नवीन वर्ष देणार लाखाे नाेकऱ्या; कंपन्यांनी झटकली मरगळ, हवे मजबूत मनुष्यबळ!
New Year AI Jobs 2025
आयटी क्षेत्रात गेल्या दाेन वर्षांमध्ये मरगळ आली हाेती. ती झटकून टाकत हे क्षेत्र नव्याने भरारी घेण्याच्या तयारीत आहेत. आयटी कंपन्यांमध्ये नव्या वर्षात माेठ्या प्रमाणावर नाेकरभरती हाेणार असल्याची चिन्हे आहेत. नाेकरभरतीचा फाेकस ‘एआय’, ‘डेटा’ विश्लेषण आदी नव्या तंत्रज्ञानावर राहणार आहे. ‘सीआयईएल’ या संस्थेने विविध क्षेत्रांतील नाेकरभरतीचा आढावा घेतला. त्यानुसार, २०२४मध्ये झालेलया नाेकरभरतीच्या तुलनेत नव्या वर्षात १० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती हाेऊ शकते. बहुतांश कंपन्यांनी तशी तयारी केली आहे. काही माेठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील मनुष्यबळ वाढविण्याची याेजना आहे. तर काही कंपन्यांनी तरुणाईला आपल्याकडे ओढण्यासाठी यावेळी कॅम्पस मुलाखतींवर जाेर दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या हाती पदवी पडण्यापूर्वी नाेकरीचे पत्र राहणार आहे.