेच्या माध्यमातून उमेदवारांना आपल्या प्राधान्यक्रमाची सद्यस्थिती तपासता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने आपल्या लॉगिनमध्ये जाऊन प्राधान्यक्रमाची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे.
प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत १६ ऑगस्टपर्यंत वाढली
उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदविण्यापासून वंचित राहावे लागू नये आणि त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.
पूर्वीची अंतिम मुदत : १३ ऑगस्ट २०२६
नवीन अंतिम मुदत : १६ ऑगस्ट २०२६
त्यामुळे ज्या उमेदवारांचे प्राधान्यक्रम अद्याप जनरेट किंवा लॉक झालेले नाहीत, त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपली प्रक्रिया पूर्ण करावी.
उमेदवारांना महत्त्वाचे आवाहन
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी प्राधान्यक्रम लॉक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर उमेदवारांनी Preferences Dashboard वर जाऊन आपले प्राधान्यक्रम यशस्वीपणे लॉक झाले आहेत की नाही, याची खात्री करून घ्यावी. यामुळे पुढील शिक्षक पदभरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास मदत होणार आहे.
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदवून लॉक करण्याची मुदत आता १३ ऑगस्ट २०२६पर्यंत वाढविण्यात आली आहे. पोर्टलवर एकाच वेळी मोठ्या संख्येने उमेदवार लॉगिन करत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. तब्बल पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानंतर पवित्र पोर्टलवर पात्र उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, प्रक्रिया सुरू होताच पोर्टलवर मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे उमेदवारांनी सांगितले. पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदविताना काही उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार विषय आणि पदांची पसंती उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही उमेदवारांच्या बाबतीत पोर्टलवरील माहिती व्यवस्थित दिसत नसल्याचेही समोर आले आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने मुदतवाढ दिली आहे.

तसेच लाखो उमेदवारांचा पोर्टलवर मोठ्या प्रमाणात ताण आल्यामुळे OTP मिळण्यास विलंब होत असल्याची समस्या अनेक उमेदवारांना जाणवत आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम नोंदविणे आणि तो लॉक करणे या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. शिक्षण विभागाने यापूर्वी उमेदवारांना ६ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवून लॉक करण्याची संधी दिली होती. मात्र, पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि मोठ्या प्रमाणातील उमेदवारांचा सहभाग लक्षात घेऊन आता ही मुदत १३ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये शिक्षण संस्थांनी रिक्त जागांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर उमेदवारांना नोंदविल्यानंतर, प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी सहा ऑगस्टपासून मुदत देण्यात आली होती. परंतु, पहिल्याच दिवसापासून उमेदवारांना हे प्राधान्यक्रम भरण्यात अडचणी येत होत्या. लॉग इन न होणे, ओटीपी न मिळणे, ओटीपी मिळालाच तर संथ गतीने प्रक्रिया होणे, मध्येच ‘एरर’ दर्शविणे अशा अडचणींना उमेदवारांना तोंड द्यावे लागत होते. त्यातच प्राधान्यक्रम भरण्यासाठी केवळ सहा दिवसांचा अवधी मिळाल्याने बहुतांश उमेदवारांना प्राधान्यक्रम भरताना नाकीनऊ आले होते. अखेर शिक्षण विभागाने त्यांची मागणी मान्य करीत, हे प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी तेरा ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ दिलेली असली तरीही, तांत्रिक समस्या मात्र अद्याप कायम असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
सर्वाधिक समस्या ‘ओटीपी’बाबत असल्याने परीक्षा परिषदेने त्याबाबत ताताडीने कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे उमेदवारांनी सांगितले. मुदतवाढीबाबत जाहीर केलेल्या पत्रात परीक्षा परिषदेने उमेदवारांना काही सूचनाही केल्या आहेत. ‘ओटीपी’ साठी काही काळ प्रतीक्षा करावी, ‘ओटीपी’ न मिळाल्यास लगेच रीसेंडवर क्लिक करू नये, ज्या उमेदवारांना ‘ओटीपी’ मिळण्यात अडचणी येत आहेत, त्यांनी आपल्या ब्राऊजरची हिस्ट्री चेक करावी अशा सूचना परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आल्या आहेत. याबाबत परीक्षा परिषदेशी संपर्क साधला असता पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीत मुलाखतीशिवाय ७६ हजार ३९४ व मुलाखतीसह ५६ हजार २०६ उमेदवारांनी प्राधान्यक्रम दाखल केल्याचे पवित्र पोर्टलमार्फत सांगण्यात आले.
मात्र, दोन दिवसांची मुदतवाढ पुरेशी नसून तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत किमान एक आठवड्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी उमेदवारांसह विविध शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात पत्रक जारी करून पोर्टलवरील अडचणींबाबत उमेदवारांना सूचना दिल्या आहेत. विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत ७६ हजार ३९४ मुलाखतीशिवाय आणि ५६ हजार २०६ मुलाखतीसह उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट झाले आहेत. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्या तरी उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता उपलब्ध कालावधीत आपले प्राधान्यक्रम नोंदवून ते लॉक करावेत. OTP किंवा इतर तांत्रिक अडचण आल्यास शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांनुसार प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्यात बदल करण्याची संधी मिळणार आहे की नाही, याबाबत उमेदवारांनी पोर्टलवरील अधिकृत सूचनांचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेतील पुढील टप्पे वेळेत पूर्ण होण्यासाठी उमेदवारांनी आपली प्रक्रिया मुदतीपूर्वी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















