डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत स्थापन झालेल्या श्रीलक्ष्मी महिला सेंद्रिय गटाला आत्मा प्रकल्प संचालक अशोक किरनळी यांनी भेट दिली. महिलांना सेंद्रिय शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

महिलांसाठी जैविक खत युनिट
सेंद्रिय शेती गटासाठी बी.ए.आर.सी. अंतर्गत एक लाख रुपये किमतीचे जैविक खत युनिट देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यास मदत होणार आहे. पंजाबराव देशमुख शेती अभियानाअंतर्गत महिला गटांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांसोबत चर्चा व मार्गदर्शन
यावेळी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीच्या अनुभवांविषयी माहिती दिली. किरनळी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या पिकांची पाहणी केली. इनोव्हा बायोटेक कंपनीच्या कंपोस्ट कल्चरद्वारे ऊस पिकातील पाचट व्यवस्थापन यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी अधिकाऱ्यांची उपस्थिती
या दौऱ्यात पुणे जिल्ह्याचे आत्मा प्रकल्प संचालक सूरज मडके, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, मंडल कृषी अधिकारी शिवकांत कोल्हे यांच्यासह अनेक कृषी तज्ज्ञ आणि अधिकारी उपस्थित होते. शेतकरी प्रतिनिधींनीही सेंद्रिय शेतीच्या फायद्यांवर चर्चा केली.
शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
श्रीलक्ष्मी महिला सेंद्रिय बचत गटाच्या सदस्या सारिका चिंचवडे, ऊस उत्पादक शेतकरी विकास हरिभाऊ चव्हाण, प्रयोगशील शेतकरी उत्तम जाधव, बाबाजी बांगर यांनी सेंद्रिय शेतीच्या महत्त्वावर आपले मत मांडले. महिला गटांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















