NMMS शिष्यवृत्ती परीक्षेस मुदतवाढ!!

NMMS Scholarship Exam 2022

NMMS Scholarship Exam 2022

NMMS Scholarship Exam 2022: The National Economically Weak Students (NMMS) Scholarship Examination for Class VIII students has been extended. Now students can apply till Sunday (1st). Further details are as follows:-

NMMS Exam Extension Eighth

इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठीच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना रविवार (ता.१) पर्यंत अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

 • राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.
 • ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे.
 • अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती गुणवत्तेच्या आधारे वितरित करण्यात येते.
 • विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी घेतल्यानंतर ही निवड घोषित करण्यात येते.
 • मराठी, हिंदी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड आणि तेलगू या माध्यमांतून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल.
 • परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंत एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळते.

NMMS Scholarship Exam Important Dates 

 • – ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत : १ मे
 • – विलंबासहीत : ६ मे
 • – परीक्षा : १९ जून

NMMS Scholarship Exam 2022

NMMS Scholarship Exam 2022: The State Examination Council has announced the schedule of Scholarship Scheme for National Economically Weaker Students. The examination will be held on June 19 as per the schedule. From 2007-08 onwards, financial assistance is provided to the intelligent students at the end of class VIII with a view to get the best education. Further details are as follows:-

राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रकानुसार १९ जून रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. २००७-०८ पासून इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येते.

त्यासाठीअर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवार ६ एप्रिलपासून सुरू झाली. २६ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. परीक्षा १९ जून रोजी होणार आहे. करोनामुळे एनएमएमएस विविध परीक्षांचे वेळापत्रक लांबले. इयत्ता आठवीसाठी २०२१-२२ एनएमएमएस परीक्षेचे वेळापत्रक कधी येते याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते.

 • राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे वेळापत्रक जाहीर केले.
 • वेळापत्रकानुसार १९ जून रोजी परीक्षा घेतली जाणार आहे.
 • २००७-०८पासून इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येते.
 • ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते.
 • त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 • www.mscepune.in आणि https://nmmsmsce.in या वेबसाईटवर शाळांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
 • नियमित शुल्कासह २६ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
 • विलंब शुल्कासह २७ एप्रिल ते १ मेपर्यंत तर अतिविलंब शुल्कानुसार २ ते ६ मेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

The parent of the student will have to submit the proof of income for the financial year 2020-21 to the headmaster of the school. The student should have passed with minimum 55% marks in 7th standard. Non-subsidized, Kendriya Vidyalaya, Jawahar Navodaya Vidyalaya, government hostel concessions, students availing educational facilities, students studying in military schools are ineligible for the examination. Students are selected on the basis of their marks in the written test and on the basis of reservation for backward classes fixed by the state. Eligible students are given a scholarship of Rs. 12,000 per annum.


NMMS Scholarship Exam 2022

NMMS Scholarship Exam 2022 : The dates for the National Economic Weakness Scholarship (NMMS) examination for the year 2021-22 have been announced. A student who has passed with a minimum of 55% marks in the 7th general category and a minimum of 50% marks in the reserved category is eligible for this examination. Further details are as follows:-

NMMS Scholarship Exam Time Table

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेचे २०२१-२२ या वर्षातील तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. चालू वर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा १० एप्रिलला होणार असून, १९ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोणत्याही शासकीय अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेत आठवीत शिकत असलेल्या व पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी पाहिजे, तसेच सातवीत सर्वसाधारण संवर्गासाठी किमान ५५ टक्के उत्तीर्ण व आरक्षित संवर्गासाठी किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या परीक्षेस पात्र असतो.

 • या परीक्षेसाठी १९ जानेवारीपासून https://www.mscepune.in किंवा https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
 • परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १९ जानेवारी ते १९ फेब्रुवारीपर्यंत असून, ऑनलाइन विलंब अर्ज दाखल करण्याची मुदत २० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत आहे.
 • या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.
 • या परीक्षेसाठी बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी असे दोन पेपर असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

NMMS Scholarship Merit List

NMMS Scholarship Exam 2021 : The list of meritorious students can be seen on the website of Maharashtra State Examination Council in Pune. Eighth class students were tested for this. The selection list of students who are eligible for the scholarship is available on the website of the Examination Council from 18th August. Further details are as follows:-

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात NMMS स्कॉलरशिपची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतल्या विद्यार्थ्यांची इयत्ता आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा 6 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आली होती. पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर गुणवंत विद्यार्थ्यांची यादी पाहता येईल. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची यासाठी परीक्षा झाली होती. शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी 18 ऑगस्टपासून परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर इथे (http://www.mscepune.in/) उपलब्ध आहे. या लिंकवर (nmms.mscescholarshipexam.in)  इथेही क्लिक केलंत तर तुमच्या पाल्याचं नाव आहे का हे दिसेल.

राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांचं पुढील शिक्षण धोक्यात; श्रेणी सुधार परीक्षा नाही 6 एप्रिल रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या केंद्रीय शिष्यवृत्तीमध्ये महाराष्ट्रासाठी 11682 एवढा कोटा आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या 11682 विद्यार्थ्यांना दरवर्षी या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळू शकते. ZP च्या शिक्षकाला राष्ट्रपती पुरस्कार; अतिदुर्गम भागात देतात शिक्षणाचे धडे महाराष्ट्र राज्याच्या आरक्षण धोरणानुसार संबंधित विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.

अपंगांसाठी 4 टक्के आरक्षण यात राज्य सरकारने ठेवलं आहे. प्रत्येक जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आला आहे. या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची यादी www.mscepune.in www.nmms.mscescolarshipexam.in या दोन अधिकृत संकेस्थळांवर जाहीर करण्यात आली आहे. शाळांनी ही यादी याच संकेतस्थळांवरून डाउनलोड करून संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वितरण करावं अशी सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी केली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची सोय आहे.


NMMS Scholarship Exam 2021 : Admit card for National Instrument-cum-Quality Scholarship Scheme (NMMSS) examination under Maharashtra State Examination Council has been announced. The exam date is April 6th, 2021.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत राष्ट्रीय साधन-कम-गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना (NMMSS) परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर आकरण्यात आलेले आहे. परीक्षेची तारीख 6 एप्रिल 2021 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 • परीक्षेचे नावराष्ट्रीय साधन-कम-गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना (NMMSS) परीक्षा 2021
 • परीक्षेची तारीख6 एप्रिल 2021

NMMS Scholarship Exam 2021

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3fIXzAf


NMMS Scholarship Exam 2021: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCE) आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना नियमित अर्ज ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत, तर विलंब अर्ज ऑनलाइन पद्धतीने ९ ते १६ डिसेंबर आणि अतिविलंब अर्ज ऑनलाइन पद्धतीने १७ ते २३ डिसेंबरपर्यंत भरता येणार असल्याचे परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

NMMS Scholarship Exam 2021 : आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी संबंधित योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाते. परीक्षेसाठी इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला अर्ज करता येतो. शाळेमार्फत अर्ज करण्याची प्रक्रिया www.mscepune.in आणि http://nmms.mscescholarshipexam.in या वेबसाइटवर करता येणार आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र ठरतात. शिष्यवृत्तीसाठी निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येते. राज्यात १४ मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी अशा दोन विषयांचा यात समावेश असतो. पहिल्या पेपरमध्ये मानसशास्त्रीय चाचणीमध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन आदी संकल्पनांवर, तर दुसरा पेपर हा अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, इतिहास यांचा समावेश आहे.

प्रत्येक पेपर हा ९० गुणांचा असून, यात पात्रता गुण ४० टक्के मिळणे आवश्यक आहे. एससी, एसटी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३२ टक्के असा निकष आहे. संबंधित परीक्षेचा निकाल पुढील वर्षी मे महिन्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे परिषदेमार्फत सांगण्यात आले.

सोर्स : म. टा.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड