जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता हा मेळावा सह्याद्री शिक्षण संस्था, सह्याद्री तंत्रनिकेतन, सावर्डे, ता. चिपळूण येथे होणार आहे.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी www.mahaswayam.gov.in पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. आधीच नोंदणी केलेल्या उमेदवारांनी त्यांचे प्रोफाइल अद्ययावत करणे आवश्यक आहे.
नोंदणी केलेले उमेदवार १२ मार्च रोजीच्या मेळाव्यासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकतात. त्यानंतर मुलाखतीसाठी बायोडाटा आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असेही सांगण्यात आले आहे.
रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी अद्याप नोंदणी न केलेल्या उमेदवारांनी त्वरित कौशल्य विकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन उमेदवारांनी उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती शेख यांनी केले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















