राज्यपालांच्या अनुमतीने जारी केलेले नवे पदभरती नियम हे संबंधित जाहिरात प्रकाशन दिनांकापासून पुढे लागू होतात. त्याआधी सुरू करण्यात आलेल्या भरतीप्रक्रियेस नवे नियम लागू करून भरतीत सहभागी उमेदवारांना नियुक्तीपासून डावलता येणार नाही, असा निर्वाळा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) औरंगाबाद खंडपीठाने दिला.

विशेष परिचारिकापदांच्या भरतीप्रकरणी मॅटचे न्या. पुखराज बोरा व न्या. विनय कारगावकर यांच्या खंडपीठाने उपरोक्त निर्वाळा देताना दहा आठवड्यांत याचिकाकर्त्यांना नियुक्ती आदेश जारी करण्यात यावेत, असेही सुनावणीवेळी म्हटले आहे.
आठवड्यांत याचिकाकर्त्यांना नियुक्ती आदेश जारी करण्यात यावेत, असेही सुनावणीवेळी म्हटले आहे.
२१ फेब्रुवारी २०१९ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने बालरोगतज्ज्ञ परिचारिका, मनोविकारतज्ज्ञ परिचारिका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका व पाठ्यनिर्देशिका अशा विविध पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रकाशित केली. जाहिरातीत नमूद अर्हता धारण करीत असल्याने याचिकाकर्त्या मेघाराणी व अन्य उमेदवारांनी आपापले आवेदनपत्र भरले. प्रवेशपत्र जारी होऊन त्यांनी समाईक परीक्षाही दिली. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी परिचारिका पदासाठीचे सुधारित भरतीनियम राज्यपालांच्या अनुमतीने आरोग्य खात्याने प्रकाशित केले. त्यात विशेष परिचारिका पदांसाठी सुधारित अर्हता नमूद करण्यात आल्या. १९ एप्रिल २०२१ रोजी समाईक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात मेघाराणी सर्वाधिक गुण घेऊन द्वितीय स्थानावर उत्तीर्ण झाल्या. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आरोग्य विभागाच्या वतीने एक अधिसूचना प्रकाशित करण्यात आली. विशेष परिचारिका प्रवर्गासाठी सुधारित भरतीनियम लागू करण्यात आले असून, मागील परीक्षेची निवड प्रक्रिया नव्या नियमांआधारे पार पाडण्यात येईल, असे उमेदवारांना सूचित करण्यात आले. त्यास आक्षेप उपस्थित करून मेघाराणी व अन्य याचिकाकर्त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















