महत्त्वाचे – PG साठी नवी प्रवेश परीक्षा!!
One-Year LLM Course Updates
एक वर्षाचा LLM अभ्यासक्रम होणार बंद; PG साठी नवी प्रवेश परीक्षा
One-Year LLM Course Updates:बार काउन्सिल ऑफ इंडियाने (Bar Council of India एक वर्ष कालावधीचा मास्टर डिग्री प्रोग्राम (One year LLM Course) कोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम रद्द करण्यात येईल. कोणत्याही विधी विद्यापीठाला हा अभ्यासक्रम चालवण्याची मुभा नसेल.
हा अभ्यासक्रम २०१३ रोजी सुरू करण्यात आला होता. यापुढे एलएलएम पदवी ही दोन वर्षांचा चार सत्रांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच बहाल करण्यात येईल. बार काउन्सिलने पदव्युत्तर विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नव्या प्रवेश परीक्षेचा प्रस्ताव (New Entrance Test for law pg) ठेवला आहे. पोस्ट ग्रॅज्युएट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट इन लॉ (PGCETL) असे या परीक्षेचे नाव असेल. बार काउन्सिल ऑफ इंडिया लीगल एज्युकेशन (पोस्ट ग्रेजुएट, डॉक्टोरल, एक्झिक्युटिव, वोकेशनल, क्लिनिकल अँड अदर कंटीन्यूइंग एज्युकेशन) नियम २०२० या २ जानेवारी रोजी सूचित करण्यात आले. त्यानुसार हे बदल करण्याचे प्रस्तावित आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नवे नियम कोणते? – One-Year LLM Course Updates
- – विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे २०१३ मध्ये सुरू केलेला एक वर्ष कालावधीचा लॉ मास्टर डिग्री प्रोग्राम या चालू वर्षाच्या शैक्षणिक सत्रापर्यंतच कार्यरत आणि मान्य असेल.
- – नवा पोस्ट ग्रॅज्युएट लॉ मधील मास्टर डिग्री एलएलएम अभ्यासक्रम चार सेमिस्टरचा, दोन वर्षे कालावधीचा असेल.
- – बार काउन्सिल ऑफ इंडिया दरवर्षी सर्व विद्यापीठांमध्ये लॉमधील मास्टर डिग्री कोर्सच्या प्रवेशासाठी पीजीसीईटीएल आयोजित करू शकते. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसारच विद्यार्थ्यांचे प्रवेश करणे बंधनकारक आहे.
- – कोणतेही विद्यापीठ कोणाही व्यक्तीला कोणत्याही विषयात किंवा क्षेत्रात पदवीची डिग्री (LLM) प्रदान करणार नाही.
- – BA. LL.B. किंवा BBA.LL.B किंवा B.Sc. LL.B. या सर्व पदवी किमान पाच वर्षांच्या कालावधीच्या शिक्षणानंतरच देण्यात येईल.
-
– परदेशी विद्यापीठातून समकक्ष एलएलबीशिवाय मिळवलेली एलएलएम पदवी, भारतीय एलएलएम डिग्रीशी समकक्ष असणार नाही.
सोर्स : म. टा.
Table of Contents