Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NEET सुपर स्पेशालिटी परीक्षेचा निकाल जाहीर

NEET SS Exam Result

NEET SS Exam Result 2021

NEET SS Exam Result : The result of the super specialty exam has been announced. Candidates appearing for the exam can check the results by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

नीट सुपर स्पेशालिटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहू शकतात.

नीट एसएस २०२१ (NEET SS 2021) च्या निकालात रोल नंबर, मिळालेले गुण (४०० पैकी) आणि मेरिट रँकचे तपशील देखील देण्यात आले आहेत. शैक्षणिक सत्र २०२१-२२ चा हा निकाल आहे. परीक्षा २०२१ मध्ये होणार होती पण कायदेशीर वादामुळे परीक्षा लांबली होती. त्यानंतर ही परीक्षा १० जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आली. केवळ नीट एसएस २०२१ कटऑफ उत्तीर्ण झालेले उमेदवार प्रवेश परीक्षा देऊ शकतील. या निकालासोबत नीट कट-ऑफ पर्सेंटाइल जाहीर करण्यात आले आहेत. हे सर्व स्पेशॅलिटीसाठी ५० वे पर्सेंटाइल आहे.तसेच नीट एसएस २०२१ चे कट ऑफ मार्क्स लवकरच जाहीर केले जाणार आहेत. ३२ स्पेशॅलिटीसाठी नीट एसएस कट-ऑफ गुण स्वतंत्रपणे घोषित केले जाणार आहेत.

How to Download NEET SS Result

  • निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट – nbe.edu.in वर जा.
  • ‘नीट एसएसचा निकाल’ या लिंकवर क्लिक करा. ३२ स्पेशलिटीजसाठी निकाल पीडीएफ उपलब्ध दिसेल.
  • रोल नंबर, मिळालेले गुण आणि नीट एसएस मेरिट रँक तपासा.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट डाउनलोड करा.

वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC)तर्फे नीट एसएस २०२१चे काऊन्सेलिंग अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर ऑनलाइन पद्धतीने आयोजित केले जाणार आहे. एमसीसी भारतातील सरकारी आणि रुग्णालयांमध्ये १००% ऑल इंडिया कोट्यातील जागांवरील प्रवेशासाठी तीन फेऱ्यांमध्ये नीट एसएस काऊन्सेलिंग २०२१ आयोजित करेल. त्याची सविस्तर माहिती लवकरच दिली जाणार आहे. काऊन्सेलिंग संबंधित नवीन अपडेटसाठी उमेदवारांनी एमसीसी वेबसाइटवर लक्ष ठेवावे. वेबसाइटवर सर्व माहिती अपलोड केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

निकालात उमेदवाराचा रोल नंबर आणि एकूण ४०० गुणांपैकी मिळालेले गुण आणि मेरिट रँकचा समावेश असेल. नीट एसएस२०२१ चे कट ऑफ पर्सेंटाइल सर्व प्रवर्गांसाठी ५० आहे. या परीक्षेत नकारात्मक गुणांकनही होते. उमेदवारांनी प्रत्येक योग्य उत्तरासाठी ४ गुण मिळतील तर चुकीच्या उत्तरासाठी २५ टक्के गुण कापले जातील.

ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना देशभरातील शासकीय आणि खासगी महाविद्यालये तसेच स्वायत्त विद्यापीठ आणि आर्म्ड फोर्सेस मेडिकल संस्थांमध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन (DM) आणि मास्टर ऑफ सर्जरी (Master of Chirurgiate MCh) च्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो.

अधिकृत वेबसाईट – mcc.nic.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड