Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

परभणी पोलीस भरती तात्पुरती (Provisional) निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द | Parbhani Police Bharti Result PDF

Parbhani Police Bharti Result PDF, Parbhani Police Bharti Merit List

Parbhani Police Bharti Shipai Written Exam Result

Parbhani Police Bharti Result PDF: Written examination was conducted on 02/04/2023 at DSM College Parbhani for the vacant (75) post of Police constable in the Superintendent of Police, Parbhani establishment. The list of marks obtained by the candidates in the said written examination is being published herewith. Download Parbhani Police Bharti Written Exam Marks and Parbhani Police Selection List:

Provisional selection list and provisional waiting list have been prepared by combining the marks obtained in the physical field test and written examination conducted for the 75 vacant posts of police constables at the establishment of Superintendent of Police, Parbhani and the website of this office is www. parbhanipolice.gov.in

पोलीस भरती 2021- दिनांक 02/03/2023 रोजी घेण्यात आलेल्या परभणी घटकातील लेखी परीक्षेचा निकाल  प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

१. पोलीस अधीक्षक, परभणी यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गाच्या ७५ पदांसाठी घेण्यात आलेल्या शारीरिक मैदानी चाचणी व लेखी परिक्षा यामध्ये प्राप्त गुणांचे एकत्रीकरण करुन तात्पुरती निवडयादी (Provisional Selection list) व तात्पुरती प्रतिक्षायादी (Provisional waiting list) तयार करण्यात आली असुन या कार्यालयाचे संकेतस्थळ www.parbhanipolice.gov.in व पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे संकेतस्थळ policerecruitment2022.mahait.org व www.mahapolice.gov.in वर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरची निवडयादी व प्रतिक्षायादी ही उमेदवारांचे मुळ कागदपत्र तपासणी, सीसीटीव्ही फुटेज / व्हीडीओ रेकॉर्डींग तपासणीचे अधीन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे.
२. शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-१०९७/प्रक्र. ३१/९८/१६अ दि. १६/०३/१९९९, शासन शुध्दीपत्रक क्र. संकिर्ण १११८ / प्र. क्र ३१६ / पोल ५अ दि. १०/१२ /२०२० अन्वये तसेच वेळोवेळी झालेल्या सुधारणांनुसार तात्पुरती निवडयादी व प्रतिक्षायादी तयार करण्यात आली आहे.
३. सदर निवड यादीतील उमेदवारांची निवड ही तात्पुरत्या स्वरुपाची असेल. उमेदवारांच्या निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणुन त्यांना नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये, तात्पुरत्या निवड यादीतील निवड ही भरती निकषांच्या अधीन राहून करण्यात आली असुन त्यामध्ये अपात्र झाल्यास तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचे नाव रदद करण्यात येईल याबाबत उमेदवारांना कोणताही दावा / तक्रार / हक्क राहणार नाही. याची नोंद घ्यावी.
४. उमेदवारांची मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे सुक्ष्म पडताळणीची तारीख स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रांची सुक्ष्म पडताळणी झाल्यानंतर अंतीम निवड यादी तयार करण्यात येणार आहे.
५. प्रसिध्द करण्यात आलेली तात्पुरती निवडयादी व प्रतिक्षायादी याबाबत उमेदवारांना काही आक्षेप / हरकती असल्यास सदरचे आक्षेप / हरकती दि. १५/०४/२०२३ चे १६.०० वा. पावेतो आपले अर्ज लेखी स्वरुपात या कार्यालयाच्या ईमेल sp.parbhani@mahapolice.gov.in वर सादर कराव्यात. तक्रार/ आक्षेप असल्यास आपल्या तक्रारीमध्ये संपुर्ण नाव, आवेदन अर्ज क्रमांक, चेस्ट क्रमांक व मोबाईल नंबर कळविणे आवश्यक राहील.

परभणी जिल्हा पोलीस भरती २०२१ तात्पुरती (Provisional) निवड यादी व प्रतिक्षा यादी Download

पोलीस अधीक्षक, परभणी आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ( ७५ ) पोलीस शिपाई पदासाठी दिनांक ०२/०४/२०२३ रोजी ज्ञानोपासक महाविद्यालय (DSM College) परभणी येथे लेखी परिक्षा घेण्यात आली होती. सदर लेखी परिक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची यादी यासोबत जोडुन प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच सदरची यादी पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी पोलीस संकेतस्थळ www.parbhanipolice.gov.in आणि पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडुन संकेतस्थळ policerecruitment2022.mahait.org व www.mahapolice.gov.in वरही प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर लेखी परिक्षेमधील सर्व उमेदवार यांना खालील नमुद प्रश्नांस प्रत्येकी ०१ गुण देण्यात येत आहे.

Parbhani Police Bharti Result PDF

Download Parbhani Police Bharti Written Exam result PDF

Parbhani Police Bharti Result PDF

Parbhani Police Bharti Result PDF : Parbhani Police Physical Test has been conducted between 2nd Jan To 9th Jan 2023. In Parbhani District Police Recruitment – 2021 for (75) Police constable posts field test has been conducted for the candidates and passed with more than 50 percent marks in the said field test will be called for a written Test. Parbhani Police List of candidates selected for Written Test has been Published. Check Your names in given pdf category wise.

दिनांक 02/01/2023 ते 09/01/2023 या दरम्यान परभणी जिल्हा पोलीस भरती – 2021 मधील (75) पोलीस शिपाई पदांच्या भरती प्रक्रीयेमध्ये उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आलेली असुन सदर मैदानी चाचणीमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त गुण घेवुन पास झालेले परंतु लेखी परिक्षेकरीता 1:10 याप्रमाणे पात्र असलेले (1025) उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

सदरील प्रवर्गनिहाय यादी ही लेखी चाचणीस पात्र असलेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी असुन सदर यादीमध्ये काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी दिनांक 20/01/2023 रोजी पावेतो पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथील स्वागतकक्ष येथे लेखी स्वरुपात अर्ज सादर करावेत. दि. 20/01/2023 नंतर येणारे अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.

पोलीस भरती भरती प्रक्रीयेच्या लेखी परिक्षेची तारीख वरीष्ठ संकेतस्थळ (parbhanipolice.gov.in) व पोलीस मुख्यालय परभणी कार्यालयाकडुन प्राप्त होताच स्थानीक वर्तमानपत्र, परभणी जिल्हा पोलीस येथील सुचना फलकावर माहिती देवुन कळविण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

List of candidates selected for Parbhani Police Written Test


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड