नवी मुंबई महानगरपालिका भरती निकाल, उत्तरतालिका बद्दल नवीन अपडेट – NMMC Exam Results
NMMC Exam Result 2025 - NMMC Exam Answer Key 2025
NMMC Exam Results – On the fourth day of the Navi Mumbai Municipal Corporation Direct Service Recruitment 2025 examination, 13,128 candidates took the online examination at 28 examination centers in 12 districts on Saturday. A total of 68,149 candidates took the online examination during the 4 days of the examination from July 16 to 19. The examination has been planned through Tata Consultancy Services (TCS) at 28 centers in 12 districts for 668 posts in 30 cadres in Group – C and Group – D. The Result of this examination will publish soon. The Candidates are waiting for the Merit List, Selection List & Result of NMMC Exam Result. So Dont worry very soon this result will be out.
NMMC Exam Answer Key 2025 – NMMC Exam Answer Key 2025 PDF will be avilable soon in canidates login. This will be published by TISCON TCS. Just wait few more days we will update the details on MahaBharti.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती २०२५ परीक्षेच्या चौथ्या दिवशी शनिवारी १२ जिल्हयांमधील २८ परीक्षा केंद्रांवर १३१२८ उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली. १६ ते १९ जुलै या परीक्षेच्या ४ दिवसात एकूण ६८१४९ उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली. गट – क आणि गट – ड मधील ३० संवर्गातील ६६८ पदांकरिता १२ जिल्ह्यांमध्ये २८ केंद्रांवर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (टीसीएस) यांच्या माध्यमातून परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षा प्रक्रियेवर निरीक्षण व नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. मार्गदर्शनाखाली, कैलास शिंदे यांच्या पालिकेच्या वर्ग १ श्रेणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘समन्वय अधिकारी’ म्हणून तसेच २९ अधिकाऱ्यांची ‘केंद्र निरीक्षक’ म्हणून नियुक्ती केली होती. अशाप्रकारे नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी २१५१५ उमेदवारांनी, दुसऱ्या दिवशी १८४४२ उमेदवारांनी, तिसऱ्या दिवशी १५०६४ उमेदवारांनी व चौथ्या दिवशी १३१२८ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. अशाप्रकारे चार दिवसांत ६८१४९ उमेदवारांनी २८ केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे. चार दिवसांची ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सुव्यवस्थित रितीने पार पडली आहे. आता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना वाट आहे ती निकालाची. लवकरच या परीक्षेची उत्तरतालिका उपलब्ध होणार आहे. TCS तर्फे उमेदवारांच्या लॉगिन मध्ये त्या उपलब्ध होतील. तसेच, महत्वाचे म्हणजे या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. निश्चितच हि उमेवारांसाठी एक आनंदाची बाब आहे.
अधिकृत वेबसाईट लिंक
नवीन मुंबई महानगरपालिकेच्या ६६८ पदांसाठी ८४ हजार ७७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली आहे. (NMMC Exam Result) या परीक्षा राज्यातील विविध जिल्ह्यात घेतल्या आहेत. हि परीक्षा निर्विघ्न, सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात, यादृष्टीने परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला होता. यासंदर्भात त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून प्रत्येक केंद्रांवर पोलिस बंदोबस्त देण्याची विनंती केली होती. तरी भरती प्रक्रियेदरम्यान काही समाजकंटक उमेदवारांना खोटी आश्वासने देऊन आर्थिक फसवणूक करण्याचा धोका संभवतो. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार लेखी परीक्षा पारदर्शक, शांततेत पार पडावी, यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त उपलब्ध केला होता.