लाडकी बहीण योजनेसाठी कोणतेही नवीन नियम लावलेले नाहीत किंवा वेगळा निकष आणलेला नाही (No new criteria in the Ladki Bahin). आम्ही स्वतःहून कोणाकडूनही पैसे परत घेतले नाहीत आणि परत मागणारही नाही. मात्र, नियमाच्या बाहेर जाऊन कोणाला फायदा मिळत असेल, तर तो थांबवला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार आणि लाभार्थ्यांकडून वसुली केली जाणार या चर्चांना पूर्णविराम दिला.

“न्याय्य हक्क असलेल्या महिलांनी घाबरण्याची गरज नाही!”
गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की, ज्यांनी योजनेच्या निकषात बसत नसतानाही लाभ घेतला, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जातील आणि त्यांना त्रास दिला जाईल. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळून लावत स्पष्ट केले की, “काही महिलांना आपले पात्रतेचे निकष पूर्ण होत नाहीत हे समजल्यावर त्यांनी स्वतःहून योजनेतून माघार घेतली आणि पैसे परत केले आहेत. आम्ही कोणावरही जबरदस्ती करणार नाही. पण, लोकांच्या पैशांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे आणि महालेखाकारासमोर हिशोब द्यावा लागतो. त्यामुळे नियम मोडून लाभ घेणाऱ्यांचा फायदा बंद केला जाईल. यासाठी आम्ही चौकशी सुरू केली आहे. परंतु, इतर महिलांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही!”
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















