Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुक्त विद्यापीठाच्या मे मधील परीक्षा स्थगित

Open University Postponed The May Exam

मुक्त विद्यापीठाच्या ‘मे’मधील परीक्षा स्थगित…अभ्यासासाठी ‘या’ संकेतस्थळाचा होणार फायदा!

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे मेमध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक राज्य सरकारच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे. दरम्यान, “लॉकडाउन’मध्ये विद्यापीठाच्या राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांना संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध शिक्षणक्रमांचे ई-बुक्‍स तथा “यशोवाणी’ या वेब रेडिओवर प्रसारित होणाऱ्या विविध शिक्षणक्रमांच्या कार्यक्रमांद्वारे घरबसल्या अभ्यास करता येणार आहे.

विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या सहाय्याने अभ्यास

विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील 97 शिक्षणक्रमांसाठी यंदा राज्यातील सव्वासहा लाखांहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट आहेत. दूरस्थ शिक्षणपद्धतीने राज्यातील एक हजार 937 अभ्यास केंद्रांद्वारे या विद्यार्थ्यांच्या अध्ययन व शैक्षणिक समुपदेशनाचे कार्य सुरू असते. नोकरी, व्यवसाय सांभाळून विद्यार्थी शनिवार, रविवारच्या सत्रास उपस्थित राहून अध्ययन करतात. सध्या “लॉकडाउन’च्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना घरून अभ्यासाची सूचना केली आहे. विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in या संकेतस्थळावर अध्ययन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात विविध विद्याशाखांची पाठ्यपुस्तके व पूरक अध्ययन साहित्य मोफत वाचता येते. विद्यार्थ्यांनी घरी राहून विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या सहाय्याने अभ्यास करायचा आहे. तसेच जीवन, स्वयंअध्ययन कौशल्ये, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, सामाजिकशास्त्र यांसह विविध शिक्षणक्रमांची ऑनलाइन सत्रे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन “यशोवाणी’ या वेब रेडिओवरून ऐकता येणार आहेत. वेब रेडिओचे कामकाज व्यवस्थित चालावे, यासाठी दृकश्राव्य विभागाचे अधिकारी घरून काम करीत आहेत.

परीक्षांचे वेळापत्रक होईल जाहीर 

राज्यातील सहा लाख 24 हजार 250 विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या एकूण 152 विविध शिक्षणक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे. त्यात नवीन प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या पाच लाख 70 हजार व 54 हजार 260 विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी आहेत, अशी माहिती प्रभारी परीक्षा नियंत्रक रवींद्र ठाकरे यांनी दिली. इतर पारंपरिक विद्यापीठांच्या परीक्षांनंतर मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा होतात. त्यामुळे इतर पारंपरिक विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर मुक्त विद्यापीठाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज 

“लॉकडाउन’च्या पार्शभूमीवर मुक्त विद्यापीठाच्या बैठकींचे कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या दृकश्राव्य कक्षाचे अधिकारी अभय कुलकर्णी व तंत्रज्ञांनी सहकार्य केले. 31 मार्चला विद्यापीठाच्या वित्त समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. नवीन आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक काही सूचनांसह मंजूर करण्यात आले. विद्यापीठाचे वित्त विभागाचे अधिकारी मगन पाटील यांनी ही माहिती दिली. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्सला डॉ. संजय खडदकर, डॉ. विनायक गोविलकर, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, श्री. पाटील आदी उपस्थित होते.

सोर्स : सकाळ


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड