NHM Gadchiroli Bharti Result
NHM Gadchiroli Bharti Result: आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत भामरागड व एटापल्ली येथे मलेरिया मोबाईल युनिटसाठी सीएसआर निधीतून सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. प्राप्त आक्षेपांचा विचार करून अंतिम पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, गुणांकनाच्या आधारे अंतिम निवड व प्रतीक्षा यादीही तयार करण्यात आली आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी
NHM Gadchiroli Bharti Result
NHM Gadchiroli Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तसेच १५ व्या वित्त आयोगांतर्गत विविध कार्यक्रमामध्ये २४ संवर्गातील रिक्त असलेली १७२ पदे भरण्यासाठी भरतीप्रक्रिया सुरु असून प्रसिद्ध जाहिरातीनूसार अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी दिनांक ०३/०२/२०२६ ते १३/०२/२०२६ या कालावधीत करण्यात आलेली आहे. सदर मुळ कागदपत्र पडताळणी अंती संवर्गनिहाय अंतरिम पात्र / अपात्र उमेदवारांची यादी दिनांक १३/०३/२०२६ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करुन उमेदवारांना काही आक्षेप / हरकती असल्यास दिनांक १६/०३/२०२६ ते २३/०३/२०२६ या कालावधीत आक्षेप अर्ज योग्य त्या पुराव्यासह सादर करण्याबाबत कळविलेले होते. त्यानूसार सदर कालावधीत या कार्यालयाकडे प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेवून अंतिम पात्र / अपात्र उमेदवारांची यादी व निकाल तयार करण्यात आलेले आहे. परंतू राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई यांचे स्तरावरुन राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजूर पदांची पुनर्रचना करण्याची कार्यवाही सुरु असल्याने सद्यस्थितीत सुरु
असलेल्या पदभरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे.पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अधिक माहिती करिता कृपया PDF बघावी.
NHM Gadchiroli Bharti Result
NHM Gadchiroli Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तसेच १५ व्या वित्त आयोगांतर्गत रिक्त असलेली १७२ पदे दिनांक २९/०६/२०२६ पर्यंतच्या कालावधीकरीता भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु असून उमेदवारांकरिता सूचना पुढील काही दिवसात जिल्हा परिषद गडचिरोलीचे संकेतस्थळ www.zpgadchiroli.maharashtra.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देवून माहिती घ्यावी.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

NHM Gadchiroli Bharti Result
NHM Gadchiroli Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तसेच १५ व्या वित्त आयोगांतर्गत रिक्त असलेली १७२ पदे दिनांक २९/०६/२०२६ पर्यंतच्या कालावधीकरीता भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु असून प्रसिद्ध जाहिरातीनूसार अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांची संवर्गनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.सदर यादीतील उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी आयोजीत करण्यात आली आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| आरोग्य विभाग- NHM | NHM अंतर्गत NHM व १५ वा वित्त आयोग पदभरती – मूळ कागदपत्र पडताळणी वेळापत्रक व सूचना. | 29/01/2026 | 13/02/2026 | पहा (4 MB) |
NHM Gadchiroli Bharti Result
NHM Gadchiroli Bharti Result: आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद गडचिरोली मार्फत सीएसआर निधी अंतर्गत वैद्यकिय अधिकारी, स्टॉफ नर्स / एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहन चालक, डॉटा एन्ट्री ऑपरेटर पदे भरण्याकरिता भरतीप्रक्रिया सुरु असून प्रसिद्ध जाहिरातीनूसार अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांची संवर्गनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर यादीतील उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी आयोजीत करण्यात आली आहे. उमेदवारांनी मुळ कागदपत्र पडताळणीकरीता कागदपत्रासह लस साठवण केन्द्र, जवाहर भवन जवळ, जिल्हा परिषद आवार, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे उपस्थित राहावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

| आरोग्य विभाग- NHM | आरोग्य विभाग, जि.प. गडचिरोली स्तरावरील सीएसआर निधी अंतर्गत पदभरती, मूळ कागदपत्र पडताळणी व सूचना. | 29/01/2026 | 13/02/2026 | पहा (2 MB) |
NHM Gadchiroli Bharti Result
NHM Gadchiroli Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ व्या वित्त आयोगांतर्गत तसेच आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली मार्फत सीएसआर निधी अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती प्रक्रिया सुरु असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली अर्जाची संख्या ही खुप जास्त असल्याने पदनिहाय यादी तयार करण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे वेळापत्रकानूसार दिनांक २७/०१/२०२६ पासून उमेदवारांचे मुळ कागदपत्र पडताळणी करणे शक्य नाही. मुळ कागदपत्र पडताळणीचे सुधारित वेळापत्रक व सुचना पुढील काही दिवसात जिल्हा परिषद गडचिरोलीचे संकेतस्थळ www.zpgadchiroli.maharashtra.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देवून माहिती घ्यावी.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| आरोग्य विभाग:- जि.प. गडचिरोली स्तरावरील सीएसआर निधी अंतर्गत पदभरती जाहिरात | NHM, १५ वा वित्त आयोग व CSR निधी अंतर्गत पदभरती संबंधाने उमेदवारांना सूचना. | 23/01/2026 | 31/01/2026 | पहा (72 KB) |
NHM Gadchiroli Bharti Result
राष्ट्रीय आरोग्य अभियान, १५ वा वित्त आयोग व मोबाईल मेडीकल युनिट अंतर्गत रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून प्रसिद्ध जाहिरातीनूसार अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची तात्पूरती पात्र/अपात्र यादी दिनांक १३/०८/२०२५ रोजी जिल्हा परिषद गडचिरोलीचे www.zpgadchiroli.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तसेच सदर यादी संबधित उमेदवारांना त्यांचे वैयक्तीक ईमेल वर सुद्धा पाठविण्यात आलेली होती. सदर यादीबाबत किंवा नोंदविलेल्या माहितीबाबत उमेदवारांना काही हरकती असल्यास योग्य त्या पुराव्यासह त्यांचे आक्षेप अर्ज दिनांक १४/०८/२०२५ ते दिनांक २०/०८/२०२५ या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत (फक्त कार्यालयीन कामाकाजाचे दिवशी) प्रत्यक्ष कार्यालयात सादर करण्याबाबत कळविलेले होते. सदरहुप्रमाणे विहित कालावधीत प्राप्त आक्षेप विचारात घेवून उमेदवारांची अंतिम पात्र व अपात्र यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे.
संबधित पदाच्या अंतिम पात्र सर्व उमेदवारांनी मुळ कागदपत्र पडताळणीकरीता त्यांचे नावासमोर नमुद दिनांक व वेळी त्यांनी सादर केलेला ऑनलाईन अर्ज व भरती शुल्क भरल्याची प्रत तसेच अर्जामध्ये नोंदविलेल्या सर्व मुळ (Original) व स्वसाक्षांकित (प्रत्येकी १ Xerox) कागदपत्रासह राष्ट्रीय शहिद विर बाबुराव शेडमाके सभागृह, पहिला माळा, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे उपस्थित राहावे. याकरीता या कार्यालयाकडून कोणताही पत्रव्यवहार केल्या जाणार नाही. तसेच उमेदवारांना मुळ कागदपत्र पडताळणी करिता स्वखर्चाने उपस्थित राहावयाचे असून येण्या-जाण्याचा कोणताही भत्ता अथवा खर्च दिल्या जाणार नाही. तसेच दिलेल्या ठिकाणी त्यांचे अनुक्रमांकानूसार विहित वेळेत उपस्थित राहण्याची जबाबदारी ही संबधित उमेदवारांची असून विहित वेळेत उपस्थित न झालेल्या उमेदवारास गैरहजर असल्याचे समजण्यात येवून त्यांची उमेदवारी रद्य करण्यात येईल. तसेच याबाबत कोणतीही तक्रार स्विकारल्या जाणार नाही, याची संबधित सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
| आरोग्य विभाग:- राष्ट्रीय हेल्थ मिशन (NHM) | NHM, १५ वा वित्त आयोग व एमएमयू अंतर्गत उमेदवारांची अंतिम अपात्र यादी. | 25/09/2025 | 31/10/2025 | पहा (6 MB) |
| आरोग्य विभाग:- राष्ट्रीय हेल्थ मिशन(NHM) | NHM, १५ वा वित्त आयोग व एमएमयू अंतर्गत उमेदवारांची अंतिम पात्र यादी व सूचना. | 25/09/2025 | 31/10/2025 | पहा (7 MB) |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















