खुशखबर! वर्क फ्रॉम होम ची संधी!-OPPO मध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया! – OPPO Green Internships Program Apply Now
OPPO Green Internships Program Apply Now
OPPO Green Internships Program Apply Now – मित्रांनो, जर आपल्याला वर्क फ्रॉम होम हवं असेल आणि सोबतच अनुभव सुद्धा हवा असेल, तर हि आपल्यासाठी एक मस्त संधी आहे. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE) हिनं OPPO इंडिया आणि 1M1B (वन मिलियन फॉर वन बिलियन) या संस्थांबरोबर मिळून एक नविन इंटर्नशिप योजना सुरू केलीय, ज्याचं नाव आहे “जनरेशन ग्रीन”. ही योजना देशभरातील विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि सस्टेनेबिलिटी विषयी जागरूकतेसाठी काम करण्याची संधी देते. चला तर जाणून घेऊया या साठी अर्ज प्रक्रिया कशी आहे, आणि अन्य माहिती!
तर मित्रांनो, हा एक पार्टटाइम इंटर्नशिप प्रोग्रॅम आहे, ज्यात आपण घरून सुद्धा काम करू शकता. ही इंटर्नशिप दोन महिन्यांची असून पूर्णपणे अर्धवेळ आणि ऑनलाईन आहे. घरबसल्या करता येणारी ही संधी आहे आणि त्यासाठी ५००० जागा उपलब्ध आहेत. इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना AICTE, OPPO आणि 1M1B कडून संयुक्त प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात तात्काळ होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्यांना आपापल्या गावांमध्ये, शाळा किंवा कॉलेजांमध्ये टिकाऊ जीवनशैली, पर्यावरण रक्षण याबाबत जनजागृती करावी लागेल. विद्यार्थ्यांना ऑनलाईन ओरिएंटेशन दिलं जाईल आणि एक डिजिटल टूलकिट मिळेल, ज्यामध्ये आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे असतील.
पात्रता ही अगदी साधी आहे – कोणतंही शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, जे दोन महिन्यांसाठी अर्धवेळ काम करू शकतील आणि ज्यांना पर्यावरण रक्षणात योगदान द्यायचं आहे, ते अर्ज करू शकतात.
निवड ही प्रकल्प-आधारित कार्यांवर आधारित असेल. विद्यार्थ्यांनी स्थानिक पातळीवर जागरूकता कार्यक्रम, चर्चासत्रं, आणि हरित सवयी प्रोत्साहन देणारी उपक्रमं राबवावी लागतील.
या योजनेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खास सन्मानही दिला जाणार आहे. टॉप १०० विद्यार्थ्यांना स्टायपेंड किंवा पुरस्कार मिळेल आणि त्यांना OPPO इंडियाच्या फॅक्टरीला भेट देण्याची संधी मिळेल. तसेच टॉप ५०० विद्यार्थ्यांना ओप्पोचं मर्चेंडाईज आणि डिजिटल सन्मान दिला जाईल. विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी AICTE च्या इंटर्नशिप पोर्टलवर जाऊन अर्ज भरावा लागेल. कुठलंच शुल्क नाही. ही एक विनामूल्य आणि मौल्यवान संधी आहे.