Palghar Nagar Parishad Bharti 2026
Palghar Nagar Parishad Bharti 2026: Palghar Nagar Parishad is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. The name of the posts is “lawyer”. There are 26 vacant posts available to fill. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date to apply is 05th of March 2026. For more details about Palghar Nagar Parishad Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
पालघर नगर परिषद अंतर्गत “वकील” पदाची 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पालघर नगर परिषद भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पालघर नगर परिषद भरती 2026
- पदाचे नाव – वकील
- पदसंख्या – 26 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पालघर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – पालघर नगरपरिषद अग्निशमन केंद्र बोईसर रोड, पालघर, ता. जि. पालघर पिन कोड ४०१४०४
- मुलाखतीची तारीख – 05 मार्च 2026
- अधिकृत वेबसाईट – palghar.gov.in
Palghar Nagar Parishad Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| वकील | 26 |
How To Apply For Palghar Nagar Parishad Recruitment 2026
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 05 मार्च 2026 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For palghar.gov.in Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/cewBQ |
| ✅ अधिकृत वेबसाईट | palghar.gov.in |
Palghar Nagar Parishad Bharti 2026
एकीकडे मोखाडा तालुक्यात बालमृत्यु आणि मातामृत्यूचे दृष्टचक्र सुरू असताना हे आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. तसेच विविध पॅटर्न राबवणे आवश्यक असताना, दुसरीकडे मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील मंजूर 7 तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्वच्या सर्व पद रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ दोन कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व एक कायम वैद्यकीय अधीक्षकाला संपूर्ण ग्रामीण रुग्णालय आणि तालुक्यातील नागरीकांच्या आरोग्याची धुरा सांभाळावी लागत आहे.
आदिवासी दुर्गम भागात कोणीही डॉक्टर येण्यास तयार होत नाही. कारण काही महिन्यापूर्वी येथील कायमस्वरूपी असलेल्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा बदल्या केल्या गेल्या त्या बदल्यात डॉक्टर का देण्यात आले नाही? जर बदली डॉक्टर नाही मग या डॉक्टरांना कोणत्या नियमात सोडण्यात आले असा सवाल उपस्थित होत आहे. मोखाडा तालुक्यात नुकतेच एक बालमृत्यूचे प्रकरण घडल्यानंतर, माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या. या बातम्या कशा खोट्या आहेत, याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्य चिकित्सकांनी, तात्काळ पालघर येथे पत्रकार परिषद घेऊन सरकारी उत्तरे देऊन आणि कागदी घोडे नाचवून स्वतःची बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मग आता शल्य चिकित्सक यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील अवस्था आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदाबाबत एक पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यावी असे आवाहन येथील सर्व सामान्य नागरिक करीत आहेत.
सध्या मोखाडा ग्रामीण रुग्णालय कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने करार पद्धतीने शिकाऊ डॉक्टरांच्या भरवशावर काम चालवले जात आहे. एवढेच काय प्रसूती विभाग हा केवळ नर्सच्या कौशल्याने चालवला जात आहे. यामुळे रात्रीच्या वेळी काही जिकिरीची परिस्थिती निर्माण झाली तर मार्गदर्शन नेमके कोणाचे घ्यायचे हा सवाल उभा राहतो. कुवर कुटुंबियांनी आपले बाळ गमावल्यानंतर त्याच आठवडयात मोखाड्यात अजून दोन बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे.
मोखाडा तालुक्यात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र 16 उपकेंद्र आणि भरारी पथके अशी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागात काम करते. मात्र याठिकाणी प्राथमिक उपचार होण्याइतकीच व्यवस्था असल्याने, जवळपास 70 टक्के रुग्णांना मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. याशिवाय गंभीर रूग्ण व महीलांना प्रसूतीसाठी मोखाडा, जव्हार आणि नाशिक असा 100 किमीचा प्रवास करावा लागत असल्याच्या अनेक घटना ताज्या आहेत. असे असताना संपूर्ण तालुक्याची आरोग्य वाहिनी असलेल्या मोखाडा ग्रामीण रुग्णालयात प्रचंड रुग्णांचा भार आहे.
तालुक्यात एका महिन्यात तब्बल 70 च्या आसपास माता प्रसूती होत असतात. याशिवाय साथीचे रोग, जिकिरीचे व वातावरणातील बदलाचे रुग्ण दररोज शेकडोंच्या संख्येने ग्रामीण रुग्णालयात ऊपचारासाठी येतात. त्यामुळे येथे कायमस्वरूपी बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, स्रीरोग तज्ज्ञ अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रचंड गरज आहे.
मात्र दुर्गम भाग, राहण्याची सोय नाही, कुटुंबांची सोय नाही, अशी कारणे देऊन नियुक्त वैद्यकीय अधिकारी याभागात येण्याचे टाळतात. तसेच जे आहेत ते रुजू झाल्यापासून बदलीच्या प्रयत्नात असतात. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्यात आली असून स्त्रीरोगतज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, फिजीशिअन आणि एक वैद्यकीय अधिकारी अशी पदे रिक्त असल्याची माहीती वैद्यकीय अधिक्षक डाॅ. भरतकुमार महाले यांनी दिली आहे.
महत्त्वाची सर्वच वैद्यकीय अधिकार्याची पदे रिक्त असल्याने, सध्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर या रुग्णालयाचा भार आहे. याठिकाणी आरोग्य राज्यमंत्री यांचा दौरा झाला अनेक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दौरे होत असतात. मात्र एवढी गंभीर बाब असताना याकडे कोणाचेच कसे लक्ष नाही ? हा खरा कळीचा मुद्दा आहे. यामुळे भागातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्य रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक असताना चक्क एका रुग्णालयातील 7 वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त ठेवण्याच्या शासनाच्या या कृतीचा सर्व सामान्यांमधून निषेध व्यक्त होत आहे.
Previous Post –
Administrative affairs in Palghar Municipal Council (Palghar Nagar Parishad) have been disrupted due to insufficient staff. Tensions have risen as in-service staff have been given responsibility for additional vacancies in addition to the tasks assigned to them. As a result, its blow is falling on the citizens. More than fifty per cent posts are vacant in the establishments of various departments of the Municipal Council.
पालघर नगर परिषदेत अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे प्रशासकीय कारभार विस्कळीत झाला आहे. सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर त्यांना नेमून दिलेल्या कामांसह अतिरिक्त इतर रिक्त पदांच्या कामांची जबाबदारीही देण्यात आल्याने ताण वाढला आहे. परिणामी त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. नगर परिषदेच्या विविध विभागांच्या आस्थापनांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत.
पालघर नगर परिषदेची लोकसंख्या कमी असली तरी प्रशासकीय कामाचा पसारा मोठा आहे. नगर परिषदेमध्ये आरोग्य, नियोजन, लेखा व वित्त, करनिर्धारण, घरपट्टी, बांधकाम, अग्निशमन दल, सामान्य प्रशासन, नगररचना, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण, सांस्कृतिक कार्य तसेच प्रशासकीय योजनांची अंमलबजावणी करणारे विभाग आहेत. या विभागांचे प्रशासकीय प्रमुख यांच्याकडे इतर विभागांच्या रिक्त असलेल्या पदांचा कार्यभार सोपवला जात आहे. माहिती अधिकारांचे अर्ज, नगरसेवक आणि नागरिकांच्या तक्रारीचे निरसन व प्रशासकीय कारभार पाहताना कर्मचाऱ्यांची दमछाक होते. काही कर्मचारी वर्ग सोडला तर संपूर्ण नगर परिषदेचा कारभार कंत्राटी पद्धतीने आहे. सद्य:स्थितीत आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्यावर बांधकाम, अतिक्रमण, वृक्ष प्राधिकरण, व्यावसायिक ना-हरकत दाखले आदी जबाबदाऱ्या आहेत. नऊ जणांची जबाबदारी असल्यामुळे घरपट्टी वसुली होत नाही. त्यामुळे प्रशासकीय उत्पन्नावर परिणाम होत आहे. बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचा कारभार एकाच अभियंत्याच्या खांद्यावर आहे.
वर्ग ३ व ४ मधील ५२ पदे रिक्त
नगर परिषदेत अनेक पदे मंजूर आहेत, परंतु ती भरली गेली नाहीत. त्यात स्वच्छता निरीक्षक दोन आरोग्य अधिकारी एक, आरोग्य सहायक तीन, तारतंत्री एक, वरिष्ठ लिपिक चार, वाहनचालक दोन, गाळणी चालक व प्रयोगशाळा साहाय्यक सहा, उद्यान पर्यवेक्षक एक, ग्रंथपाल एक साहाय्यक ग्रंथपाल दोन, मुकादम तीन, तर फायरमॅनच्या चार पदांचा समावेश आहे. तर सफाई कामगारांची तीसपैकी २५ पदे, व्हॉल्वमन १७ पैकी ८, लिपिक टंकलेखक संवर्गातील १३ पैकी आठ, ऑपरेटर दोनपैकी एक, शिपाई आठपैकी पाच पदे भरलेली आहेत. वर्ग-३ संवर्गातील ३७ पदांपैकी नऊ, वर्ग चार मधील ६२पैकी ३८ पदे भरलेली आहेत.
अधिकारी पदाची २६ पैकी ७ पदे रिक्त
नगर परिषदेत अभियांत्रिकी सेवा प्रकारातील स्थापत्य विभाग पाचपैकी एक पद भरलेले आहे. याचअंतर्गत संगणक विभागाकरिता एक, मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी लेखा एक, तसेच अग्निशमन विभागातील पदे रिक्त आहेत. नगर रचनाकार आणि विकास सेवा प्रकारांमध्ये नगर परिषदेत तीनपैकी दोन पदे भरलेली आहेत. तर वित्त लेखापाल व लेखा परीक्षक विभाग तीनपैकी दोन, करनिर्धारण व प्रशासकीय सेवा नऊपैकी आतापर्यंत एकच पद भरलेले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















