JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

खुशखबर! महाराष्ट्रातील १४ हजार ७८७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार सरळ सरकारी नोकरीची संधी! | NHM Maharashtra Bharti 2026 | NHM Maharashtra Recruitment 2026

NHM Maharashtra Bharti 2026 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आणि तांत्रिक खंड वगळून दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या १४ हजार ७८७ पात्र कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने एकवेळची विशेष बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. या पदांवर पात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी वार्षिक ९८३.८० कोटी रुपये खर्चालाही शासनाने मंजुरी दिली आहे. “राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १४ हजार ७८७ अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून, राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख होण्यास मदत होईल.” असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

NHM Maharashtra Bharti 2026 

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य, ग्रामविकास आणि अन्य विभागांतील समकक्ष नियमित मंजूर पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार वेतनश्रेणी देण्यात येईल. यामध्ये अपेक्षित वेतनासाठी ९७८.८० कोटी रुपये आणि प्रवास भत्त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कर्मचाऱ्यांचे सध्या मिळणारे मूळ वेतन संरक्षित राहील. त्यांना महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता लागू राहील. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या योजनेंतर्गत सध्या देय असलेल्या रजाही अनुज्ञेय असतील. मात्र, या अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना तसेच सेवानिवृत्ती अथवा कुटुंब निवृत्तीवेतन योजनेचा लाभ मिळणार नाही.

ही अधिसंख्य पदे व्यक्तिसापेक्ष असतील. संबंधित कर्मचारी कार्यरत असेपर्यंतच ती अस्तित्वात राहतील. कमाल वयोमर्यादा, राजीनामा, आजारपण, मृत्यू अथवा अन्य कारणामुळे पद रिक्त झाल्यास ते व्यपगत होईल आणि त्यावर नव्याने नियुक्ती केली जाणार नाही. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीही अनुज्ञेय राहणार नाही. शासनाने या पदनिर्मितीला अपवादात्मक परिस्थितीत एकवेळची विशेष बाब म्हणून मान्यता दिली असून, अन्य विभागांतील कोणत्याही योजना किंवा प्रयोजनासाठी याचा पूर्वोदाहरण म्हणून वापर करता येणार नाही.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 National Health Mission Recruitment Vacancy Details

National Health Mission Maharashtra Recruitment Vacancy Details

1. State Level Posts106 Posts
2. District Level Posts27 Posts
3. National Urban Health Mission Posts06 Posts
4. National Ayush Mission Posts52 Posts
5. Maharashtra Medical Goods Procurement Authority Posts149 Post

Educational Qualification For NHM Maharashtra Recruitment 

Education qualifications & Eligibility criteria details are given in following table. Just go through all details and apply from the Application Form link given below. Also we request you to go through the Official PDF advertisement published by the NHM Health department of Maharashtra where your will find all respective details about each post.

How To Apply For Maharashtra National Health Mission Recruitment

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवार https://nhmrecruitment.maha-arogya.com/ या लिंक वरून अर्ज करू शकतात.
  • देय तारखेला प्राप्त झालेले अपूर्ण/चुकीचे ऑनलाइन अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

महत्वाचे फॉर्म – Important Forms For Maha NHM Online Application 

1) महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम 2005 च्या अधिसूचनेनुसार (Maharashtra Civil Services (Small Family Declaration) Rules 2005 Notification)

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड